Grammangal

Grammangal All about Education - the non-formal way ... In 1982 renowned educationists Padmashree Anutai Wagh and Prof.

Ramesh Panse established GRAMMANGAL (GM) at Dabhon, Taluka Dahanu, District Thane, Maharashtra. It is a backward area with predominantly tribal population. GM has its roots in the pioneering efforts of Gijubhai Badheka, Sarladevi Sarabhai, Tarabai Modak and others who started in 1926 the first national movement for spreading Early Childhood Education on scientific basis. The thrust of the movement

was to provide joyful learning experience to children. The primary focus was on serving the Tribal and Rural India. A number of International and National Agencies and a large number of schools have availed of GM expertise in the form of consultancy projects. In tribal belt, GM commenced its developmental activities with roads, bridges, electrification, water and employment generation for tribal youths. Having won confidence of the target population, for all further work the focus was on providing quality education to those deprived of it.

सहअध्ययन वर्ग - बालवाडी ते दुसरी ग्राममंगल स्नेहनगरी ऐने येथे सहअध्ययन वर्गाची आज 4 मे रोजी सुरवात झाली.
04/05/2026

सहअध्ययन वर्ग - बालवाडी ते दुसरी
ग्राममंगल स्नेहनगरी ऐने येथे सहअध्ययन वर्गाची आज 4 मे रोजी सुरवात झाली.

24/04/2026

ग्राममंगल संचालित अनुताई वाघ शिक्षण केंद्र, विक्रमगड येथे दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी शैक्षणिक प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये ‘ मासा ‘ व ‘ कीटक ‘ या दोन प्रकल्पांची मांडणी करण्यात आली होती.
बालवाडी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध घटक व संकल्पनांवर आधारित कृतीयुक्त शिक्षणाची उत्कृष्ट मांडणी या प्रदर्शनामध्ये पहायला मिळाली.
एकच प्रकल्प बालवाडी पासून दहावी पर्यंत काठिण्य पातळी वाढवीत, सखोल अभ्यासात्मक कसा बनवता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे प्रदर्शन.
तसेच अनुताई वाघ शिक्षण केंद्रातील ३ शिक्षकांनी मुलांबरोबर केलेले संशोधन पेपर देखील या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. प्रदर्शनास पालक, परिसरातील बालवाडी, प्राथमिक चे शिक्षक, केंद्रप्रमुख, मुक्तशाळा ऐने येथील कार्यकर्ते यांनी भेट दिली.


ग्राममंगल संचालित अनुताई वाघ शिक्षण केंद्र, विक्रमगड येथे दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता भव्य शैक्षणिक ...
21/04/2026

ग्राममंगल संचालित अनुताई वाघ शिक्षण केंद्र, विक्रमगड येथे दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता भव्य शैक्षणिक प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये विषयानुसार विविध घटक व संकल्पनांवर आधारित कृतीतून शिक्षणाची उत्कृष्ट मांडणी पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सहभागातून आणि अनुभवातून तयार केलेली विविध शैक्षणिक कामे आपण अगदी जवळून पाहू शकता. या उपक्रमातून मुलं स्वतः शिकण्याची प्रक्रिया आत्मसात करतात आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सक्षम, आत्मविश्वासू आणि हुशार बनतात.
ग्राममंगल संस्था च्या रचनावादी शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण अधिक आनंददायी व परिणामकारक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विचारसरणीचे संस्थापक श्री. रमेश पानसे सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्व-अभ्यास, निरीक्षण आणि कृतीतून ज्ञान निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
आपण सर्वांनी या शैक्षणिक प्रदर्शनाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कौशल्यपूर्ण कार्याचा अनुभव घ्यावा, ही नम्र विनंती.

मुलांबरोबर काम करताना नेहमीच नवीन नवीन उपक्रम राबवावे लागतात जेणेकरून मुलांना त्यातून निखळ आनंद मिळत राहील. बोलक्या बाहु...
13/04/2026

मुलांबरोबर काम करताना नेहमीच नवीन नवीन उपक्रम राबवावे लागतात जेणेकरून मुलांना त्यातून निखळ आनंद मिळत राहील. बोलक्या बाहुल्या म्हणजेच puppets च्या माध्यमातून गोष्ट ऐकणे हा एक त्यातीलच उपक्रम. जो लहानग्यांन पासून अगदी ज्येष्ठांन पर्यंत सर्वांनाच खिळवून ठेवतो.
अशाच puppets (बोलक्या बाहुल्या) ग्राममंगल च्या ताई आणि दादांनी मोबाईल क्रेश च्या मार्गदर्शनाखाली बनवल्या.
दोन दिवसीय कार्यशाळेत पाण्याच्या बाटल्या, मोजे, नारळाच्या करवंट्या, कागदा, कापड, फुगे इत्यादी गोष्टींचा वापर puppets बनवण्यासाठी करण्यात आला.
नंतर दोन दोन जणांच्या गटाने स्वतः बनवलेल्या puppet चा वापर करून गोष्टीचे सादरीकरण केले.

