Shri Y R Kutrekar Madhyamik Vidyalay Panchanadi

Shri Y R Kutrekar Madhyamik Vidyalay Panchanadi Secondary

*श्री.यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय, पंचनदी*-------------------------------------------------  *माध्यमिक शाला...
09/05/2026

*श्री.यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय, पंचनदी*
-------------------------------------------------
*माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026 निकाल*

प्रथम क्रमांक :
* 1)कु.घुबडे मानस महादेव 89.40 %*
द्वितीय क्रमांक :
*2)कु.खळे ओम अजित 83.80%*
तृतीय क्रमांक :
*3)कु. कासेकर श्रेया दिनेश 79.80 %*

*शाळेचा निकाल 100 %*

4) कु. महाडीक श्रेया उमेश 76.20%
5) कु. कदम तन्वी रविंद्र 73.80%
6) कु.गुरव तन्मय संजय 67.80%
7) कु. शिबे स्मित भरत 67.80%
8) कु. म्हातले दिव्या दिलीप 67.00%
9) ) कु.गोसावी अथर्व प्रफुल्ल 60.80%
10) कु. कलमकर सुजल प्रवीण 60.20%
11) तन्वी संजय गुरव 60.00%

12)कु.बामणे अनिकेत संदीप 60.00%
13) कु.चव्हाण शर्वरी महेश 58.60%
14) कु. म्हातले अनुष्का अरुण 58.40%
15) गोवळे शर्वरी संजय 55.00%
16) कु. येलवे आर्या अनंत 54.40
17) कु. मुकनाक प्राची दीपक 54.20%
18) सृष्टी राजेश शिगवण 52.80%
19) कु.पाते रितू अनिल 48.20%
20) कु. नरवणकर श्रेया तुषार 47.40%
21) कु.कर्देकर हर्षद अनंत 36.00%*श्री.यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय, पंचनदी*
-------------------------------------------------
*माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026 निकाल*

प्रथम क्रमांक :
* 1)कु.घुबडे मानस महादेव 89.40 %*
द्वितीय क्रमांक :
*2)कु.खळे ओम अजित 83.80%*
तृतीय क्रमांक :
*3)कु. कासेकर श्रेया दिनेश 79.80 %*

*शाळेचा निकाल 100 %*

4) कु. महाडीक श्रेया उमेश 76.20%
5) कु. कदम तन्वी रविंद्र 73.80%
6) कु.गुरव तन्मय संजय 67.80%
7) कु. शिबे स्मित भरत 67.80%
8) कु. म्हातले दिव्या दिलीप 67.00%
9) ) कु.गोसावी अथर्व प्रफुल्ल 60.80%
10) कु. कलमकर सुजल प्रवीण 60.20%
11) तन्वी संजय गुरव 60.00%

12)कु.बामणे अनिकेत संदीप 60.00%
13) कु.चव्हाण शर्वरी महेश 58.60%
14) कु. म्हातले अनुष्का अरुण 58.40%
15) गोवळे शर्वरी संजय 55.00%
16) कु. येलवे आर्या अनंत 54.40
17) कु. मुकनाक प्राची दीपक 54.20%
18) सृष्टी राजेश शिगवण 52.80%
19) कु.पाते रितू अनिल 48.20%
20) कु. नरवणकर श्रेया तुषार 47.40%
21) कु.कर्देकर हर्षद अनंत 36.00%
--------------------------------------------🌸💐🌷🌸💐🌷🌸💐🌷
*संस्थेच्या विविध उपक्रमांना नेहमीच सहकार्याचा हात पुढे करणाऱ्या आपणा सर्वांचे संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार*🌷💐🌸🙏🌸💐🌷
🌷💐🌸🙏🌸💐🌷

06/04/2026
श्री यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदीचा विद्यार्थी कुमार धिरज तुकाराम पाते देशसेवेत दाखल हार्दिक अभिनंदन ...
24/09/2024

श्री यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदीचा विद्यार्थी कुमार धिरज तुकाराम पाते देशसेवेत दाखल हार्दिक अभिनंदन 🎉🎊

* *पंचनदी हायस्कूलच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम* लोकमान्य लोकोपकारक मंडळ संचलित,*  *श्री यशवंत रामचंद्र कुटरेकर म...
30/05/2024

