04/01/2026
जयहिंद विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती व निरोप समारंभ—एक प्रेरणादायी सोहळा*
जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळाच्या अध्यक्षा तथा कार्यक्रमाच्या उद्घाटिका सौ. लताताई अशोक खलाणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांचे स्वागत श्रीमती मृणाली मोरे यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आबासाहेब जगन्नाथ खलाणे , डॉ. शामली थोरात महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डॉ. अर्चना वाघ, सम्राट अशोक अध्यापक विद्यालय, श्री सावता महाजन मंदोदरी खलाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्री राजेंद्र कोष्टी (मॉडर्न औद्योगिक प्रशिक्षण संस्था), श्री मावळे सर (हॅरिसन पब्लिक स्कूल, चाळीसगाव), श्री संजय सोनवणे,आदर्श प्राथमिक विद्यालय,श्रीमती सोनाली महाजन, सम्राट अशोक प्राथमिक विद्यालय उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात सौ. लताताई अशोक खलाणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे मार्गदर्शन केले व प्रेरणा दिली. प्रमुख पाहुण्या डॉ. अर्चना वाघ यांनी बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधी, अभ्यासक्रम तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी श्रीमती सुवर्णा कोतकर मॅडम यांनी दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अभ्यास नियोजन व तयारीबाबत मौलिक विचार मांडले.
कार्यक्रमाची प्रस्तावना जयहिंद विद्यालयाचे प्राचार्य श्री. अभिजीत खलाणे सर यांनी केली. त्यांनी विद्यालयातील विविध शैक्षणिक सुविधा, उपक्रम यांची माहिती देत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास प्रोत्साहित केले.
कार्यक्रमात नववीच्या विद्यार्थ्यींनी स्वागतगीत सादर केले. तसेच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मनोगतुन व्यक्त केले.
सांस्कृतिक विभागाची जबाबदारी अंकिता खलाणे व मृणाली मोरे यांनी समर्थपणे सांभाळली. सूत्रसंचालन श्री मनोज गाडीलोहार सर व श्रीमती सोनिया गायकवाड मॅडम यांनी केले