08/02/2018
प्रिय शाळेस...
(भैरवनाथ विघालय तोंडले ता. माण. जि सातारा )
ओळखलस का मला... एके काळी तुझ्याच अंगणात खेळलेला, बागडलेला मी तुझा एक माजी विद्यार्थी... तुझ्या सहवासात असतांना तुला खूपदा औपचारिक पत्र लिहिली... पण, आज मुद्दाम तुला हे अनौपचारिक पत्र लिहित आहे... कारण, मला येणारी तुझी आठवण औपचारिक पत्रात नीटशी व्यक्त करता येणार नाही... १० वी च्या परीक्षेनंतर तुझ्यापासून दूर जात होतो पण, त्यावेळी त्याच इतकसं दुःख मला जाणवलं नव्हतं कारण, ‘शाळा’ नावाच्या पिंजऱ्यातुन माझी आता एकदाची सुटका होणारं... आता आकाशात मी स्वच्छंद भरारी घेणार... या कल्पनेनच मी सुखावलो होतो... पण तुला सांगू का... या धकाधकीच्या, धावपळीच्या जगरहाटीच्या आकाशापेक्षा तुझा तो पिंजराच खूप सुरक्षित होता याची आता मला जाणीव होतेय... मला तुझ्या या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा अडकायचंय... पाठीवर पोत्याच् दप्तर घेउन तुझ्याकडे यायचंय.... ते राष्ट्रगीत, ती प्रतिज्ञा,समुहगीत आणि प्रार्थना जोर जोरात म्हणायचीय... आणि फळ्यावर सुंदर अक्षरात एक सुविचारही लिहायचाय... शनिवारच्या सकाळच्या शाळेत उशिरा यायचय.....निलगिरिचा पाला वेचुन शेकत बसायचय..... करंजावर जाऊन सुर पारंब्या खेळायच्यात..... जाऊन बोर खायच्यात.....गाबुळक्या चिंचा पाडून पाडुन खायाच्यात.....शाळेच्या मैदानात झाडे लावयची आहेत.....चिखलात खेळायच आहे.....शाळेत कान-धरणी,ओपिंगो-बैठिंगो,आबा-धबी,सोन-साखळी,शिवना पाव्हनी,डोंगर-पाणी,चोर-पोलिस यासारखे खेळ मनमुराद खेळायचे आहे.... स्कॉलर शिप NTS च्या परिक्षेचा खुप अभ्यास करायचा आहे....exctly म्हणुन गणिते पटपट सोडवायची आहेत.... विज्ञानाचे दोरगे सरांनी केलेले प्रयोग कुतूहलाने पाहायचेत... बैजिक राशी अन् भूमितीची प्रमेयं सोडवायचीत... मंत्रमुग्ध करणारा इतिहास ऐकायचाय... आणि हो मराठीचं व्याकरण, आणि पत्रलेखन शिकायचेय.... मधल्या सुट्टीतला पिवळा भात आणि च्या डब्यातल्या सांडगा घेऊन खायाचय..... आणि मित्रांचा डबा खायचाय... पीटीच्या तासाला मनसोक्त कबड्डी, खो-खो खेळायचंय ग्रंथालयातली गोष्टीची छान पुस्तक वाचायचीत... आणि एखाद्या मोकळ्या तासाला बाकावर कान ठेवून धताड़ तताड़ वाजवायचाय...... हातात पेन घेऊन वर ख़ाली हालवाचाय...... सिटी मारदान शाडाला म्हणाचय.... स्वातंत्र्य दिनाला स्वच्छ गणवेशात झेंडावंदन करायचंय..... गणपती डोक्यावर घेऊन नाचायचय...... वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण करायचंय... रांगोळी स्पर्धेत नंबर मिळवायचा आहे..... स्काउट गाईड च्या कॅम्पला जकात वाडीला जायचय.... बेडेन पॉवेल तेरे बच्चे हम गायाचय..... वार्षिक स्नेहसंमेलनातील तिचा....विक्याचा नाच बघायचाय... आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात एकदो करतही चालायचय... माने सरांचा मार खायाचाय.... मला माने सरांच्या उलट्या हातावर छड्या घ्यायच्यात शिंदे सरांबरोबर लेमन गोळ्या खायच्यात...... वाघमोडे सरांकडून मला भूमिती शिकायचेय..... माने सरांकडून मला इंग्रजी बोलायला शिकायचेय...... घाडगे सरांनी सांगितलेल्या इतिहासात रमायच आहे.... तासात गान्याच्या भेंड़या खेळायच्या आहेत... सहलीला जाऊन नुसती धम्माल करायचीय... परीक्षेच्या आधी खूप सारा अभ्यास करायचाय... आणि पुरवण्या जोडलेली उत्तरपत्रिकाही लिहायचीय... खरतरं मला तुझ्या सानिध्यात घालवलेल्या एकूणच क्षणांची पुनरावृत्ती करायचीय... तुझ्या सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायचेत... यासाठी तू मला परत तुझ्याकडे बोलावशील का ? निरोप समारंभाच्या वेळी मुख्याध्यापक सर म्हणाले होते “तुमचे शाळेतले दिवस हे सुवर्णाक्षरात कोरलेले दिवस आहेत.. कितीही किंमत मोजलीत तरी ते तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाहीत...” त्यामुळं तुझ्यासोबत घालवलेले ते मौल्यवान क्षण माझ्या वाटेला परत येणार नाहीत... याचीही मला अगदी पुरेपूर जाणीव आहे... पण, मला तुझे मनापासून आभार मानायचेत... या समाजाच्या अथांग आकाशात झेप घेण्यासाठी तू माझ्या पंखांना बळ दिलेस... माझ्यातील नीतिमूल्यांचा तू आविष्कार घडवलास... माझ्यात जे काही चांगल आहे हे तुझ्याचं संस्कारांचं देण आहे... आणि याकरिता मी तुझा सदैव कृतज्ञ राहील... माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक यशातून मी तुझे नाव उंचावण्याचा नक्की प्रयत्न करेल... तुझा आजन्म असलेला एक मागच्या बाकावर बसनारा विद्यार्थी महादेव साप्ते..... Bhairavnath Vidyalaya,Tondale .V.Tondale