* *पंचनदी हायस्कूलच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम*

लोकमान्य लोकोपकारक मंडळ संचलित,*
*श्री यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी*
*एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२४ चा निकाल*
*शाळेचा निकाल 100℅*
*परीक्षेला बसलेले विद्यार्थी - 32*
*उत्तीर्ण झालेले विद्यार्थी - 32*
*विशेष प्राविण्य मिळवलेलेn प्रदीप शिंदे - 97 %*
**द्वितीय क्रमांक - कुमारी प्राची विजेंद्र रेवाळे - 83.60%*
*तृतीय क्रमांक- कुमारी तन्वी राजेश रेवाळे - 81.00 %*
*प्रशालेतून प्रथम आलेला विद्यार्थी हा दाभोळ केंद्रातून देखील प्रथम आलेला आहे त्याचे व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच पालकांचे लोकमान्य लोकोपकारक मंडळाचे अध्यक्ष श्री हरिश्चंद्र कुटरेकर उपाध्यक्ष श्री दिनेश शिंदे कोषाध्यक्ष श्री प्रकाश जाधव कार्यवाह श्री पद्माकर मयेकर सह कार्यवाह श्री अविनाश भांबीड शाळा समिती अध्यक्ष श्री सुनील देवळेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री उत्तम येलवे संस्था सदस्य तथा पंचायत समिती माजी सदस्य श्री सुंदर राणे श्री पंढरीनाथ जावळे , श्री उदय मयेकर श्री एकनाथ नाचरे श्री अजित खळे श्री प्रभाकर काष्टे संस्थेचे विश्वस्त श्री अनंत कुटरेकर श्री कृष्णकांत भांबीड श्री अवधूत जोशी यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले कुमार प्रियेश शिंदे याने दाभोळ केंद्राबरोबर तालुकास्तरावर देखील अव्वल स्थान पटकावल्याबद्दल त्याचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे
💐💐💐💐💐💐🌸🌸🌸🌸🌸💐💐💐💐💐*

https://youtu.be/TYj4M2-WAFk?si=6FZnquc2bjcnIV7L
03/11/2023

https://youtu.be/TYj4M2-WAFk?si=6FZnquc2bjcnIV7L

*मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर म्हणजे पंचनदी आणि दशक्रोशीतील रुग्णांना आरोग्यमय जीवनाची संजीवनी* श्री.यशवंत ...

*मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर म्हणजे पंचनदी आणि  दशक्रोशीतील रुग्णांना आरोग्यमय जीवनाची संजीवनी*    गुरुवार दि.19 ऑ...
28/10/2023

*मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर म्हणजे पंचनदी आणि दशक्रोशीतील रुग्णांना आरोग्यमय जीवनाची संजीवनी*
गुरुवार दि.19 ऑक्टोबर 2023 ते शनिवार दि.21 ऑक्टोबर 2023 या दरम्याने श्री.यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय, पंचनदी या प्रशालेत लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी , माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे तसेच कुणबी ऋणानुबंध सेवा संस्था दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दशक्रोशीतील ग्रामीण रुग्ण , गरीब,गरजू व तातडीची आवश्यकता भासणाऱ्या 350 पेक्षा जास्त रुग्णांना भारत देशातील विविध शहरांतील नामांकित डॉक्टर यांनी टेलिमेडिसीन सेन्टर द्वारे तपासले. मोफत तपासणी , लोढा व्हेंचर फौंडेशनद्वारे औषधे व रुग्णांना ने - आण करण्याची सुविधा कुणबी ऋणानुबंध सेवा संस्था दापोली यांनी ग्रामीण भागातील वयोवृद्ध रुग्णांना उपलब्ध करून दिली होती.
डीजी स्वास्थ फाऊंडेशनचे श्री.दिव्यांशू गुप्ता , श्रीम.साथी बिस्वास , श्रीम.शिवानी माळी , श्रीम.ज्योती पाटील यांनी तीन दिवस 350 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद करून घेऊन भारतातील नामांकित तज्ञ डॉक्टर श्री.रवी लंगडे सर , डॉ. रुपाली शर्मा , डॉ. अर्चना पाथरे , डॉ. अनुषा अग्रवाल , डॉ. लीना सक्सेना , डॉ. शिवांगी यांच्यासोबत टेलिमेडिसिनद्वारे संपर्क केला. ज्यामुळे प्रत्यक्ष रुग्ण आपले आजारांविषयी डॉक्टरांसोबत बोलू शकले.त्या अनुषंगाने डॉक्टरांनी त्यांना विविध आरोग्यमय सल्ले दिले व औषधोपचार सांगितले.
डीजी स्वास्थ फाऊंडेशनच्या सर्व मंडळींची राहण्याची उत्तम सोय गावातील श्रीम.अमिषा मयेकर ,श्री.अलंकार मयेकर , श्री.दातार यांनी केली.
आरोग्य शिबिरातील उच्च प्रतीच्या सुविधांमुळे , नामांकित डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे व त्यांच्या सल्ल्यामुळे सर्व रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
सदर मोफत आरोग्य शिबिराची वाहवा सर्व नागरिकांतून ऐकायला मिळाली.त्याचबरोबर अनेक मान्यवर मंडळींनी आरोग्य शिबिराला प्रत्यक्ष भेट देऊन समाधान व्यक्त केले. दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे अधीक्षक श्री.तुषार पाचपुते साहेब , गुंज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री.अविनाश चौहान सर , गुंज फाऊंडेशन रत्नागिरी जिल्हा प्रमुख श्री.विजय दुर्गावळे सर , श्री.मयूर नाक्ती सर , श्री.प्रथमेश नाटुस्कर सर , लोढा व्हेंचर चे श्री.ललित मोहन सर , श्री.सतीश गिरी सर , डॉ. सुरज राठोड , श्रीम.पूर्वी शिगवण, श्री.नवनीत कदम , श्री.प्रशांत घुगे सर , श्री.राजेश फोगट सर , तसेच दाभोळ PHC चे डॉक्टर श्री.वैभव पंडीत, श्री.शुभम बंदरकर , भाटकर आणि वराडकर सिस्टर यांनी मोफत आरोग्य शिबिराला सदिच्छा भेट दिली व आनंद व्यक्त केला.
तिसऱ्या व अंतिम दिवशी संतोष अबगुल प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने व श्री.यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदीच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात 47 रक्त पिशव्या दात्यांनी दान स्वरूपात दिले.रक्तदान करण्यासाठी पंचनदी , बोरीवली ,आघारी , वनौशी , दाभोळ , मळे इत्यादी गावांतून व दापोली तालुक्यातून अनेक रक्तदाते उपलब्ध झाले होते.

*पंचनदी हायस्कूलमध्ये डीजीस्वास्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर आयोजन* 🚑🩺💊💉🩸🩺💊💉🚑    गुरुवार *दि.19 ऑक्टोबर त...
14/10/2023

*पंचनदी हायस्कूलमध्ये डीजीस्वास्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर आयोजन*
🚑🩺💊💉🩸🩺💊💉🚑

गुरुवार *दि.19 ऑक्टोबर ते शनिवार दि.21 ऑक्टोबर 2023* रोजी *लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी*,*माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे* व *कुणबी ऋणानुबंध सेवा संस्था दापोली* यांच्या संयुक्त आयोजनेतून व *डीजी स्वास्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून* ग्रामीण भागातील जनतेला *मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन* करण्यात आलेले आहे.
मुंबई ,पुणे ,मिरज , कोल्हापूर यांसारख्या महानगरांत अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत याचं धर्तीवर *पंचनदी दशक्रोशीतील ग्रामीण भागातील रुग्णांना कर्करोग ( कॅन्सर ) , दमा , मधुमेह , सांधेदुखी , विविध त्वचारोग ,छातीतील कळा , एच.आय.व्ही.इत्यादी आजारांवर टेलिमेडिसिन सेंटरद्वारे आधुनिक सुविधा* मोफत उपलब्ध करून देत आहोत.
*महिला / मुलींसाठी स्त्री रोगतज्ज्ञ , फिजिओथेरपिस्ट / मानसोपचार तज्ज्ञ यांचा सल्ला व कर्करोग ( कॅन्सर ) रुग्णांसाठी विशेष व्यवस्था आयोजित* करण्यात आली आहे.
सर्व ग्रामस्थ रुग्णांची तपासणी केली असता लागणारे *मोफत औषधे लोधा व्हेंचर फाउंडेशन* यांच्या माध्यमातून *श्री.सतीश कुमार गिरी व श्री. ललित मोहन* यांच्या उपस्थितीत पुरविण्यात येणार आहेत.
टेलिमेडिसिन सेंटरद्वारे *टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई , होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल वाराणसी, लिलावती हॉस्पिटल मुंबई , औरंगाबाद , सफदरजंग हॉस्पिटल नवी दिल्ली , के.इ.एम.हॉस्पिटल मुंबई , अहमदाबाद गुजरात , दुबई , जे.जे.हॉस्पिटल मुंबई , ओम फॅमिली क्लिनिक गुरुग्राम , हिंदुजा हॉस्पिटल मुंबई , लखन* इत्यादी ठिकाणचे नामांकित तज्ज्ञ डॉक्टर यांचे सल्ले सर्वांना फायदेशीर ठरणार आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देत असल्याने सर्वांनी याचा फायदा घ्यावा व आरोग्य विषयी निश्चिंत रहावे असे आवाहन लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी ,
माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे व कुणबी ऋणानुबंध सेवा संस्था दापोली यांनी केले आहे.
दि. 18 ऑक्टोबर 2023 पर्यंत खालील क्रमांकांवर *नोंदणीसाठी संपर्क* करावा.
1. *श्री.सुनील देसाई* ( मुख्याध्यापक - श्री.य.रा.कुटरेकर माध्यमिक विद्यालय ,पंचनदी ) 9765022588
2. *श्री.महेश पारदुळे* ( कुणबी ऋणानुबंध सेवा संस्था , दापोली ) 9082196758
3. *माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे* 8275188414
4. *श्री.प्रशांत जोशी* 9372573122
🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥

