Pankaj Arts and Science College Chopda

Pankaj Arts and Science College Chopda Pankaj Arts ,Science and Commerce College is established in the year 2000. The College achieved many milestones in 25 years.

The college is awarded with B+ grade by NAAC and it is having a Permanent affiliation of KBC NMU Jalgaon

21/08/2026
पंकज महाविद्यालय, चोपडा व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक द...
19/08/2026

पंकज महाविद्यालय, चोपडा व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय Research Methodology या राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, व्यासपीठावर उपस्थित प्रा.डॉ .नितीन बारी सर , (माजी व्यवस्थापन परिषद सदस्य , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) व डॉ. गजानन पाटील, (सिनेट सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) , डॉ.विजय तुंठे( माजी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष) श्री नानासाहेब एम व्ही पाटील, प्राचार्य मिलिंद पाटील, प्राचार्य प्रकाश माळी, प्राचार्य डॉ. एम के वाघमोडे व समन्वयक डॉ.संजय पाटील

15/08/2026
15 August 2026 Celebration of Independence Day at Pankaj College, Chopda
15/08/2026

15 August 2026 Celebration of Independence Day at Pankaj College, Chopda

*व्यसन हे केवळ शरीराचा नाश करत नाही, तर कुटुंब व  समाज उद्ध्वस्त करते.**मा. शितल दीदी*पंकज कला विज्ञान वाणिज्य महाविद्या...
10/08/2026

*व्यसन हे केवळ शरीराचा नाश करत नाही, तर कुटुंब व समाज उद्ध्वस्त करते.*
*मा. शितल दीदी*
पंकज कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, चोपडा,पंकज उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा, ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय, तसेच महाविद्यालयातील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी पंकज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथे दहा करोड नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे तर प्रमुख मार्गदर्शक मा. शितल दीदी व मा‌.करिष्मा दीदी होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर पाठक यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने देशव्यापी ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ अत्यंत उत्साहात आणि गांभीर्याने राबवले जात आहे. समाजाला व्यसनमुक्त करून एक निरोगी, सशक्त आणि समृद्ध भारत घडवणे हा या महाअभियानाचा मुख्य उद्देश आहे असे सांगितले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या स्वागत सत्काराच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मा.शितल दीदी यांनी सांगितले की, देशातील तब्बल १० कोटी लोकांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देऊन त्यांना सकारात्मक जीवनशैलीकडे वळवणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ब्रह्माकुमारी संस्थेच्या सेवाकेंद्रामार्फत केवळ आवाहनावर न थांबता, राजयोग आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून व्यसन सोडण्यासाठी लागणारे मानसिक बल प्रदान केले जात आहे. व्यसनाच्या जाळ्यात अडकत चाललेल्या युवा पिढीला वाचवण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष चर्चासत्रे आणि मार्गदर्शनाचे आयोजन केले जात आहे.त्यांनी सांगितले की, "व्यसन हे केवळ शरीराचा नाश करत नाही, तर कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त करते” . मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी राजयोग ध्यान हे अत्यंत प्रभावी साधन आहे. मा. करिष्मा दीदी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांना नशा मुक्तीची शपथ दिली. प्रत्येकाने नशेपासून लांब राहावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ महादेव वाघमोडे यांनी आपल्या मनोगतातून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती करण्यासाठी वेगवेगळ्या नशिली पदार्थांपासून लांब राहावे. व आपले जीवन सुखकर करावे असे सांगितले. या कार्यक्रमास श्री आर.डी. पाटील, श्री नंदलाल वाघ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर पाठक यांनी तर आभार डॉ. दिलीप गि-हे यांनी मानले.

*पंकज  कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा मार्फत रिेशान नगर येथे वृक्षारोपण*                                   दिन...
08/08/2026

*पंकज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा मार्फत रिेशान नगर येथे वृक्षारोपण* दिनांक ०८/०८/२०२६ रोजी पंकज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम रिशान नगर ,चोपडा येथे घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष काकासाहेब अविनाश राणे हे उपस्थित होते. मा. काकासाहेब अविनाश राणे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे , उपप्राचार्य डॉ. किशोर पाठक विभागीय समन्वयक डॉ. दिलीप गि-हे डॉ . संजय पाटील डॉ.दिलीप पाटील डॉ. दिपकराव देवरे डॉ. अजय पाटील यांच्या हस्ते सुध्दा वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सुध्दा वृक्षारोपण केले. यावेळी एकूण पन्नास रोपे लावण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांनी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले की , वृक्षारोपण करुन वातावरणाचे संतुलन राखले पाहिजे. आज वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.म्हणून आज प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे व त्याचे जतन आणि संगोपन केले पाहिजे. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते‌. या वृक्षरोपण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अरुण डी. मोरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल सुरवाडे ,महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. नंदिनी वाघ, डॉ . दिलीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

Address

Yawal Road
Chopda

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pankaj Arts and Science College Chopda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Pankaj Arts and Science College Chopda:

Shortcuts

Share

Category