Mahesh Deshmukh

Directions

Mahesh Deshmukh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahesh Deshmukh, School, Chikhali.

....💐💐💐आमचे बंधू....* *उपक्रमशील आदर्श शिक्षक....* *गणित तज्ञ*🌹🌹🌹🪄🪄🪄 *श्री.हरिदास निकम सर...*(जि . प. प्रशाला नळणी,) *या...
29/09/2024

....💐💐💐

आमचे बंधू....*
*उपक्रमशील आदर्श शिक्षक....*

*गणित तज्ञ*
🌹🌹🌹🪄🪄🪄 *श्री.हरिदास निकम सर...*
(जि . प. प्रशाला नळणी,)
*यांना जालना जि.प.च्या वतीने सन २०२४ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हरिदास निकम सरांचे मनःपूर्वक अभिनंदन....*
.....💐💐💐

26/09/2024

आमच्या शाळेचा नीरज चोप्रा...
🎯🎯🎯
चि.अभिषेक संजय तायडे.
(इ.8 वी)
जि.प.प्रा.शा.चनेगाव...
🥇🏆🥇
आयुष्यात पहिल्याच प्रयत्नात थेट 22 मी.भलाफेक...
शाब्बास..!!!
👉🏻👉🏻👉🏻

सर्वाँना नमस्कार,   आज दिनांक 2ऑगस्ट रोजी  मा.मुकेश खुल्लरसाहेब यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी निवारण समिती समोर राज...
03/08/2024

सर्वाँना नमस्कार,
आज दिनांक 2ऑगस्ट रोजी मा.मुकेश खुल्लरसाहेब यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी निवारण समिती समोर राज्य वेतन त्रुटी समितीच्या वतीने ग्राम विकास विभागामार्फत राज्य कोअर कमिटीचे श्री महेश देशमुख,विक्रम वागारे,श्री संतोष वारंग श्री राजेश दुरगुडे,श्री संदीप ओलेकर यांनी वेतन त्रुटी संदर्भात आपली बाजू भक्कमपणे मांडली.
त्यासंदर्भात महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षकांच्या वेतनात पडणारा फरक यावर सविस्तर विवेचन करण्यात आले . त्रुटींची पार्श्वभूमी त्रुटींचे परिणाम तसेच त्यावर काय उपाय केले जातील याबाबत आपली भूमिका स्पष्ट व भक्कमपणे मांडली .
येणाऱ्या काळात नक्कीच आपली वेतन त्रुटी दूर होईल अशी आशा निर्माण झाली आहे.....
यावेळी श्रीमती राजेश्री पाटील श्री. गजानन काकडे श्री दत्ता भोंडकर श्री भटकर सर श्री परेश आंधारे,विजय अजित जोशी संतोष मोहिते अंकुश महाडिक सत्याजित ढेपे महेंद्र पाटील उपस्थित होते
सविस्तर माहित लवकरच देण्यात येईल...
🙏महेश देशमुख

आज शंभूची इयत्ता पाचवीमध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत शिष्यवृत्ती धारक झाल्याने पहिल्या वर्षाची रक्कम त्याच्या खात्य...
10/04/2024

आज शंभूची इयत्ता पाचवीमध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत शिष्यवृत्ती धारक झाल्याने पहिल्या वर्षाची रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली ...खऱ्या अर्थाने आजची ही रक्कम त्याच्या आयुष्यातील स्व कष्टाने मिळवलेली पहिली कमाई.......

नवोदय विद्यालय पात्रता परिक्षेत आमचे मित्र श्री दत्ता घायाळ सर यांचे भाचे चि.पर्थ सोनवणे याची नवोदय विद्यालय परतूर येथे ...
01/04/2024

नवोदय विद्यालय पात्रता परिक्षेत आमचे मित्र श्री दत्ता घायाळ सर यांचे भाचे चि.पर्थ सोनवणे याची नवोदय विद्यालय परतूर येथे निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन......तसेच त्यांचे मार्गदर्शक श्री घायाळ सर व तांबेकर सर यांचेही खूप खुप अभिनंदन.....

आज गया फाउंडेशन चिखली व समस्त शिक्षक वृंद व मित्र परिवार राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवोदय पात्र विद्यार्थी क...
31/03/2024

आज गया फाउंडेशन चिखली व समस्त शिक्षक वृंद व मित्र परिवार राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवोदय पात्र विद्यार्थी कु.गौरवी विनोद पांडे व कु.श्रावणी गणेश अप्पा दारुवाले तसेच त्यांचे मार्गदर्शक श्री लहाने सर यांचा गौरव करण्यात आला. ....
खर तर विद्यार्थी वर्षभर मेहनत करून परीक्षेत यश संपादन करत असतात त्यांचा उत्साह वाढवा तसेच इतरांना देखील त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा छोटेखानी कार्यक्रम हाती घेतला आहे.त्यात आपण सहभागी झालात व चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित झाला.त्यांच्या सोबत आपण जेव्हा फोटो काढत असतो त्यावेळी आपण काही तरी खास आहोत ही भावना त्यांचा आत्मविश्वास वाढवीत असते.हाच आत्मविश्वास घेऊन ते पुढील भरारी घेण्यासाठी सज्ज होत असतात.त्यांना बळ देण्याचं काम आपल्या उपस्थितीने झालं. तसेच आज आपण श्री लहाने सर यांचा देखील कार्य गौरव केला.त्यांचे विद्यार्थी प्रती असलेला स्नेह आणि कर्तव्याप्रती निष्ठा खरोखर कौतुकास्पद आहे.
आ. बोराडे सरांनी सांगितल्याप्रमाणे हे संस्कार क्लासेसच्या मोती आहेत आणि हेच संस्कार मोती पुढे चालून आपल्या गावाचे तसेच परिसराचे नाव उज्वल करणार आहे .
"हे राजुरेश्वरा त्यांना उंच उडण्याचे बळ दे.लढण्याचे सामर्थ्य दे.अन् जिद्दीचे पुढे जाण्याची प्रबळ इच्छाशक्ती दे".......
🙏🙏🙏महेश देशमुख
गया फाउंडेशन, चिखली