03/09/2023

*सिलेंडर देणगीदारांमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनाची झाली सुयोग्य व्यवस्था*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पंचनदी गावातील *लोकमान्य लोकोपकारक मंडळ* चालवीत असलेले *वाशिष्टी कन्या छात्रालय, पंचनदी* व *सागरपुत्र विद्यार्थी वसतिगृह , पंचनदी* या दोन्ही वसतिगृहात एकूण 40 विद्यार्थी प्रवेशीत असून *सर्व विद्यार्थी हे गरीब , गरजू व आर्थिकदृष्टय़ा कमजोर* असलेल्या कुटुंबातील आहेत.काही विद्यार्थ्यांना पालक नसून ते *अनाथ* आहेत.अशा *विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय* लोकमान्य लोकोपकारक मंडळ , पंचनदी या संस्थेने केली आहे.
मुलींच्या वसतिगृहातील 23 मुली व मुलांच्या वसतिगृहातील 17 मुले यांच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय केल्याने लोकमान्य लोकोपकारक मंडळावर प्रचंड आर्थिक ताण पडत होता. याकरिता वर्षभर लागणाऱ्या इंधनासाठी एकूण 60 सिलेंडर मिळण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद म्हणून *वार्षिक रु.1200 /- एका सिलेंडर साठी* असे एकूण 90 देणगीदार मिळाले. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यार्थ्यांच्या जेवणासाठी इंधन खर्च तर नक्कीच भागला असून इतर खर्च अन्नधान्य , तेल, तांदूळ यासाठी सुद्धा आवाहन करण्यात येत आहे.
सिलेंडर देणगीदार मिळवून देण्यासाठी *माजी विद्यार्थी श्री.गणेश पदुकले* यांनी *एकूण 25 देणगीदार मिळवून मोलाचा वाटा* उचलला. त्याचबरोबर *श्री.महेश वतारी , श्री.राजेंद्र रहाटे , श्री.सागर मंडलिक , श्री.हरिश्चंद्र कुटरेकर व कुटुंबीय* यांनी मोलाची कामगीरी केली आहे.
सदर *सिलेंडर देणगीदार हे केवळ कोकण भागातले नसून संपूर्ण महाराष्ट्रातील* व *काही परराज्यातील* असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
*76 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिलेंडर देणगीदार नामफलकाचे अनावरण* करण्यात आले.
सिलेंडर देणगीदार मिळविण्यासाठी लोकमान्य लोकोपकारक मंडळ , पंचनदी , श्री.यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय ,पंचनदीचे मुख्याध्यापक , शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी , माजी विद्यार्थी , ग्रामस्थ मंडळ व हितचिंतक यांनी आवाहन केले होते.त्याचे फलित म्हणून एकूण वार्षिक 90 देणगीदार प्राप्त झाले.त्याबद्दल *संस्था अध्यक्ष श्री.हरिश्चंद्र कुटरेकर व सर्व संस्था प्रतिनिधी* तसेच शाळा *मुख्याध्यापक श्री.सुनिल देसाई सर* यांनी *सर्व देणगीदार व हितचिंतक यांचे आभार* मानले .नामफलक अनावरणाच्या वेळी संस्था अध्यक्ष श्री हरिश्चंद्र यशवंत कुटरेकर पंढरीनाथ धोंडू जावळे श्री सुंदर बाबाजी राणे उत्तम सखाराम येलवे व मधुकर यशवंत कुटरेकर हे उपस्थित होते

