Shri Banthiya Prathamik Jain Vidyamandir

Shri Banthiya Prathamik Jain Vidyamandir चिंचवड गावातील गांधी पेठेतील प्राथमि

गुरुजन ओळखा
13/12/2023

गुरुजन ओळखा

सर्वोत्कृष्ट शाळा यादीत माझी दहावीपर्यंतची शाळा *श्री फत्तेचंद जैन विद्यालय* 🌹🌹👍🏼👍🏼🥳🥳
28/10/2023

सर्वोत्कृष्ट शाळा यादीत माझी दहावीपर्यंतची शाळा *श्री फत्तेचंद जैन विद्यालय* 🌹🌹👍🏼👍🏼🥳🥳

10/06/2023
ह्यामधे बांठिया शाळेमधले कोण कोण आहेत ओळखा पाहू! (कांकरिया बाईंच्या मोठ्या मुलीने म्हणजे संयुजाने आजीकडून (कोठारी बाई) म...
10/06/2023

ह्यामधे बांठिया शाळेमधले कोण कोण आहेत ओळखा पाहू! (कांकरिया बाईंच्या मोठ्या मुलीने म्हणजे संयुजाने आजीकडून (कोठारी बाई) मिळालेला ठेवा जपून ठेवला आहे!) ह्यातले बरेचजण आता हयात नाहीत!💐🙏

06/05/2023

🤔

26/09/2022

👏

28/03/2022

*माझी शाळा*

बाठिया विद्या मंदिर म्हणजे चिंचवड गावातील जैन शाळेची एक शाखा,ह्या शाळेत जायला दोन दरवाजे, एक धोका चाळी समोर उघडणारा,जवळच मोठं पिंपळाचे झाड व दुसऱ्या दरवाजा समोर मोकळा मोठा प्लॉट (बखळ), हा प्लॉट ओलांडून तेली आळीस जाता येणारा, म्हणजेच प्रजापतीच्या दुकानासमोर, ह्या प्लॉटच्या शेजारीच फकिरभाई पानसरेंची लाकडाची वखार, मुख्य शाळेच्या इमारतीत एक छोटीशी बाग होती आता तेथे कर्मचाऱ्या साठी बांधलेली घरे आहेत व शुशुविहार मध्ये शिशुफळी होती त्यावर शुशुविहार मध्ये असताना बसलो होतो, दातार बाई जरा वयस्कर होत्या तरी प्रेमळ.

नाना सिद्धपाठकी म्हणजे नाना गुरुजी की जे बाठीया शाळेचे हेडमास्तर, ते पहिलीला शिकवायचे, धोतर सदरा व डोक्यावर गांधी टोपी असा त्यांचा पेहराव, त्याच्या सोबतीला दातारबाई ह्या शुशुविहारला तर दुसरीला आबा गुरव म्हणजे आबा गुरुजी की जे मधून मधून चक्क वर्गात बसल्या बसल्या डुलक्या घ्यायचे व कधी कधी खुर्चीवरून झोपेत तोल सुद्धा जायचा त्यांचा, ते विठ्ठल मंदिरात पूजा सुद्धा करत असत, त्यांना एक मुलगा होता तो सुद्धा जैन शाळेत होता व कदाचित आमच्या बरोबर!

तिसरीला देशपांडे बाई होत्या, जाड भिंग असलेला चष्मा वापरत, एका पायाला काही झाले असल्याने त्या त्या पायाला जाड उंचीचा सँडल वापरत असत, चालताना त्यांना त्रास होत असणार, तिसरीचा वर्ग वर मांडीवर होता, त्या वर्गास जाण्यास दोन जिने होते.एक समोरून व एक आतमधून चौथी व तिसरीच्या वर्गात जाण्यासाठी दरवाजा, ह्या जिन्यात कायम अंधार असे.

चौथीला देशपांडे गुरुजी होते उंच असे, गोरेगोमटे, पण मारकट होते, रागीट, कशावरून सुद्धा त्यांचा डोक्याचा तोल जात असे व दिसेल त्याच्यावर राग निघत असे.

नाना गुरुजी व देशपांडे गुरुजी हे घारे डॉक्टरांच्या दवाखान्याजवळील गल्लीत राहत असत व आबा गुरुजी बहुतेक मोरया गोसावी मंदिरा समोरील वाड्यात राहत असावेत. देशपांडे बाई ह्या चिंचवड गावात त्यावेळी पोस्ट ऑफिस होते त्या वाड्यात राहत होत्या.
बाठिया शाळेतून पुढे पाचवीला गावाबाहेरील फत्तेचंद जैन शाळेत प्रवेश नक्की असायचा, ही शाळा त्यावेळी फार दूर वाटायची, जाताना उजव्या बाजूस हॉलीबॉलचे मैदान लागत असे व जवळ मोकळी जागा, ह्या जागेवर कित्येकदा सर्कसचा मुक्काम असे, सर्कसच्या आजूबाजूस दिवसातून अनेकदा चकरा होत असे, जवळ गावालगत असलेल्या मैदानावर पुढे जिल्हा परिषेदेची सरकारी दगडी शाळा बांधण्यात आली,तेथेच घिसाड्याची पाल सुद्धा होती, ह्याच मैदानावर गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्रवीर मोहन रानडे ह्यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता व त्यावेळी सुधीर फडके सुद्धा आलेले होते. ह्याच मैदानजवळ गोखले यांचा द्राक्षाचा मळा होता, तेथे हंगामात द्राक्षे विकत मिळत असत.

