Sevasadhana

Sevasadhana Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sevasadhana, Chiplun.

WE are a young group of professionals, at SevaSadhana, come together, for a social cause, creating awareness in the field of education, environment, and many other aspects in day to day life to enrich the living pattern and social life.

03/11/2025

ओळखू स्वतःला शिबिराची क्षणचित्रे

मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासाला सहाय्य करणारे; सामाजिक आणि पर्यावरण विषयक जाणीवा वाढविणारे; वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारे; स्वतंत्रपणे विचार करायला प्रेरित करणारे एक अनोखे शिबिर

वर्ष आठवे

20/10/2025
सेवासाधना प्रतिष्ठान द्वारे शाळांमधून *शोधयात्रा ज्ञानाची*घरडा केमिकल्स यांच्या माध्यमातून उपक्रमविद्यार्थ्यांमध्ये विज्...
10/10/2025

सेवासाधना प्रतिष्ठान द्वारे शाळांमधून
*शोधयात्रा ज्ञानाची*

घरडा केमिकल्स यांच्या माध्यमातून उपक्रम

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व निसर्ग विषयक सखोल दृष्टिकोन निर्माण व्हावा या दृष्टीने सेवासाधना प्रतिष्ठान द्वारे पाच टप्प्यातील महत्त्वाकांक्षी 'शोधयात्रा ज्ञानाची' प्रकल्प डिझाईन करण्यात आला. घरडा केमिकल्स, लोटे यांच्या सामाजिक दायित्व माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लोटे, सोनगाव, धामणदेवी, घाणेखुंट, कोतवली, असगणी, आवाशी येथील दहा शाळांमधून सदर प्रकल्प उत्साहात सुरू आहे.

सदर प्रकल्पात पहिल्या टप्प्यात सर्व शाळांमध्ये विश्वाची निर्मिती तसेच जीवसृष्टीची उत्क्रांती हा विषय ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून उलगडण्यात आला आला त्याचबरोबर मानवाचा विकास झाल्यावर आता पर्यावरण विषयक कोणत्या समस्या निर्माण होत आहेते त्याचाही आढावा घेण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांची छोटीशी परीक्षा झाल्यावर त्यांना गटांमार्फत घरी करण्यासाठी उपक्रम देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपापल्या गावातील जुन्या जाणत्या माणसांच्या मुलाखती घेतल्या तसेच परिसरातून विविध खडकांचे नमुने गोळा करून आणले.

पुढच्या सत्रा मध्ये विद्यार्थ्यांनी गटांमार्फत आपण केलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली. दुसऱ्या सत्राचा विषय होता खडक व जीवाश्म प्रदर्शन तसेच नकाशा वाचन विद्यार्थ्यांना या प्रदर्शनातून काही कोटी वर्षांपूर्वीची जीवाश्मे बघता आली तसेच अभ्यासक्रमातील खडक खनिजे प्रत्यक्ष अनुभवता आली. त्याबरोबरच महाराष्ट्र व चिपळूण परिसराचे उठावाचे नकाशे बघताना विद्यार्थी आवडीने दऱ्याखोऱ्यातून आपापली गावे शोधत होती. विद्यार्थ्यांनी मग शालेय परिसराचा नकाशाही काढला.

अनुभव शिक्षणाचा हा दुसरा टप्पा संपताना दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थी पक्षी व वनस्पतींचे निरीक्षण करण्याचे ठरवूनच घरी गेली यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर पुस्तकेही संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली. सह्याद्री निसर्गमित्र, चिपळूण यांचे त्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

पुढच्या टप्प्यांमध्ये निसर्गातील विज्ञान त्यांच्यापुढे अधिकाधिक उलगडत जाईल. ते स्वतःच त्याचा शोध घेऊ लागतील...

सेवासाधना प्रतिष्ठानला अमर ऊर्जा पुरस्कार प्रदान
20/04/2025

सेवासाधना प्रतिष्ठानला अमर ऊर्जा पुरस्कार प्रदान

सेवासाधना प्रतिष्ठानला अमर ऊर्जा पुरस्कार
20/04/2025

सेवासाधना प्रतिष्ठानला अमर ऊर्जा पुरस्कार

https://youtu.be/1qaZG82Ytko 3 day Residential camp at  Ketki,  for near by village kids where subject like Vedapath, Yo...
02/03/2025

https://youtu.be/1qaZG82Ytko 3 day Residential camp at Ketki, for near by village kids where subject like Vedapath, Yoga, history of evolution, sky observation, group discussion, bamboo craft, introduction to flute playing and other subjects covered.

3 Residential camp at Ketki, for near by village kids where subject like Vedapath, Yoga, history of evolution, sky observation, group disc...

