Kanya Vidyalay Chopda

Kanya Vidyalay Chopda Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kanya Vidyalay Chopda, School, Chopda.

सद्गुरु शिक्षण मंडळ संचालित प्राथमिक कन्या विद्यालय चोपडा या शाळेत क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती  व बालिका दिवस ...
03/01/2025

सद्गुरु शिक्षण मंडळ संचालित प्राथमिक कन्या विद्यालय चोपडा या शाळेत क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती व बालिका दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. सावित्रीबाई यांच्या जीवन कार्याविषयी श्रीमती निता पावरा यांनी माहिती दिली . हर्षल पाटील, निलेश पाटील, यज्ञेश लोहार यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वेशभूषेत तर हर्षाली मोतीराळे , व आकांशा साळुंखे यांनी सावित्रीची महती गीतातून सादर केली. तसेच लावण्या मराठे ,सिद्धी लोहार, वैदवी पाटील ,फाल्गुनी पाटील ,माहेश्वरी पाटील, साक्षी नेरपगार ,साक्षी चित्रकथी, रितिका सुतार हिरण्या पाटील परी पाटील ,लावण्या पाटील, उर्मी पाटील ,योगिनी व योगेश्वरी पाटील ,आकांक्षा साळुंके, चेतना चौधरी, निहारीका चौधरी, युविका चौधरी, रोशनी चित्ते, भूमी पाटील, खुशी देशमुख, प्राची पाटील ,आलिया बागवान यज्ञा देशमुख या विद्यार्थिनी सावित्रीबाईच्या वेशभूषा करून आल्या होत्या त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी भाषणे दिली. सर्व शिक्षकांनी मुलींना गुलाबपुष्प देऊन गौरव केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रमोद पाटील तर सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. श्यामसुंदर पाटील यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी कांता पाटील, आशा बारी नांजुका पाटील यांनी परिश्रम घेतले.

*अभिनंदन ! अभिनंदन ! ! अभिनंदन!!!                   *रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशियल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे* त...
27/07/2024

*अभिनंदन ! अभिनंदन ! ! अभिनंदन!!! *रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशियल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे* तर्फे आदरणीय भाऊसाहेब श्री यशवंत धनराज पाटील ( Y.D.Patil Sir *संचालक* - सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ चोपडा तसेच *संचालक* -ब्रिलियंट सायन्स इन्स्टिट्यूट चोपडा यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल *भारत शिक्षण रत्न अवॉर्ड* जाहीर झाला. पुरस्कार वितरण संत गजानन महाराज नगरी - *शेगाव* येथे दिनांक - २८/७/२०२४ रोजी संपन्न होणार आहे. त्याबद्दल भाऊसाहेब यांचे मुख्याध्यापक श्री. गोपाल पाटील व सर्व शिक्षक बंधू भगिनी प्राथमिक कन्या विद्या मंदिर चोपडा यांच्यावतीने *हार्दिक हार्दिक अभिनंदन* 💐💐💐💐💐

14/07/2024

आदरणीय भाऊसाहेब वाय. डी. पाटील सर
संचालक - चोपडा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ , चोपडा
भाऊसाहेब एक आदर्श व्यक्तिमत्त्व होय. अतिशय हुशार, अभ्यासू शांत व संयमी तसेच सुस्वभावी असेलेल्या भाऊसाहेबांना वाढदिवसाच्या मनस्वी कोटी कोटी शुभेच्छा !
जय श्री दादाजी त्यांना यश , कीर्ती व अखंड आरोग्य संपदा देवो . हीच प्रार्थना .

आमच्या चोपडा परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुला मुलींचे  प्राथमिक व माध्यमिक कन्या विद्यालय गणेश कॉलनी चोपडा ...
23/06/2024

आमच्या चोपडा परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुला मुलींचे प्राथमिक व माध्यमिक कन्या विद्यालय गणेश कॉलनी चोपडा येथे२१ जून दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी योगा प्रशिक्षक उज्वला सोनवणे व रोहिणी पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले व विविध योगासने करून विद्यार्थ्यांना नियमित योगा केल्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
सदर योगा मध्ये शाळेतील विद्यार्थी शिक्षक व उपस्थित पालक यांनी लाभ घेतला यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक गोपाल पाटील व माध्यमिक मुख्याध्यापक श्री पी एस पाटील यांनी यशस्वी योगा दिवसाचे आयोजन केले.

