Pankaj Vidyalaya - Primary, Chopda

Pankaj Vidyalaya - Primary, Chopda 'ध्यास गुणवत्तेचा...
राहा एक पाऊल पुढे'

प्रेरणादायी व्याख्यानाचा  20 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजताअवश्य लाभ घ्यावाठिकाण  - पंकज बालसंस्कार केंद्र (जुनी...
18/04/2026

प्रेरणादायी व्याख्यानाचा 20 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता
अवश्य लाभ घ्यावा
ठिकाण - पंकज बालसंस्कार केंद्र (जुनी इमारत), पंकज नगर, चोपडा

    महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंकज प्राथमिक विद्यालयात उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी व...
15/04/2026



महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंकज प्राथमिक विद्यालयात उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले आपली मनोगते सादर केले. विद्यालयातील शिक्षक श्री सी. आर. चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक श्री. सी. एस. जाधव होते.

22/03/2026

"गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे पंकज विद्यालय, चोपडा"

13/03/2026

#पंकज_बालसंस्कार_केंद्र_चोपडा
#जागतिक_महिला_दिन_साजरा
उगवतीचे रंग नृत्य उत्सवात आई-मुलांचा भावनिक संगम...

पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित, पंकज बालसंस्कार केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त 'उगवतीचे रंग' या नृत्य कार्यक्रमाने मातृशक्तीचा गौरव करत आई-पाल्यांच्या प्रेमाचा उत्सव साजरा झाला. विभाग प्रमुख सौ. मीना माळी मॅडम यांच्या प्रास्ताविकाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात महिलांचे कुटुंब, समाज व राष्ट्र घडविण्यातील अनन्यसाधारण योगदान अधोरेखित करण्यात आले.
'उगवतीचे रंग' ही संकल्पना आई-मुलांमधील शब्दापलीकडील नाते नृत्याद्वारे व्यक्त करण्यासाठी राबवली, जी केवळ कला सादरीकरण नसून भावनांचा उत्सव ठरली.
वैद्य सौ. प्राजक्ता महाले (आयुर्वेदाचार्य, आहार तज्ञ व गर्भसंस्कार तज्ञ) यांनी सात्विक आहार, गाईचे तूप, पालेभाज्या, गणपती स्तोत्र व गायत्री मंत्राचा नियमित जप यांचे आरोग्यासाठी महत्त्व सांगितले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब डाॅ. सुरेश बोरोले, नवनिर्वाचित अध्यक्ष मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले व यांनी उपक्रमाचे कौतुक केले
मा. ताईसो. सौ. दिपाली बोरोले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या
महिलांना खुला व्यासपीठ! मुख्याध्यापक श्री. एम. व्ही. पाटील सर यांनी महिलांचा सर्वांगीण विकासासाठी खुला व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले. दैनंदिन जीवनापलीकडे स्वतःचे जग घडवा - महिलांनी घरापुरते मर्यादित राहू नये, तर स्वतःला सक्षम बनवून उत्साही, आनंदी व स्वावलंबी आयुष्य जगावे, असे प्रोत्साहन देत ते म्हणाले, "आजचा कार्यक्रम म्हणजे महिला सन्मान, कुटुंबप्रेम व संस्थेची संस्कारक्षम यशस्वी वाटचाल यांचा त्रिवेणी संगम आहे." हे व्यासपीठ आयुष्यात अविस्मरणीय ठरेल, अशी खात्री त्यांनी दिली.
विविध कलाविष्कारात महिला पालक व पाल्यांनी सहभाग घेतला, तर महिला शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. सहभागींना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.

🌟🔬 पंकज विद्यालय प्राथमिक, चोपडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा 🔬🌟राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंकज विद्यालय...
28/02/2026

🌟🔬 पंकज विद्यालय प्राथमिक, चोपडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा 🔬🌟
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंकज विद्यालय प्राथमिक, चोपडा येथे विविध उपक्रमांनी भरलेला प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. योगेश चौधरी सरांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोखंडे सरांनी प्रभावीपणे केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारी सुंदर व प्रेरणादायी भाषणे सादर केली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात सुमारे ६० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन विविध वैज्ञानिक मॉडेल्स सादर केले.यासाठी त्यांना विज्ञान शिक्षक श्री. स्वप्नील ठाकूर सर व श्री. सचिन लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची व वैज्ञानिक दृष्टिकोनाची उत्कृष्ट झलक या प्रदर्शनातून पाहायला मिळाली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड, जिज्ञासा व संशोधन वृत्ती विकसित होण्यास मोठी प्रेरणा मिळाली.
🔬 पंकज विद्यालय प्राथमिक, चोपडा परिवाराकडून राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🔬