🌿🪷 यंदाच्या शैक्षणिक वर्षात 🪷🌿 *सेवासाधना प्रतिष्ठानचे ७५ उपक्रम संपन्न*          *आपणा सर्वांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक...
20/02/2025

🌿🪷 यंदाच्या शैक्षणिक वर्षात 🪷🌿
*सेवासाधना प्रतिष्ठानचे ७५ उपक्रम संपन्न*

*आपणा सर्वांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार*
🙏🙏🙏

सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा उचलत यावर्षी आमच्या संस्थेने शाळा, विद्यालये, महाविद्यालये, संस्था अशा विविध ६० हून अधिक ठिकाणी ७५ उपक्रमांचा टप्पा गाठला. चार निवासी शिबीरेही संपन्न झाली.आपण मुंबई ते सिंधुदुर्ग ६००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो. हे शक्य झाले केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्य व पाठिंब्यामुळेच.

*संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचे थोडक्यात उद्दिष्ट:-*
1. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात अधिक रस निर्माण करण्यास मदत करणे तसेच अभ्यासक्रमाचा रोजच्या जीवनाशी असलेला संबंध उलगडून दाखवणे
2. विविध ज्ञानशाखांचा - जसे विज्ञान, भूगोल, पर्यावरण, इतिहास - परस्परसंबंध उलगडून दाखवणे.
3. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव - जागृती निर्माण करणे
4. एकूणच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन - कार्यकारणभाव रुजवण्यासाठी मदत करणे.
शिक्षक तसेच विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद बघता सदर उद्दिष्ट निश्चितच सफल होत आहे.

यावर्षीच्या उपक्रमांची यादी तसेच विद्यालयांची यादी सोबत जोडत आहोत.

🔸 *गेली सात - आठ वर्षे ज्या विद्यालये, संस्था तसेच गावांमधून उपक्रम संपन्न झाले तेथील मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, हितचिंतक यांचे पुनश्च मनःपूर्वक आभार!*

🔹 *रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ तसेच चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळ, चिपळूण पंचायत समिती - शिक्षण विभाग, चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांनी वेळोवेळी दिलेल्या बहुमूल्य संधींबद्दल त्यांचे विशेष आभार!*

🔸 *ज्यांच्याशिवाय सातत्याने काम करणे तसेच दुर्गम भागातून पोहोचणे अशक्य आहे अशा संस्थेच्या सर्व देणगीदारांचे विशेष आभार!*

*तसेच खालील संस्थांचेही विशेष आभार:-*
• सह्याद्री निसर्गमित्र, चिपळूण
• अमरजित चव्हाण स्मृती प्रतिष्ठान, चिपळूण
• रामकृष्ण विवेकानंद सेंटर, दादर
• विज्ञानवाहिनी, पुणे
• Grassroots Foundation, Mumbai
• SEESCAP, Mahad
• ज्ञानप्रबोधिनी, निगडी
• S I Group India Pvt. Ltd., Lote

आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही वाटचाल अशीच पुढे सुरू राहील आणखी व्यक्तींची साथ मिळेल अशी आशा!

आपले नम्र!

सेवासाधना प्रतिष्ठानचे सर्व पदा

पर्यावरण नोंद कार्यशाळासह्याद्री निसरगमित्र, चिपळूण सोबत अशा प्रकारची पहिलीच कार्यशाळा. आठवी ते बारावी 21 विद्यार्थी सहभ...
25/11/2024

पर्यावरण नोंद कार्यशाळा

सह्याद्री निसरगमित्र, चिपळूण सोबत अशा प्रकारची पहिलीच कार्यशाळा. आठवी ते बारावी 21 विद्यार्थी सहभागी झाले. प्रत्यक्ष वनस्पती, कीटक, पक्ष्यांचे आवाज यांची शास्त्रीय पद्धतीने फोटोग्राफी, रेकॉर्डिंग कसे करायचे, त्यांचे identification व ॲप द्वारे कायमस्वरूपी रेकॉर्ड कसा बनवायचा याची ही कार्यशाळा खूप छान पर पडली.

विज्ञान ,  पर्यावरण , इतिहास , भूगोल , संगीत , हस्तकला , आहार , योग, साहसी प्रस्तरारोहण क्रीडा प्रात्यक्षिक आणि मैदानी ख...
13/11/2024

विज्ञान , पर्यावरण , इतिहास , भूगोल , संगीत , हस्तकला , आहार , योग, साहसी प्रस्तरारोहण क्रीडा प्रात्यक्षिक आणि मैदानी खेळ अशा सर्वांगाने विद्यार्थ्यांना घडवणारे , सामाजिक समस्यांवर मंथन करून स्वतःचे विचार मांडायला प्रेरित करणारे असे हे 'ओळखू स्वतःला' निसर्ग शिबीर नवी पिढी घडवण्यात आपला खारीचा वाटा उचलत आहे. अनेक व्यक्तींचे यासाठी सहाय्य लाभत आहे त्या सर्वांचे शतशः धन्यवाद!

सेवासाधना प्रतिष्ठान तर्फे ओळखू स्वतःला' चार दिवसीय निवासी निसर्ग शिबिर आरण्यक, केतकी येथे संपन्न

Address

Chiplun

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sevasadhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sevasadhana:

Shortcuts

Share