Disha Abhyas Academy Daryapur,AMRAVATI

Disha Abhyas Academy Daryapur,AMRAVATI DISHA ABHYAS ACADEMY SPARDHA PARIKSHA MARGADARSHAN CENTER
DARYAPUR AMRAVATI

26/08/2024

प्रेरणा- 1
माननीय राज्यपाल- Shri. C.P. Radhakrishnan

*महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचा संक्षिप्त परिचय*

श्री सी. पी. राधाकृष्णन यांनी दिनांक 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते. आपल्या राज्यपाल पदाच्या कालावधीत त्यांनी तेलंगणा राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला.

श्री राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूर, तमिळनाडू येथे झाला आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. बाल वयातच स्वयंसेवक म्हणून त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला.

सन 1974 साली ते भारतीय जनसंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य झाले.

सन 1996 साली राधाकृष्णन यांची तामिळनाडूमध्ये भाजपचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. सन 1998 साली ते पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 साली ते तेथूनच पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले.

आपल्या खासदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्रोद्योग संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थ विषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते. स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते.

सन 2004 साली, श्री राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते.

सन 2004 ते 2007 या काळात राधाकृष्णन यांनी तामिळनाडू प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले. या पदावर असताना त्यांनी 93 दिवसांची ‘रथयात्रा’ काढली होती. या रथयात्रेने १९००० किमी प्रवास केला. भारतातील सर्व नद्यांना जोडावे, दहशतवादाचे समूळ उच्चाटन करावे, समान नागरी कायदा लागू करावा, अस्पृश्यता निर्मूलन आणि अंमली पदार्थांचे उच्चाटन व्हावे या मागण्यांसाठी ही रथयात्रा काढली होती. त्यानंतर देखील त्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी दोन पदयात्रांचे नेतृत्वही केले.

सन 2016 मध्ये डॉ. राधाकृष्णन यांची कॉयर बोर्ड, कोचीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी चार वर्षे सांभाळले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील कॉयरची निर्यात 2532 कोटी रु. या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. सन 2020 ते 2022 पर्यंत ते भाजपचे केरळ राज्याचे अखिल भारतीय प्रभारी होते.

दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी डॉ. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांतच त्यांनी झारखंडमधील सर्व २४ जिल्ह्यांना भेटी दिल्या तसेच नागरिक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल पदाचा देखील काही काळ अतिरिक्त कार्यभार सांभाळला.

उत्तम क्रीडापटू असलेले, राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चाम्पियन होते तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे.

श्री राधाकृष्णन यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, बेल्जियम, हॉलंड, तुर्की, चीन, मलेशिया, सिंगापूर, तैवान, थायलंड, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, इंडोनेशिया आणि जपान या देशांना भेटी दिल्या आहेत.
*****
संकलन- दिशा अभ्यास अकॅडमी, दर्यापुर

17/08/2024

🏆🥇 *राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना बक्षीससोबत किती मानधन मिळालं?*

📣 *One Click & Join*👉*Join My Page* https://www.facebook.com/DishaAbhyasAcademy?mibextid=ZbWKwL

🇮🇳 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल झाली आहे. यंदा अनेक चित्रपटांनी आणि कलाकारांनी यामध्ये बाजी मारली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? पुरस्कार जिंकणाऱ्या कलाकारांना दिली जाणारी बक्षीसाची रक्कम किती असते.

तर देशातील सर्वोच्च सिनेसृष्टीतील सन्मान, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना 15 लाखांच्या बक्षीस देण्यात येते. यानंतर स्वर्ण कमल पुरस्कार विजेत्यांना रोख 3 लाख रुपये पारितोषिक दिले जाते. तर रौप्य कमळ विजेत्यांना विविध श्रेणींमध्ये 2 लाख रुपये दिले जातात.

🪷 *स्वर्ण कमल पुरस्कार विजेत्यांची यादी :*

▪️ सर्वोत्कृष्ट चित्रपट: अट्टम
▪️ दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट : फौजा
▪️ सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारा चित्रपट : कांतारा
▪️ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: ऊंचाई
▪️ ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट : ब्रह्मास्त्र-भाग 1: शिवा

🇮🇳 *रौप्य कमल पुरस्कार विजेत्यांची यादी :*

▪️ सर्वोत्कृष्ट अभिनेता: कांतारा साठी ऋषभ शेट्टी
▪️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: थिरुचित्रम्बलम
▪️ सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: फौजा
▪️ सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: 'ऊंचाई'साठी नीना गुप्ता
▪️ सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक: ब्रह्मास्त्र-भाग 1