 #पंकज_विद्यालय #मराठी_राजभाषा_दिवसपंकज विद्यालयात 'शब्दांची सुवर्ण पहाट'; चिमुकल्यांच्या वेशभूषेने जिवंत केला महाराष्ट्...
28/02/2026

#पंकज_विद्यालय
#मराठी_राजभाषा_दिवस
पंकज विद्यालयात 'शब्दांची सुवर्ण पहाट'; चिमुकल्यांच्या वेशभूषेने जिवंत केला महाराष्ट्राचा इतिहास!

कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात पंकज प्राथमिक विद्यालयातील चिमुकल्यांनी अभंग, कविता आणि नृत्यातून मराठी संस्कृतीच्या रंगांची उधळण केली.

कार्यक्रमाची काही वैशिष्ट्ये:

इतिहासाचे सजीव चित्रण करतांना विद्यार्थ्यांची महान मराठी व्यक्तिमत्त्वाची वेशभूषा केली होती.
दुपार सत्रात इयत्ता ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यालयातील विविध उपक्रमांचे आयोजित करण्यात आले. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपले विचार मनोगततून व गायनातून व्यक्त केले. यावेळी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या पोस्टर चे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सी आर चौधरी यांनी मराठी भाषेचे महत्व व कुसुमाग्रज यांचा जीवन परिचय करून दिला.

11/02/2026

#पंकज_बालसंस्कार_केंद्र_चोपडा
जेथे होते संस्कारांची पेरणी...
नव्या पिढीची पायाभरणी...

 #राजमाता_जिजाऊ_जयंती2026 #राष्ट्रीय_युवा_दिवस_12जानेवारी2026
13/01/2026

#राजमाता_जिजाऊ_जयंती2026
#राष्ट्रीय_युवा_दिवस_12जानेवारी2026

 #बाल_आनंद_मेळावा २०२६
12/01/2026

#बाल_आनंद_मेळावा २०२६

🏆राष्ट्रभाषा हिंदी अध्यापक मंडल आयोजित तहसिलस्तर वक्तृत्व प्रतियोगीता 2025कु.लावण्या देविदास बाविस्कर तालुक्यातून तृतीयद...
19/09/2025

🏆राष्ट्रभाषा हिंदी अध्यापक मंडल आयोजित तहसिलस्तर वक्तृत्व प्रतियोगीता 2025

कु.लावण्या देविदास बाविस्कर तालुक्यातून तृतीय

दिनांक 19 सप्टेंबर रोजी हिंदी अध्यापक मंडळ द्वारे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत पंकज प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.लावण्या देविदास बाविस्कर हिने🥉 तृतीय क्रमांक पटकावला तिला ट्रॉफी व रोख बक्षीस मिळाले.

तिला हिंदी शिक्षक श्री.मयुर पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री.एम.व्ही.पाटील सर यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

 िवडअभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!कै सुशीलाबाई गुलाबराव पाटील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025 पंकज प्राथमिक विद्यालयाच...
15/09/2025

िवड
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
कै सुशीलाबाई गुलाबराव पाटील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025
पंकज प्राथमिक विद्यालयाचे घवघवीत यश...
इयत्ता 5 वी ते 7 वी गटात...
कु. भार्गवी चंद्रशेखर पाटील (द्वितीय पारितोषिक)
चि. राजवीर कदम (उत्तेजनार्थ पारितोषिक)
मार्गदर्शक शिक्षक : श्री सी. आर. चौधरी
सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन!!!!

Address

Borole Nagar 1
Chopda
425107

Opening Hours

Monday 7am - 5:10pm
Tuesday 7am - 5:10pm
Wednesday 7am - 5:10pm
Thursday 7am - 5:10pm
Friday 7am - 5:10pm
Saturday 7am - 3:40pm

Telephone

+912586223327

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pankaj Vidyalaya - Primary, Chopda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Pankaj Vidyalaya - Primary, Chopda:

Shortcuts

Share

Category