ABVP - Bramhapuri

ABVP - Bramhapuri �WORLD'S LARGEST STUDENT ORGANISATION �

अभाविप ब्रम्हपुरी तर्फे बस आगार व रेल्वे स्थानक येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आला.सतत वर्षाचे 365 दिवस विद्यार्थ्यांच्या ...
11/08/2022

अभाविप ब्रम्हपुरी तर्फे बस आगार व रेल्वे स्थानक येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

सतत वर्षाचे 365 दिवस विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या सेवेत असलेले ब्रम्हपुरी आगारातील कर्मचारी वर्ग व रेल्वे स्थानकातील कर्मचारी यांना अभाविपच्या विद्यार्थिनीं कार्यकर्त्यांनी औक्षवन करून राखी बांधली व महिला कर्मचाऱ्यांना विद्यार्थी कार्यकर्त्यांनी सुद्धा राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरा केला.

नेवजाबाई हितकारीनी महाविद्यायाचे नवनिर्वाचित प्राचार्य डॉ. डी. एच. गहाने सर यांना पुढील कार्यासाठी  अभाविप ब्रम्हपुरीच्य...
04/08/2022

नेवजाबाई हितकारीनी महाविद्यायाचे नवनिर्वाचित प्राचार्य डॉ. डी. एच. गहाने सर यांना पुढील कार्यासाठी अभाविप ब्रम्हपुरीच्या शिष्टमंडळा तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. व विविध शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली.

🚩पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🚩
20/07/2022

🚩पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🚩

जातीपेक्षा राष्ट्र प्रथम- सोपानदादा कनेरकरशनिवार दी.9 जुलै रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिवसाच्या तसेच...
12/07/2022

जातीपेक्षा राष्ट्र प्रथम- सोपानदादा कनेरकर
शनिवार दी.9 जुलै रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिवसाच्या तसेच विदयार्थी दिवसाच्या निमित्ताने ब्रम्हपुरी नगरीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.यामध्ये तालुक्यातील माध्यमिक तसेच ऊच्च माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालयातील दहावी आणि बारावी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला अश्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ब्रम्हपुरी नगरचे नाव उंचावण्याचे काम ज्यांनी केले ते क्रीडा क्षेत्रातील मूल आणि मुली ,तसेच सामाजिक क्षेत्रात चांगली कामे करणाऱ्या लोकांचा या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी तर्फे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. चंद्रपूर विभाग विभगसांघाचालक श्री. जयांतजी खरवडे ,प्रमुख अतिथी म्हणून प्रा. धर्मेंद्र मुणघाटे सर आणि प्रमुख वक्ता म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते, युवा कीर्तनकार मा. सोपानदादा कनेरकर हे उपस्थीत होते. या कार्यक्रमाला संभोधतांना सोपानदादा यांनी जातीपेक्षा राष्ट्रप्रथम ही संकल्पना मांडली .

 #आषाढी_एकादशी_च्या_शुभेच्छा
10/07/2022

#आषाढी_एकादशी_च्या_शुभेच्छा

06/07/2022
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी जिल्ह्यासाठी स्प्लेंडर प्लस ही  नवीन मोटर सायकल घेण्यात आली. त्यानिमित्ताने  अभा...
29/06/2022

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी जिल्ह्यासाठी स्प्लेंडर प्लस ही नवीन मोटर सायकल घेण्यात आली. त्यानिमित्ताने अभाविप पूर्व कार्यकर्ते प्रा. विद्याधर भाई सर आणि रोशन दलाल यांच्या हस्ते मोटर सायकल चे पूजन करण्यात आले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,ब्रम्हपुरी जिल्हा .नमस्कारआपणाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे प्रत्येक्षरीत्या कार्य करा...
06/06/2022

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,ब्रम्हपुरी जिल्हा .
नमस्कार
आपणाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे प्रत्येक्षरीत्या कार्य करायचे असेल तर खालील दिलेली गुगल लिंक ओपन करून फॉर्म भरावे.
*Join ABVP*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfXCqHcpc-PH6VJl8ZYOFGmpfBnYRZhFNAZooPvH_tLG4l0tQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0

अभाविपचा गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव !अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी जिल्हा द्वारे गोंडवाना विद्या...
21/05/2022

अभाविपचा गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी जिल्हा द्वारे गोंडवाना विद्यापीठावर विद्यार्थ्यांनच्या विविध समस्यांना घेऊन दि 21 मे ला निदर्शने झालीत यामधे नागपूर विद्यापीठाने परीक्षा संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाने सुद्धा नागपूर विद्यापीठाची ऑफलाईन MCQ पॅटर्न परीक्षा गोंडवाना विद्यापीठात सुद्धा राबवावी यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही तसेच परीक्षेचा प्रश्नसंच विद्यापीठाच्या संकेत स्थळावर अजून सुध्दा आली नाही त्यामुळे ती लवकरात लवकर संकेत स्थळावर टाकावी.
विद्यापीठातील विद्यार्थी अजून सुद्धा प्रयोगशाळेपासून वंचित आहेत त्यामुळे लवकरात लवकर विद्यापीठाची स्वतंत्र प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी
तसेच आचार्य पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोर्सवर पूर्ण होऊन जवळजवळ सहा महिने पूर्ण झाले तरीसुद्धा कोर्स नंतरचे अजूनही परीक्षा आपल्या विद्यापीठाने घेतली नाहीत , आचार्य पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रिसर्च सेंटर ची फी ही यावर्षी विद्यापीठाने अवाढव्य वाढवली आहे त्याचा फटका सामान्य विद्यार्थ्यांना बसला आहे त्यामुळे ही फीे कमीत कमी करण्यात यावी , जिमखाना , अभियांत्रिकीची परीक्षा पुढे ढकलावी यासारख्या अन्य विषयावर सुद्धा अभाविप ने निवेदनात मागणी केली दिलेल्या निवेदनाची दखल जर विद्यापीठाने लवकरात लवकर नाही घेतली तर अभाविप द्वारे विद्यापीठाला कुलूप लावण्यात येईल असा इशारा अभाविप नगरमंत्री जयेश ठाकरे , जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर ,चेतन कोलते,अमन नवघडे , श्रुती काणेकर ,सागर हाजरा , तुषार तांबेकर , चिराग कोटगले ,प्रवीण चलाख,संदेश उरकुडे,अर्पित नंदेश्वर,सोनल राखडे,संकेत सोनुले,हर्षद कायाकर ,खिलेश फरदिया ,आकाश मेश्राम प्रांत सहमंत्री अभिषेक देवर , ब्रह्मपुरी जिल्हा संघटन मंत्री प्रवीण पात्रिकर ,गडचिरोली विभाग संघटन मंत्री शक्ती केराम आदींनी इशारा दिला.

Address

Bramhapuri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP - Bramhapuri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share