📣 _*आताच Facebook वर मिळवा महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*

📣 *One Click & Join Disha* 👉 Abhyas Academy Daryapur,AMRAVATI
*Join My Page* https://www.facebook.com/DishaAbhyasAcademy?mibextid=ZbWKwL

📣 _*स्पर्धा परीक्षा प्रवासात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचणी येत असल्यास WhatsApp वर! संपर्क*दिशा अभ्यास अकॅडमी👉 *9763857676*

DISHA ABHYAS ACADEMY SPARDHA PARIKSHA MARGADARSHAN CENTER
DARYAPUR AMRAVATI

Please Join Group🌹
23/07/2024

Please Join Group🌹

07/07/2024

अलंकार 👆

09/04/2023

🔲 महाराष्ट्राविषयी माहिती 🔲

▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.

▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

09/04/2023

ब्रिक्स [ BRICS ]

🔵 ब्राझील, रशिया,भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या जगातील आघाडीच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था यांचा एक गट आहे.

🔵 2001 मध्ये ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जिम ओ 'नील यांनी ब्राझील,रशिया,भारत आणि चीन या चार उद्योन्मुख अर्थव्यवस्थेचे वर्णन करण्यासाठी ब्रिक [ BRIC ] हा शब्द तयार केला.

🔵 2006 मध्ये झालेल्या BRIC परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत या गटाला औपचारिकता देण्यात आली होती

🔵 डिसेंबर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका BRIC मध्ये सामील झाला.त्यानंतर गटाचे नामांतरण BRICS असे झाले.

🔵 ब्रिक्सचे 5 सदस्य देश जागतिक लोकसंख्येच्या 41%, जागतिक जीडीपीच्या 24% आणि जागतिक व्यापाराच्या 16% हिस्सा व्यापतात.

बी- आर - आय -सी -एस आरक्षण आमच्या क्रमानुसार मंचाचे अध्यक्ष पद दरवर्षी सदस्यांमध्ये फिरवले जाते भारताकडे 2021 चे अध्यक्ष होते.

बेरोजगारी, नोकर भर्ती, व उपाययोजना विषयावर अध्ययन समाचार वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेला लेख. संपादक जितेंद्र रोडे व गौर...
12/10/2021

बेरोजगारी, नोकर भर्ती, व उपाययोजना विषयावर अध्ययन समाचार वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेला लेख.

संपादक जितेंद्र रोडे व गौरव टोळे तालुका प्रतिनिधी यांचे आभार, धन्यवाद🌹🙏

26/05/2021

🚨 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार 🚨

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच
'शब्दसिद्धी' असे म्हणतात.

🔥शब्दांचे खालील प्रकार पडतात.

🛑 तत्सम शब्द

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात.

उदा.
राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.

🛑 तदभव शब्द

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.

उदा.
घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.

🛑देशी/देशीज शब्द

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.

उदा.
झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.

🛑 परभाषीय शब्द :

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ' परभाषीय शब्द' असे म्हणतात.

👉1) तुर्की शब्द

कालगी, बंदूक, कजाग

👉2) इंग्रजी शब्द

टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

👉 3) पोर्तुगीज शब्द
बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.

👉4) फारशी शब्द
रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.

👉 5) अरबी शब्द
अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.

👉6) कानडी शब्द
हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.

👉7) गुजराती शब्द
सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.

👉8) हिन्दी शब्द
बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.

👉 9) तेलगू शब्द
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.

👉10) तामिळ शब्द
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.

आमचे मित्र व आपल्या दिशा अभ्यास अकॅडमी चे सागर अरबट दर्यापूर यांची पोलीस उपनिरीक्षक PSI पदी निवड झाल्या बद्द्ल हार्दिक अ...
10/02/2021

आमचे मित्र व आपल्या दिशा अभ्यास अकॅडमी चे सागर अरबट दर्यापूर यांची पोलीस उपनिरीक्षक PSI पदी निवड झाल्या बद्द्ल हार्दिक अभिनंदन 💐

14/11/2020

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.

*दिवाळीच्या असंख्य शुभेच्छा*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎊

29/10/2020

Which Sports is known as the Gentleman's Game ?

Cricket. :- A Gentleman's game

Father Of the Subjects
16/10/2020

Father Of the Subjects

Address

Civil Line Daryapur
Daryapur
444803

Telephone

+919763857676

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Disha Abhyas Academy Daryapur,AMRAVATI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Disha Abhyas Academy Daryapur,AMRAVATI:

Shortcuts

Share

Category