ग्राममंगल आयोजित विज्ञान प्रयोगांवर आधारित प्रत्यक्ष(hands-on) प्रशिक्षण सहावी ते दहावी इयत्तांच्या शिक्षकांसाठी विज्ञान...
10/04/2026

ग्राममंगल आयोजित विज्ञान प्रयोगांवर आधारित प्रत्यक्ष(hands-on) प्रशिक्षण

सहावी ते दहावी इयत्तांच्या शिक्षकांसाठी विज्ञान प्रयोगांचे, चार दिवसांचे खास प्रशिक्षण आयोजित केले आहे. हे प्रशिक्षण ग्राममंगल ऐना येथे ४ ते ७ मे २०२६ या काळात होईल. जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या तज्ञ प्राध्यापकां कडून मार्गदर्शन मिळेल.

नाव नोंदणी साठी खालील गुगल फॉर्म भरावा -
https://forms.gle/rUdSqSPLPJig83Jt8

https://www.facebook.com/share/p/14YFvpRYaqj/?mibextid=wwXIfrCelanese कंपनीच्या आर्थिक सहाय्याने आणि सुगम कुलकर्णी यांच्...
08/04/2026

https://www.facebook.com/share/p/14YFvpRYaqj/?mibextid=wwXIfr

Celanese कंपनीच्या आर्थिक सहाय्याने आणि सुगम कुलकर्णी यांच्या सहकार्याने आज ग्राममंगल च्या बालवाड्यांचे, अनुताई वाघ रहात असलेली नाईकपाडा, दाभोण येथील खोलीचे नूतनीकरण करता आले. तसेच प्रत्येक बालवाडी ताईला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने वेगवेगळी प्रशिक्षणे संस्थेला राबवता आली. त्याबद्दल Celanese आणि सुगम कुलकर्णी यांचे मनापासून धन्यवाद.

ग्राममंगल टीम


ग्राममंगल - सहअध्ययन वर्ग (४ मे ते ९ मे २०२६) बालवाडी ते दुसरी पायाभूत शिक्षण आणि तिसरी ते पाचवी  प्राथमिक शिक्षण असे दो...
06/04/2026

ग्राममंगल - सहअध्ययन वर्ग (४ मे ते ९ मे २०२६)

बालवाडी ते दुसरी पायाभूत शिक्षण आणि तिसरी ते पाचवी प्राथमिक शिक्षण असे दोन सहअध्ययन कार्यक्रम आयोजित करत आहोत.
मुलांचे शिकणे म्हणजे भाषा, गणित, विज्ञान अशा विषयातील आणि सभोवतालच्या असंख्य संकल्पनांचे आकलन होणे होय. त्या संकल्पनांचा शोध घेता येणे, योग्य वापर करता येणे होय. संकल्पना आकलनासाठी खेळ, कृती, साधने यांचा उपयोग होत असतो. पायाभूत व प्राथमिक शिक्षणातील संकल्पना त्यातील अडचणी आणि त्या दूर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृती असा अध्ययन अध्यापनाचा प्रवास समजून घेण्यासाठी, संकल्पनाधारित सहअध्ययन कार्यक्रमाचा उपयोग होईल. या प्रशिक्षणातील आशय राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून आहे.

आज बालशिक्षण तज्ञ पद्मश्री अनुताई वाघ यांची ११६वी जयंती त्यांच्या अतुलनीय कार्यास विनम्र अभिवादन.ग्राममंगल च्या उभारणीत ...
17/03/2026

आज बालशिक्षण तज्ञ पद्मश्री अनुताई वाघ यांची ११६वी जयंती त्यांच्या अतुलनीय कार्यास विनम्र अभिवादन.

ग्राममंगल च्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज त्यांची जयंती पूर्ण महाराष्ट्रभर साजरी केली जातेय. ग्राममंगल शाळेतील सर्व शिक्षक, मुलांनी, कार्यकर्त्यांनी ही अनुताईंच्या प्रतिमेला अभिवादन करून हा दिवस साजरा केला. तसेच शाळेतील काही मुली आणि शिक्षकांनी मिळून सिंधुताई अंबिके यांनी अनुताईंवर लिहिलेली कविता सादर केली.

या कार्यक्रमास सिंधुताई अंबिके यांचे पुत्र दिलिप अंबिके व त्यांच्या पत्नी उपस्थित होते.

धन्य धन्य माऊली, अनुताई गावली

तारा ताईंची शिष्य थोर कीर्ती जाहली ||

रानी वनी ती फिरली कधी नाही हो थकली

दीन दलीत बालके त्यांची झाली साउली||

सत्कार्य ती दक्ष संस्थेची ही साक्ष

सर्व ठायी हो लक्ष रात दिन ती जागली||

देव, धर्म, भूत दया सेवे झिजली काया

मूक बधिर बाळांना आई थोर लाभली||

कोणी लक्ष्मीधर येवो, कोणी गरीब गरजू

नाही तेथे भेदभाव, सम समान वागली||

सिंधुताई अंबिके

Address

Snehanagari Aine, Tal. Dahanu, Dist. Palghar
Dahanu
401607

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm

Telephone

+919168644995

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grammangal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Grammangal:

Shortcuts

Share

Category