Swami Vivekanand Marathi Uccha Prathamik and Madhyamik Vidhyalaya

Swami Vivekanand Marathi Uccha Prathamik and Madhyamik Vidhyalaya Class - LKG/KG-I & UKG/KG-II
Class - 1st to 10th (SEMI ENGLISH)

) अद्ययावत इमारत तसेच हवेशीर वातावरण.
2) भव्य खेळांचे मैदान.
3) प्रत्येक वर्गात डेक्सबेंच.
4) अनुभवी शिक्षकवृंद.
5) विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भरपुर साहीत्य.
6) शाळेचा अधिकृत गणवेश.
7) अभ्यासक्रमाव्यतिरीक्त गायन, वादन, नृत्य, वक्तृत्व इत्यादी गुणांना वाव.
8) विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची सोय.
9) विद्यार्थ्यांसाठी संगणकाची व्यवस्था.
10) सर्व वर्गामध्ये CCTV कॅमेराद्वारे निगराणी.
12) विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्ष व्यक्तिगत लक्ष.
13) शिष्यवृत्ती परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, इ. 5 वी नवोदय परीक्षा, चित्रकला परीक्षा (Elementry, Intermediate), सर्व स्पर्धा परीक्षांची संपूर्ण तयारी, तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांमधे विद्यालयातील विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी प्रवृत्त करुन त्यांची विद्यालयातच तयारी करुन घेतल्या जाते.

10/05/2026
10/05/2026
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..!!!
09/05/2026

सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..!!!

सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!
26/04/2026

सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!

आज आमच्या शाळेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आदरणीय मुख्याध्यापक श्री. सुरेश गबाजी चेके सर यांच्या हृदय विकाराच्या तीव्र झट...
30/03/2026

आज आमच्या शाळेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आदरणीय मुख्याध्यापक श्री. सुरेश गबाजी चेके सर यांच्या हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे झालेल्या निधनाने आम्ही सर्वजण अत्यंत दुःखी व व्यथित आहोत.

सर केवळ मुख्याध्यापक नव्हते, तर ते आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि विद्यार्थ्यांचे खरे हितचिंतक होते.
त्यांनी आपल्या आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करून असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडवले.

त्यांचे प्रेमळ वागणे, शिस्तप्रिय स्वभाव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी आम्ही कधीच विसरणार नाही.
आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि शिकवण सदैव आमच्यासोबत राहतील.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 🙏
आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली… 🌹

08/01/2026

दिनांक, 07 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी विद्यालयाचा क्रीडा महोत्सव सन 2025-26 चे मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मा.डॉ.श्री. रामदासजी शिंदे साहेब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मा.श्री. किशोरजी अंबुसकर साहेब संस्थेचे संचालक तथा नवनिर्वाचित अध्यक्ष, जायंट्स ग्रुप ऑफ देऊळगावराजा, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चेके सर व भांबर्गे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राठोड सर, खंडागळे सर, पवार सर, टाले सर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी कवायत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत (वयोगट 14 मुली) या गटातून थाळीफेक या अमरावती विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरावर खेळणाऱ्या विद्यालयातील इयत्ता 7 वी मधील विद्यार्थिनी कु. आर्या गोविंद पवार या विद्यार्थिनीने मानाची मशाल घेऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंदजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विभागीय मैदानी स्पर्धा व राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमधील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात मान्यवरांनी सर्व खेळाडूंना पुढील क्रीडा उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालायचे शिक्षक काकडे सर तर प्रास्ताविक राठोड सर यांनी केले. तसेच. खंडागळे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

दिनांक, 07 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी विद्यालयाचा क्रीडा महोत्सव सन 2025-26 चे मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला...
08/01/2026

दिनांक, 07 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी विद्यालयाचा क्रीडा महोत्सव सन 2025-26 चे मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मा.डॉ.श्री. रामदासजी शिंदे साहेब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मा.श्री. किशोरजी अंबुसकर साहेब संस्थेचे संचालक तथा नवनिर्वाचित अध्यक्ष जायंट्स ग्रुप ऑफ देऊळगावराजा, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चेके सर व भांबर्गे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राठोड सर, खंडागळे सर, पवार सर, टाले सर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी कवायत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत (वयोगट 14 मुली) या गटातून थाळीफेक या अमरावती विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरावर खेळणाऱ्या विद्यालयातील इयत्ता 7 वी मधील विद्यार्थिनी कु. आर्या गोविंद पवार या विद्यार्थिनीने मानाची मशाल घेऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंदजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विभागीय मैदानी स्पर्धा व राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमधील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात मान्यवरांनी सर्व खेळाडूंना पुढील क्रीडा उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालायचे शिक्षक काकडे सर तर प्रास्ताविक राठोड सर यांनी केले. तसेच. खंडागळे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

दिनांक : 27 व 28 नाव्हेंबर 2025,शिक्षण विभाग, पंचायत समिती देऊळगावराजा व तालुका विज्ञान शिक्षक संघटना, देऊळगावराजा यांच्...
29/11/2025

दिनांक : 27 व 28 नाव्हेंबर 2025,

शिक्षण विभाग, पंचायत समिती देऊळगावराजा व तालुका विज्ञान शिक्षक संघटना, देऊळगावराजा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2025-26 मध्ये स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, दे.राजा मधील (माध्यमिक) गटातून प्रथम क्रमांक मिळाला आहे आणि जिल्हास्तरावर निवड झाली आहे , त्याबद्दल सहभागी विद्यार्थी 1. श्रीहरी शिवानंद मांटे व 2. हर्षवर्धन प्रमोद कव्हळे यांचे संस्था, मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक वृंदाकडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा!🌷🌷🌷

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा व जिल्हा क्रीडा परिषद यवतमा...
29/10/2025

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता 7 वी मधील विद्यार्थिनी कु. आर्या गोविंद पवार या विद्यार्थीने (वयोगट 14 मुली) या गटातून थाळीफेक या अमरावती विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला व राज्यस्तरावर निवड झाली. त्याबद्दल कु. आर्या गोविंद पवार हिचे हार्दिक अभिनंदन. तसेच राज्यस्तरावर होणाऱ्या मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉💐💐💐

Address

Swami Vivekananda Marathi Uccha Prathamik And Madhyamic Vidhyalaya, Deaulgaon Raja
Deulgaon Raja
443204

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 7:30am - 11:30am

Telephone

07261232260

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Marathi Uccha Prathamik and Madhyamik Vidhyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Swami Vivekanand Marathi Uccha Prathamik and Madhyamik Vidhyalaya:

Shortcuts

Share

Category