हॉलीबॉल मैदानानंतर वेतळबाबाचे उघडे देऊळ होते व पुढे फत्तेचंद शाळे पर्यंत सर्व मोकळेच होते एखादे दुसरे बदामाचे झाड (ह्या झाडावरून ज्या बिया सुकलेल्या बिया पडत त्याला बदाम म्हणत असू, त्या खायला स्वादिष्ट, फक्त उन्हाळ्यात मिळत) भरपूर मोकळी जागा असल्याने तेथे गावातील मयताचे दहन संस्कार सुद्धा रस्त्या लगत चालत असे, गावातील मृत जनावरे येथे आणून टाकलेली असत व त्यावर जमा होणारी मोठी गिधाडे भीतीदायक असत, सर्वत्र भीतीचे वातावरण, चिंचवड गावातून सुरू झालेला रास्ता थेट शाळेच्या गेट जवळ संपत असे, सर्व काही मोकळे होते, आता असलेल्या झोपडपट्टीत तो रस्ता कोठे हरवला आहे हेच समजत नाही, पवना नगर वसाहत त्यावेळी नव्हती, पलीकडे SKF कंपनीचे बांधकाम चालू असलेले दिसत असे.

फत्तेचंद जैन शाळेच्या गेट मधून आत शिरल्यावर समोरच बाठिया विद्या मंदिरची देखणी इमारत दिसत असे, ह्याच इमारतीत सुरवातीस सायन्स हॉल होता की जो नंतर नवीन इमारतीत वरच्या मजल्यावर हलविण्यात आला, काकाजींच्या हातात ह्या नवीन हॉलच्या चाव्या होत्या.काकाजी प्रमाणे बापू, वसंत, जगनाथ व दिनकर असे शिपाई होते, बाठिया विद्या मंदिरच्या एका भिंतीवर एक मोठा ब्लॅक बोर्ड होता त्यावर सुविचार व इतर माहिती लिहलेली असे, दर्शनीय बाजूस छोटीशी बाग होती व एक चौकोनी पाण्याची टाकी होती त्यास सर्व बाजूस नळ बसविण्यात आलेले होते. ह्या इमारतीच्या मागील बाजूस एका तात्पुरत्या बनविलेल्या खोलीवजा जागेत त्यावेळी PT ला लागणारे व खेळायला लागणारे समान ठेवलेले असे, डंबेल्स, लेझीम, ढोल इत्यादी. जाधव सरांकडे त्याची चावी असे. ह्या इमारतीत असलेल्या सायन्स हॉलला दोन दरवाजे होते, एक मागील मोठ्या मैदानावर उघडत असे, ह्या मैदानाच्या एका बाजूस वसतिगृह व एका बाजूस शाळेची इमारत, दोन्ही इमारती दगडी आहेत, ह्या शाळेच्या इमारतीच्या मधोमध साहू सभागृह ज्याला पुढे चालून समोर मोठे व्यासपीठ बांधण्यात आले, ह्याच इमारतीच्या एका खोलीत वाचनालय होते. ह्या शाळेच्या व वसतिगृहाच्या मध्ये जे मोठे ग्राउंड होते त्यावर कडेस गुलमोहराची झाडे लावण्यात आलेली होती, समोरच चं.ना.शाहसरांचे वास्तव्याची इमारत होती. आता ती इमारत नवीन मोठ्या इमारतीत हरवून गेलेली आहे.
शाळेच्या मागील बाजूस शिक्षकांसाठी राहण्यासाठी बांधण्यात आलेली चाळवजा इमारत होती व मधल्या मोकळ्या जागेत पेरूची बाग असल्याचे आठवते, ह्या शिक्षक निवासात अनेकदा प्रवीण कडे गेलो होतो, बापट बाई, देशमुख सर, पंडितजी, कर्णावट सर येथेच वास्तव्यास होते.