18/03/2024

✍️✍️✍️✍️✍️

सर्वांना नमस्कार,
आज संध्याकाळी ठीक 8.15 वाजता वेतन त्रुटी कृती समिती राज्य कोअर कमिटीची बैठक पार पडली.त्यात 27 जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक व प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत सर्वप्रथम लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेले शिक्षक तसेच या लढ्यात मदत करणारे सर्व अधिकारी व पदाधिकारी , राज्यातील सर्व शिक्षक संघटना यांचे आभार व्यक्त केले.पुढील बाबींवर चर्चा झाली.

1) सर्व प्रथम वेतन त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जी.आर. चा सविस्तर अर्थ सांगण्यात आला.त्यानुसार
ही समिती वेतन त्रुटी कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आली आहे.तसेच इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या त्रुटी बाबतचा प्रस्ताव संबधित कार्यालयामार्फत समिती कडे दोन महिन्याच्या आत द्यावा.समिती न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी असलेल्या तसेच इतर संवर्गातील त्रुटी बाबत अहवाल सहा महिन्यांत राज्यशासनास देईल.


2) कोणत्याही मान्यताप्राप्त संघटनेने वेतन त्रुटी दूर करण्याबाबत समितीस अथवा प्रशासनास नी निवेदन द्यायचे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांच्या व राज्य कोअर कमिटीच्या मागणीत एक वाक्यता असावी म्हणून शक्यतो राज्य कमिटीने तयार केलेला ड्राफ्टच वापरावा.त्यासंबंधी तशी विनंती संबधित संघटनेस करावी.

3) न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी असलेल्या व नसलेल्या सर्व जिल्ह्यांनी संचालक व आयुक्त कार्यालयात प्रत्यक्ष वेतन त्रुटी बाबतचा प्रस्ताव देण्यासंबंधी निवेदन आठ दिवसांत द्यावे.तसा ड्राफ्ट राज्य कोअर कमिटी तयार करून देईल.

4)वेतन त्रुटी समिती समोर आपले म्हणणे मांडण्यासाठी तसेच वेतन त्रुटी दूर करण्यासाठी उपाय व पर्याय यावर सविस्तर झाली.

5) आदर्श आचार संहिता संपल्यानंतर वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्यातील 288 आमदाराचे पत्र मा मुख्यमंत्र्यांना देणे.

6)राज्य कोअर कमिटी ची मध्यवर्ती ठिकाणी बैठक आयोजित करून पुढील दिशा ठरवणे.

आपल्यासाठी हे सहा महिने खूप महत्वाचे आहे.त्यामळे अभी नही तो कभी नहीं है लक्षात घेऊन सर्वांनी एकत्रित येऊन या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन राज्य कोअर कमिटीच्या वतीने करण्यात आले.

🙏🙏 महेश देशमुख

आज तुमसर मोहाडी जिल्हा भंडारा  विधानसभेचे आमदार श्री राजू करेमारे यांनी सातव्या वेतन आयोगातील  प्राथमिक शिक्षकांच्या त्र...
05/12/2023

आज तुमसर मोहाडी जिल्हा भंडारा विधानसभेचे आमदार श्री राजू करेमारे यांनी सातव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांच्या त्रुटी दूर करण्यासाठी मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब वित्तमंत्री श्री अजितदादा पवार ग्रामविकास मंत्री श्री महाजन साहेब शिक्षण मंत्री श्री केसरकर साहेब मुख्य सचिव वित्त सचिव शिक्षण सचिव यांना पत्र लिहून वरिष्ठ वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करण्यासाठी विनंती केली .यावेळी भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांशी चर्चा करतांना त्यांनी व्यवस्थीत विषय समजून घेतला व या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी भंडारा जिल्ह्यातील राज्य कोअर कमिटी सदस्य श्री दामोधर डहाळे यांच्यासह प्रमोद आंबुले ,सुनील बारेकर, श्री के एस अंबडारे, श्रीमती प्रीती बारेकर श्री के एस चव्हाण , श्री व्ही एम घुले, श्री पि के काळे, श्री संघ राज डोंगरे श्री आर एम राऊत आदी शिक्षक उपस्थित होते

आज मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे बालागोपालांसह जाऊन राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्म स्थळाचे दर्शन घेतले....
11/11/2023

आज मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे बालागोपालांसह जाऊन राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्म स्थळाचे दर्शन घेतले....

विधीमंडळातील युवा आभ्यासू व कार्य कुशल आमदार महाराष्ट्रातील युवकांचे आशास्थान,श्री.सत्यजित तांबे यांना वाढदिवसानिमित्त ह...
27/09/2023

विधीमंडळातील युवा आभ्यासू व कार्य कुशल आमदार महाराष्ट्रातील युवकांचे आशास्थान,श्री.सत्यजित तांबे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
आपल्याला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.

24/09/2023

Address

Chikhali

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Deshmukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category