13/08/2023
*ए एस व्हेंचरच्या सुनील जावळे यांची पंचनदी हायस्कूलला सदिच्छा भेट *       मुंबई येथील ए एस व्हेंचर या सोलर सिस्टीम  पुरव...
10/08/2023

*ए एस व्हेंचरच्या सुनील जावळे यांची पंचनदी हायस्कूलला सदिच्छा भेट *
मुंबई येथील ए एस व्हेंचर या सोलर सिस्टीम पुरवठा व्यवसायिक श्री सुनील जावळे यांनी नुकतीच लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी च्या शैक्षणिक परिवारास सदिच्छा भेट दिली .याप्रसंगी त्यांच्यासोबत पालवकर ट्रॅव्हल्स चे विजय पालवकर व श्री संजय गोरीवले हे होते
कोकणातून मुंबईमध्ये जाऊन प्रामुख्याने वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये स्थिरावलेले अनेक जण आहेत परंतु या सर्वांपेक्षा वेगळी वाट व नोकरी एके नोकरी याला फाटा देत श्री सुनील गोरिवले यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आज भारतभर ते सोलर सिस्टिमच्या माध्यमातून सेवा पूरवित आहेत .आपल्या व्यवसायातून त्यानी दापोली तालुक्यातील किमान दहा लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलेला आहे. अतिशय माफक दरात सेवा उपलब्ध करून देताना दापोली तालुक्यातील देव हे व माटवण येथील दोन गरजूंना सोलर सिस्टिम उपलब्ध करून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे कुणबी चेंबर ऑफ कॉमर्सचे ते पदाधिकारी असून कुणबी ऋणानुबंध मध्ये संतोष अबगूल प्रतिष्ठान मध्ये देखील ते सक्रिय असतात अशा व्यक्तिमत्त्वाचा श्री लोकमान्य लोककारक मंडळ पंचनदी यांचे मार्फत त्यांच्या वेगळ्या विचाराबद्दल प्रगतीबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यानी संस्थेचे उपक्रम जाणून घेतले .संस्था संचलित मुलींच्या वाशिष्ठी कन्या छात्रालय या वसतीगृह साठी चार्जेबल दहा बल्ब देणगी रुपात उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.ज्याचे बाजारमूल्य 5000रू आहे. सत्कार प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री हरिश्चंद्र यशवंत कुटरे कर संस्था सदस्य सुंदर बाबाजी राणे पंढरीनाथ जावळे प्रशांत मुख्याध्यापक श्री सुनील देसाई तसेच श्री प्रकाश खळे हे उपस्थित होते
सत्कारानंतर श्री सुनील जावळे व्यक्त केलेले मनोगत