पुढे चालून दोन नवीन एक मजली इमारती बांधण्यात आल्या, बांधकामासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी एक चौकोनी हौद होता, त्या हौदात अनेकदा रुणवाल आपल्या बोटीची ट्रायल घेत असे.
ह्या दोन इमारतीस लागूनच टेक्निकल साठी आवश्यक असलेले वर्कशॉप व ब्लॅकस्मिथी शॉप होते, हे डिपार्टमेंट सोनारसरांच्या ताब्यात होते, कुलकर्णी सर सुतारकाम शिकवत असत, शाह सर ड्रॉईंग तर भगतसर इलेक्ट्रिकल, काही दिवस कोठारीसर ,पावेचासर सुद्धा टेक्निकलचे विषय शिकवायला होते तर मुगदुमसर, देशमुखसर, जनपंडितसर, जधावसर, ओसवालसर, किर्दकसर, तिखेबाई, जोशीबाई, फडकेबाई, नांदेबाई, देवबाई, टेम्बेबाई, असे अनेक शिक्षक आम्हास शिकवायला होते.
कालांतराने बापू भन्साळी हॉल बांधण्यात आला त्याचा स्लॅब कोसळल्याची घटना आजपण ताजी आहे नंतर शेजारीच आणखीन नवीन दोन बैठ्या इमारती बांधण्यात आल्यात व तेथे मुख्याध्यापक,ऑफिस व शिक्षकांसाठीची व्यवस्था करण्यात आली, मधल्या पॅसेजमध्ये दररोज प्रार्थना व्हायची, भन्साळी हॉलच्या बाजूस एक स्वच्छतागृह बांधलेले होते.
शाळेच्या जवळच शाळेची भव्य शेती होती, पंप हाऊस होते, नदीवरून पाणी तेथे आणले जायचे, शेती विभागातील मुलांना तेथे प्रॅक्टिकल साठी नेले जायचे.

अश्या ह्या शाळेत शुशुविहार ते अकरावी पर्यंत काढलेत, आता नुकताच दोन वर्ष्या पूर्वी परत एकदा शाळेला भेट देण्याचा योग आला व शाळेची दुर्दशा पाहून मन खिन्न झाले, अस्तव्यस्त केलेली बांधकामे, फक्त आजचा विचार करून तात्पुरती केलेली लिपालिपी पाहून ह्या शाळेस चांगल्या नेतृत्वाची गरज असल्याचे जाणवले, अश्या करूयात की १९२७ साली सुरू करण्यात आलेली शाळा परत एकदा दिमाखाने उभी राहून १०० वा वाढदिवस धुमडक्यात साजरा करेल☺️

चंद्रकांत कोठारी
98220 42152

चिंचवड़ गावातील श्री बांठिया प्राथमिक जैन विद्यामंदिर येथे 29 वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा करून सेवानिवृत्त झालेल्य...
26/04/2021

चिंचवड़ गावातील श्री बांठिया प्राथमिक जैन विद्यामंदिर येथे 29 वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या श्रीमती जतनबाई कुंदनमलजी कोठारी यांचे आज सोमवार दि 26 एप्रिल 2021रोजी संध्याकाळी सहा वाजता वयाच्या 82 व्या वर्षी अहमदनगर येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

👏भावपूर्ण आदरांजली 👏

चिंचवड़ येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालयाचे निवृत्त शिक्षक फुगे सर यांचे दुःखद निधन, भावपूर्ण श्रद्धांजली 💐
21/02/2021

चिंचवड़ येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालयाचे निवृत्त शिक्षक फुगे सर यांचे दुःखद निधन, भावपूर्ण श्रद्धांजली 💐

धनकवड़े बाईंचा श्री बांठिया प्राथमिक जैन विद्यामंदीरचा 1986 साली चौथी पास झालेला वर्ग
02/12/2020

धनकवड़े बाईंचा श्री बांठिया प्राथमिक जैन विद्यामंदीरचा 1986 साली चौथी पास झालेला वर्ग

ह्यामधे फत्तेंचंद विद्यालयाचे बहुगुणी कोहिनूर हिरे लपलेले आहेत, पैकी त्यामधे कोणी ह्यात आहेत, तर काही जण हरवले आहेत. फोट...
28/11/2020

ह्यामधे फत्तेंचंद विद्यालयाचे बहुगुणी कोहिनूर हिरे लपलेले आहेत, पैकी त्यामधे कोणी ह्यात आहेत, तर काही जण हरवले आहेत. फोटो खूप जुना म्हणजे ८३/८४ चा आहे. पुरंदरे बाई, नाईक बाई, मुख्याध्यापक ओस्तवाल सर असावेत, पण दिसत आहेत, सी. एन. शहासरांसारखे अगदी सुधा, अभ्यंकर बर्वे, सगळया सगळ्या आहेत त्यात.👍👌👌

- सौ छाया कांकरिया (बाई)

Address

Gandhi Peth
Chinchwad
411033

Telephone

+918380074880

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Banthiya Prathamik Jain Vidyamandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category