Happy New year 2024
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२४.
Students Rights Association of India
Problems of Students are solved through collective action
14/12/2022
नव्या युगाचा युवा शिलेदार
प्रारंभ नव्या युगाचा नव्या पर्वाचा
RTMNU सिनेट निवडणूक 2022
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपले मत आंपल्यासाठी
24/09/2022
राष्ट्रपिता,आद्यशिक्षक,राष्ट्रनिर्माता,महिला शिक्षणाचे अग्रदूत,अस्पृश्य,महिला,सामान्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे सत्यशोधक ज्योतिराव गोविंदराव फुले.
यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या 150व्या वर्धापनदिवसाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...💐💐💐.
आद्यशिक्षक ज्योतिराव गोविंदराव फुले अद्याशिक्षिकासावित्रीबाई फुले यांना मानाचा सलाम.
सत्यशोधक समाजाचा सदा विजय असो.
-उमेश कोरराम.
04/06/2022
#स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया ने 5 मार्च 2019 ला पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. अविरत लढा देत महाज्योती संस्थेची निर्मितीसाठी स्टुडंट्स राईट्स ने सर्वस्व पणाला लावून प्रयत्न केले होते. आता संघर्षाचे फळ मिळायला सुरुवात झाली आहे.
#महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील 1500 ओबीसी,विजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना,दिल्लीतील नामांकित प्रशिक्षण संस्थांद्वारे UPSC नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 2 लाख ते 3 लाख रुपयांचे हे प्रशिक्षण असेल आणि 12 महिने 12 ते 15 हजार रुपये विद्यावेतन मिळेल. अर्ज करणे सुरू झालेले आहे.अर्जाची अंतिम तारीख 20 जून 2022. त्वरा करा विद्यार्थ्यांनो ह्या संधीचे सोनं करा.
उमेश कोरराम, रंजित थीपे,आकाश बाम्बोडे, कमलेश उके ,कमलेश पाटील सर आणि असंख्य योद्धे.
-स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
30/03/2022
08/03/2022
आज पोलीस उपनिरीक्षक (PSI) 476 पदांसाठीचा निकाल जाहीर झाला. सलग दोन वर्षांपासून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी शारीरिक चाचणीसाठी जीवाचे रान करत खूप कठोर मेहनत घेतली. अनेक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. महिला उमेदवारांना अनेक सामाजिक,शारीरिक आणि आर्थिक हाल सोसावे लागले त्या सर्व बाबींवर मात करत flying कलर घेत हे सर्व विद्यार्थी आज यशस्वी झालेत. काही विद्यार्थी अनेक कारणांमुळे उत्तीर्ण होऊ शकले अश्यांनी सुद्धा निराश न होता यावर्षी होणाऱ्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे.
फोटोत,
#महाराष्ट्रात
प्रथम - निलेश बारवे
द्वितीय - गणेश यलमर
आपला
उमेश कोरराम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
#महाज्योती विद्यार्थ्यांना #टॅब आणि 6 GB डेटा कधी देणार?
ऑनलाइन क्लास सुरू होऊन अडीच महिने झालेत.परंतु जेईई निट प्रशिक्षणार्थींना टॅब चीच प्रतिक्षा. 7 डिसेंबर 2021 पासून प्रशिक्षण वर्ग सुरू झालेत.
ग्रामीण गरीब ओबीसी विद्यार्थ्यांचा विचार करून, निट जेईई एमएचCET 2023 च्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना महाज्योतीने त्वरीत टॅब व इंटरनेट सुविधा द्यावी.
यासाठी #मा.ना.विजय वडेट्टीवार, मंत्री तथा अध्यक्ष आणि इतर संचालक महाज्योती यांनी तात्काळ लक्ष द्यावे.
आपला
उमेश कोरराम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
MPSC च्या संयुक्त गट क परीक्षेचे अर्ज करतेवेळी तांत्रिक अडचण येत आहे त्यासाठी आयोगाने दोनदा अर्ज करण्याची मुदत वाढवून दिली आहे. परंतु तांत्रिक मागील 10 दिवसात सुद्धा अडचण दूर न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेलेले नाहीत.
हे आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये सर्वांचे अर्ज भरले जातील असेच होईल.
आपला
उमेश कोरराम
अध्यक्ष, SRAI.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी परीक्षा शुल्क खात्यावर अद्ययावत झालेले नसेल तर आज मा.सचिव MPSC नावाने ई-मेल करा आणि।सोबत शुल्क भरल्याची पावती जोडा.
उमेश कोरराम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
18/10/2021
#महाज्योती मार्फत OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांसाठी MPSC, UPSC ऑनलाइन प्रशिक्षणासाठी ज्या खाजगी क्लासेस ची निवड केली आहे त्यांनी स्वतः आपल्या शाखेत दिल्ली आणि पुण्यात ऑफलाईन क्लासेस सुरू केले आहेत. ऑनलाइन वर्ग म्हणजे नुसता पैशाच्या चुराडा विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गासारखा फायदा होणार नाही.
क्लासेस ऑफलाईन करा, विद्यावेतन द्या. आता सर्व खुले झाले आहे. बदल स्वीकारा, निर्णयात लवचिकता आणा, विद्यार्थ्यांसोबत महाज्योती चाही फायदाच होईल.अन्यथा या अभ्यासक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही...
#आरोग्य भरती परीक्षा
न्यासा कंपनी, आरोग्य विभाग आणि IT विभाग खरंच #असमर्थ आहेत. मागच्या वेळी इतकी मानहानी झाल्यावर सुद्धा पुन्हा अशीच चूक करणे म्हणजेच शुद्ध मुर्खपणाच नाही नालायकपणा आहे. वरील तिन्ही संस्था परीक्षा घेण्यास लायक नाहीत. त्यांनी कधीही पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेतल्याच नाहीत. तेव्हा असे घोळ होतीलच. इतका वेळ असूनही ही कंपनी योग्य रीतीने काम करत नसेल तर,लगेच या कंपनीकडून काम काढून घ्यायला पाहिजे परंतु , बरेच आर्थिक व्यवहार झालेले असल्याकारणाने आरोग्य विभागाला कळत नसावे काय करावे.
म्हणून परीक्षा MPSC कडे द्याव्यात. MPSC आणखी बळकटी द्यावी. स्वतःची इमारत, लागेल तेवढा स्टाफ, लागेल तेवढा पैसा द्यावा. कोणाकडून काही चूक झाली सेवेतून मुक्त करावे, सरकारी अधिकाऱ्यांवर जबाबदारी द्यावी. परीक्षा घेणं हे मंत्रांचे काम नाही.
MPSC
उमेश कोरराम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Old Rajendra Nagar
Delhi
110060