श्री रामचंद्र किसन महाजन आय टी आय पिलखोड

  • Home
  • India
  • Chalisgaon
  • श्री रामचंद्र किसन महाजन आय टी आय पिलखोड

श्री रामचंद्र किसन महाजन आय टी आय पिलखोड Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री रामचंद्र किसन महाजन आय टी आय पिलखोड, Education, At Post Pilkhod, Chalisgaon.

आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त श्री रामचंद्र किसन महाजन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजर...
14/04/2026

आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त श्री रामचंद्र किसन महाजन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य
सचिन प्रकाश बाविस्कर यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यानंतर उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन के. बी. बाविस्कर यांनी केले, तर कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला.
आभार प्रदर्शन चव्हाण सर यांनी मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानून केले.या कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

21/01/2026

चाळीसगाव तालुक्यात राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नावाजलेलं नाव कै.भाऊसो रामचंद्र किसन महाजन, भाऊ हे पिलखोड गावाचे सरपंच, सर्वोदय शिक्षण प्रसारक उंबरखेड संस्थेचे संचालक, चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, व तसेच श्रीकृष्ण माळी समाज हितवर्धक संस्था पिलखोड व नवयुवक सामाजिक शैक्षणिक संस्था चाळीसगाव चे संस्थापक अध्यक्ष कै. भाऊसो रामचंद्र किसन महाजन यांचे आज २८ वे पुण्यस्मरण, भाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...... 💐💐💐

21/01/2026
राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे औचित्य साधुन आमच्या संस्थेत विद्यार्थ्यांना नागरी सुरक्षा दलाकडून सुरक्षे संदर्भात प्रशिक्षण का...
06/03/2025

राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे औचित्य साधुन आमच्या संस्थेत विद्यार्थ्यांना नागरी सुरक्षा दलाकडून सुरक्षे संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नागरी सुरक्षा दलाचे श्री. बागुल सर यांनी प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण दिले.

महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयो...
02/10/2024

महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. त्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब प्रकाश रामचंद्र बाविस्कर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन लाभले, कृषि तंत्र विद्यालय व आय टी आय चे प्राचार्य व गट निदेशक हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरे सर प्रास्तविक साळुंखे सर, पारितोषिक वितरण सुर्यवंशी सर व कार्यक्रमाचे आभार मगर सर यांनी मानले.

13/09/2024

Follow the श्री. रामचंद्र किसन महाजन आय टी आय पिलखोड channel on WhatsApp:

आज शिक्षक दिन, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन तसेच शैक्षणिक वर्ष 2024-26 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्...
06/09/2024

आज शिक्षक दिन, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन तसेच शैक्षणिक वर्ष 2024-26 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संस्थेत थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य श्री ए बी बाविस्कर सर तसेच प्रमुख पाहुणे पिलखोड चे सरपंच श्री भीमराव यशोद, उपसरपंच संदीप मोरे, ग्रा वि अधिकारी जयवंत येवले तसेच संस्थेचे सचिव दादासाहेब गोकुळ रामचंद्र बाविस्कर हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले,
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी हिरे, तसेच प्रास्ताविक श्री एन बी चव्हाण, स्वागत समारंभ विशाल सूर्यवंशी व श्री जितेंद्र माळी यांनी मान्यवरांचे आभार मानले.
Parag Mali
Yadnesh Baviskar

Address

At Post Pilkhod
Chalisgaon

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री रामचंद्र किसन महाजन आय टी आय पिलखोड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category