24/09/2025
आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो,
सहकार विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज बुलढाणा आपल्या नवीन उपक्रम,विद्यार्थ्यांच्या हिताबद्दल,त्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत नेहमीच अग्रेसर आहे. तसेच ज्युनिअर कॉलेज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धात्मक कोर्सेस जसे *NEET/JEE/MHT-CET/NDA/ Commerce* तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. यामध्ये *JEE/MHT-CET* सारख्या परीक्षा देशपातळीवर ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात. अशा या परीक्षांची ऑनलाईन तयारी झाली पाहिजे या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच *150* कॉम्प्युटरची सुसज्ज अशी *Exam Lab* विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आली आहे हि एक अभिमानास्पद बाब आहे. या मध्ये इयत्ता *११ वी व १२ वी JEE/CET* मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता दर आठवड्यात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येतात. जे विद्यार्थी सहकार विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ऑनलाईन exam सेंटर चा लाभ घेता येणार आहे. तरी जे विद्यार्थी *JEE व CET* परीक्षा *online* पद्धतीने देण्यास इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांनी सहकार विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये संपर्क साधावा.
अधिक माहितीकरिता संपर्क : 8087583963