आमच्या चोपडा परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुला-मुलींचे प्राथमिक व माध्यमिक कन्या विद्यालय गणेश कॉलनी चोपडा य...
22/06/2024

आमच्या चोपडा परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुला-मुलींचे प्राथमिक व माध्यमिक कन्या विद्यालय गणेश कॉलनी चोपडा या शाळेत 21 जून दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक सौ उज्वला सोनवणे व योगिनी पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून विविध योगासने करून घेतले त्याचप्रमाणे नियमित योगासने केल्यामुळे काय फायदा होतो याविषयी मार्गदर्शन केले . सदर योग दिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी तसेच पालक बंधू यांनी याचा लाभ घेतला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक मुख्याध्यापक गोपाल पाटील माध्यमिक मुख्याध्यापक श्री प्रवीण पाटील सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.

22/06/2024
काल 21 जून माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सहकारी बंधू भगिनी यांनी माझे अभिष्टचिंतन केले त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहू इच...
22/06/2024

काल 21 जून माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सहकारी बंधू भगिनी यांनी माझे अभिष्टचिंतन केले त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो . माध्यमिक मुख्याध्यापक श्री. पी.एस. पाटील सर त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ सहकारी बंधू पी.आर.पाटील सर व ज्येष्ठ भगिनी विद्याताई पाटील यांनी सर्व सहकाऱ्यांसोबत मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पुनश्च मी माझ्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो.

वाढदिवस अभिष्टचिंतनवंदनीय आबासाहेब जी.के.पाटील (संस्थापक अध्यक्ष- चोपडा परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ चोपडा जिल्हा ज...
01/03/2024

वाढदिवस अभिष्टचिंतन
वंदनीय आबासाहेब जी.के.पाटील (संस्थापक अध्यक्ष- चोपडा परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ चोपडा जिल्हा जळगाव) यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या प्राथमिक कन्या विद्या मंदिर गणेश कॉलनी चोपडा या शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा व कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केलेले होते.
प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांचे एकूण ९ गट करून विद्यार्थ्यांना भाषा, गणित इंग्रजी,परिसर अभ्यास, सामान्य ज्ञान व चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारून स्पर्धेतील विजयी तीन गटांना तसेच कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उत्कृष्ट तीन वस्तूंना बक्षीस देण्यात आले.
वरील स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री.शामसुंदर पाटील, प्रमोद पाटील ,श्रीमती नीता पावरा ,सुजाता पाटील, सौ कांताबाई पाटील ,आशा बारी, प्रियंका चौधरी व निवृत्ती पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात पालकांनी देखील सहभाग नोंदवला.

२८ फेब्रुवारी "राष्ट्रीय विज्ञान दिन " चोपडा परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ ,चोपडा संचलित - प्राथमिक कन्या विद्या मंद...
28/02/2024

२८ फेब्रुवारी "राष्ट्रीय विज्ञान दिन " चोपडा परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ ,चोपडा संचलित - प्राथमिक कन्या विद्या मंदिर चोपडा शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी अंधश्रद्धा व वैज्ञानिक दष्टीकोन बद्दल तर प्रमोद पाटील यांनी डॉ सि. व्ही रामन आणि आपल्याला विज्ञानामुळे व तंत्र ज्ञानामुळे झालेले फायदे याविषी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमत्ताने श्री.श्यामसुंदर पाटील , श्रीमती निता पावरा व सुजाता पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर छोटे छोटे प्रयोगाचे सादरीकरण केले.

08/03/2023

* 8 मार्च जागतिक महिला दिवस *
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

Address

Chopda
425107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kanya Vidyalay Chopda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kanya Vidyalay Chopda:

Shortcuts

Share

Category