24/08/2022
मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये उत्तर रत्नागिरी विभागात दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजची बाजी.
मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये उत्तर रत्नागिरी विभागात दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजने १२ स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त करून विजेतेपदाचे मानकरी ठरले आहे.
हा युवा महोत्सव मोरवंडे, बोरज येथील ज्ञानदिप कॉलेज ऑफ सायन्स ॲंड कॉमर्स या महाविद्यालयामध्ये २२ ऑगस्ट २०२२ रोजी दिमाखात पार पडला. याप्रसंगी परिक्षक म्हणुन अभिनेते अजय तपकीरे,रविंद्र कुलकर्णी यांची उपस्थिती तसेच या निवड फेरीत एकूण २७ महाविद्यालयांचा सहभाग होता.
यंदाच्या वर्षी दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेज
महाविद्यालयास प्राप्त झालेल्या पारितोषिकांमध्ये
वादविवाद (गट १) स्पर्धा आयेशा खोत आणि रसिका बर्वे, पोस्टर मेकिंग प्रकारात सविता उजाळ, एकपात्री नाट्य प्रकारात सई सावंत, तर वक्तृत्व प्रकारात आयेशा खोत या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्यांची चुणुक दाखवित प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तसेच पारितोषिकांची परंपरा पुढे राखत रंगावली प्रकारात आकांक्षा अस्वले, कोलाज मध्ये सानिका ओक, मेहेंदी प्रकारात इकरा कलदाने आणि देशभक्तीपर समुहगीत गायन प्रकार गौरी खरे, सानिका डोळस, संजना साळवी , स्नेहल महाजन अक्षता जोशी या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाची पारितोषिके प्राप्त केली.
या व्यतिरीक्त भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात सई सावंत,
वादविवाद स्पर्धा (गट २) मध्ये सानिका ओक व अनिरुद्ध भागवत आणि पथनाट्य (मराठी ) स्पर्धेत
सई सावंत, सायुरी कळसकर ,नियती भळगट , शुभम लोवरे, सुजल जैन , श्रीराज रोहिलकर या विद्यार्थ्यांनी
तृतीय क्रमांक प्राप्त करीत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. याचबरोबर याप्रसंगी रांगोळी स्पर्धेमध्ये इशा खेडेकर या विद्यार्थीनीस उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
या आंतरविद्यालयीन मुंबईविद्यापीठ युवा महोत्सवातील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व अभ्यासेतर उपक्रम समिती समन्वयक प्रा. संतोष मराठे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. तसेच सांस्कृतिक स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.दीपाली नागवेकर, समिती सदस्य - प्रा. अजिंक्य मुलुख, प्रा. प्रियांका साळवी, प्रा. अनिरुद्ध सुतार, प्रा. विश्वेश जोशी, प्रा. ऋजुता जोशी, प्रा. स्वाती देपोलकर, प्रा.तेजस मेहता यांनी विशेष मेहनत घेतली.