मी सुनील जावळे . कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गावरई गावामध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. हायस्कुल शिक्षण घेत असताना रोज तीन तास पायी जाऊन आपले दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले . आपल्या कोकणात असे अनेक अनिल गोरीवले यांच्यासारखे दानशूर व्यक्ती असतील ज्यांनी कोणताही स्वार्थ न बघता केवळ आपल्या गावातील तरुणाला करियरच्या दृष्टिकोनातून योग्य ती दिशा मिळावी यासाठी प्रयत्न केले असतील . १९९८ साली अनिल गोरीवले यांनी स्वखर्चाने मला मुंबईला आणले आमच्या गावच्या सार्वजनिक खोली मध्ये राहायची व्यवस्था केली . दरम्यान इलेक्ट्रिकल वायरमन चे काम शिकलो मग इलेक्ट्रिकल क्षेत्रातच आवड असल्यामुळे १९९८ ते २००६ दरम्यान एक खाजगी कंपनीत वायरमन म्हणून काम केले . २००६ अखेरीस पुणे येथे श्री दशरथ दादा कांबळे यांच्या ओळखीने श्री काळीलकर यांच्या प्रोजेक्टचे काम घेतले पूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडणे खूप मोठे आव्हान होते प्रोजेक्टसाठी ५० कामगारांना हाताळणे त्यांच्यावर लक्ष देणे त्यांच्याकडून काम करवून घेणे तारेवरची कसरत होती आणि ते मी योग्य रीतीने करत देखील होतो . परंतु दरम्यानच्या काळात इलेकट्रीकल क्षेत्रात कॉन्ट्रॅक्टर म्हणून मराठी माणूस क्वचितच होता आणि मी तेच शिवधनुष्य पेलत होतो आणि हे प्रस्थापित कॉन्ट्रॅक्टर लॉबीला पटत नव्हतं आणि त्यांनी कामगारांना बाहेरच्या बाहेर गाठून काहींना अमिश दाखवून तर काहींना अन्य कारण दाखवून सदर प्रोजेक्ट बंद करण्यास मला भाग पाडले आणि त्याचा विपरीत परिणाम माझ्या आयुष्याच्या जीवनशैलीवर देखील होत होता माझे खाजगी आयुष्य आणि माझी गावाकडे देखील असणारी ओढ दरम्यानच्या काळात कमी झाली होती पण असं म्हणतात कि देव पण आपली परीक्षा घेत असतो कि तुम्ही व्यवसायाच्या चढ उतारामध्ये किती टिकून राहता आणि शेवटी देवावर श्रद्धेचा भाग आणि स्वतःवरील आत्मविश्वासाच्या जोरावर कठीण काळात देखील छोटी मोठी मार्क करत असताना माझी ओळख २००९ साली गुहागर तालुक्यातील श्री महेश भोसले यांच्याशी झाली आणि माझ्या मदतीने जो प्रोजेक्ट २००६ ला चालू केला होता तो २००७ ला बंद झाला होता तोच प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मला कॉन्ट्रॅक्टर म्हणून नव्हे तर कॉन्ट्रॅक्टर सुपरवायजर म्हणून अपॉईंट केले गेले आणि माझ्या आयुष्याला पुन्हा कलाटणी मिळाली . त्यानंतर व्यवसायाचा चढता आलेख चालू झाला आणि पुन्हा कोरोना काळात आपल्या सर्वांच्याच व्यवसायाला त्याचा फटका बसला तास मलाही बसला परंतु मी कोरोना काळात देखील मुंबई वाशी मार्केट मधून भाजी कांदे बटाटे गावी जाऊन विकले आहेत आणि गावाहून येताना कधी मच्छी तर कधी कलिंगड आणून मुंबईला ओळखीच्या लोकांमध्ये वॉट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला माल संपवून व्यवसाय चालूच होता . कोरोना नंतर पुन्हा सर्व सुरळीत चालू आहे . आता मला नुकतेच ५ महिन्यापूर्वी बंगलोर (कर्नाटक ) ला एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे आणि माझा मागचा कटू आणि गोड अनुभव चा विचार करून माझी व्यवसायातील घोडदौड चालू आहे . आणि सर्वात महत्वाचं आपल्याला सांगायचं राहून गेलाच माझा मूळ व्यायवसाय जरी इलेकट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असेल तरीही माझी ओळख सौर उर्जेवर लागणारे दिवे म्हणजे सोलर लाईट चा व्यवसाय करणारा एक व्यवसायिक म्हणून देखील आहे .आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाला देखील आपण देणे लागतो आणि म्हणूनच सामाजिक बांधिलकी जपत असताना काही काम हि मी नो प्रॉफिट नो लॉस वर देखील करत असतो . चांगली सर्व्हिस देणे हेच माझ्या ए एस व्हेंचर चे ध्येयय उद्दिष्ट आहे . एवढं मात्र नक्की ओळखीतून व्यवसायांची देवाणघेवाण होते आपण देखील सोलर स्ट्रीट लाईट असो किंवा होम सोलर असो किंवा इलेकट्रीकल कॉन्ट्रॅक्ट असो आपण देखील आम्हास रेफरन्स द्यावेत हीच अपेक्षा बाळगतो. माझं नुकतेच दहावी बारावी पदवीधर तरुणांना क्रिकेटर तरुणांना एकाच सांगणे असेल कि नोकरीची मानसिकता सोडा व्यवसायाची कास धरा .

आपला
श्री सुनील जावळे
९९६७७३८८२२

Address

Panchanadi
Dapoli
415712

Telephone

+919765022588

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Y R Kutrekar Madhyamik Vidyalay Panchanadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Y R Kutrekar Madhyamik Vidyalay Panchanadi:

Shortcuts

Share

Category