28/01/2026
ग्रह म्हणजे फक्त भविष्य सांगणारी यंत्रणा नाही.
ते आपल्याला आपण कसे आहोत हे दाखवतात.
आपल्या प्रतिक्रिया, भावना, विचार
हे सगळं कसं तयार होतं —
याबद्दल शांतपणे बोलणारी ही पोस्ट आहे.
वाचताना कदाचित स्वतःलाच ओळखाल.
जरा वेळ काढून वाचा.
आवडलं तर like करा
आणि वाटलं तर कंमेंट मध्ये मनातलं लिहा.
https://www.facebook.com/share/p/14SmKUE5tKf/
ग्रह आपल्याला ओळख देतात म्हणजे नेमकं काय करतात?
आपण अनेकदा सहज बोलतो —
“मी असा आहे.”
“माझा स्वभावच असा आहे.”
“माझं मन फार लवकर दुखावतं.”
“मी लोकांवर पटकन विश्वास ठेवत नाही.”
ही वाक्यं आपण इतक्या सहजतेने वापरतो की कधी थांबून विचारही करत नाही —
हा ‘मी’ असा तयार तरी कसा झालो?
आपण जन्माला येताना कोरा कागद नसतो.
आपण काही ठराविक प्रवृत्ती, प्रतिक्रिया आणि भावनिक रचना घेऊन जन्मतो.
ज्योतिषशास्त्र याच रचनेला शब्दात मांडत..
शास्त्र आपल्याला सांगत की -
ग्रह आपल्याला भविष्य देतात, हा एक मोठा गैरसमज आहे,
खरं तर ग्रह आपल्याला भविष्य नाही, तर ओळख देतात.
ओळख म्हणजे फक्त नाव, आडनाव, शिक्षण किंवा व्यवसाय नाही.
ओळख म्हणजे —
आपण कशावर पटकन प्रतिक्रिया देतो
कोणत्या गोष्टी आपल्याला अस्वस्थ करतात
कोणत्या गोष्टी आपल्याला शांत करतात
आपल्याला लोकांमध्ये राहायला आवडतं की एकटं
आपण संकटात लढतो की मागे हटतो
ही सगळी उत्तरं आपोआप तयार होत नाहीत.
ही आपल्या आतल्या रचनेतून येतात.
आणि ही रचना ग्रह तयार करतात.
ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाचं शरीर वेगळं असतं,
तसंच प्रत्येकाचं मन, भावना आणि प्रतिक्रिया देण्याची पद्धतही वेगळी असते.
दोन मुलं एकाच घरात वाढतात,
तरी एक अतिशय संवेदनशील
आणि दुसरा फारच practical असतो.
कारण upbringing जरी सारखं असलं,
तरी आतून असलेली ग्राहांची रचना वेगळी असते.
ग्रह ही आतली रचना ठरवतात.
आता हेच बघा ना-
समजा एकच प्रसंग घेतला
की कोणीतरी टीका केली.
तर त्यावर एखादी व्यक्ती शांत राहते.
दुसरी लगेच उत्तर देते.
तिसरी आतून दुखावते पण बोलत नाही.
तर चौथी लगेच तिथून दूर जाते.
प्रसंग तोच.
पण प्रतिक्रिया वेगवेगळ्या.
ही प्रतिक्रिया शिकवलेली नसते.
ती स्वाभाविक असते.
आपण दुखावल्यावर काय करतो
राग आला की व्यक्त करतो की गिळतो
अपमान झाल्यावर लढतो की माघार घेतो
यावरूनच आपली ओळख तयार होते.
खरं तर आपलं मन आणि आपल्या भावना या आपल्या ओळखीचा केंद्रबिंदू असतात.
आपण कधी कधी स्वतःलाच म्हणतो बघा -
“मला माहित आहे इतकं मोठं असं काही झालेलं नाही… पण तरीही मन लागत नाही.”
इथे बुद्धी काही चूक करत नसते.
तर मन बोलत असतं.
याचाच अर्थ काय तर -
मन म्हणजेच भावना, आठवणी, भीती, सुरक्षिततेची गरज.
हे मन प्रत्येकाचं वेगळ्या पद्धतीने काम करतं.
कोणी फार भावनिक असतो.
कोणी भावनांवर नियंत्रण ठेवतो.
कोणी लवकर attach होतो.
तर कोणी फार वेळ घेतो.
कारण ग्रह आपली भावनिक रचना ठरवतात.
आणि त्यामुळेच आपली ओळख वेगळी असते.
तसेच आपण काय कृती करतोय
आणि कुठे धैर्य दाखवतोय,
आपण पुढे जातो की थांबतो?
यावरूनही आपली ओळख ठरते.
काही लोक संकटात लगेच उभे राहतात.
“चालेल, काहीतरी करूया” असं म्हणतात.
काही लोक मात्र विचारात अडकतात.
“आधी सगळं नीट बघूया” असं म्हणतात.
हे धाडस किंवा भीती नाही.
तर ही ऊर्जेची दिशा आहे.
आपण किती पटकन action घेतो
आपण राग कसा व्यक्त करतो
आपण संघर्षाला कसं सामोरं जातो
यातूनही आपली ओळख तयार होत असते —
आपण action-oriented आहोत की cautious हे ह्यातून समजत.
त्याचप्रमाणे आपले विचार, आपला संवाद आणि आपल्याला असणारी समज ह्यातूनही आपली एक वेगळी ओळख जगासमोर येतं असते.
उदाहरणच बघायचं झालं तर
आपण सगळे एकसारखे बोलत नाही.
एकाच गोष्टीवर
कोणी स्पष्ट बोलतो,
कोणी गोंधळात टाकणार बोलतो
कोणी शांतपणे बोलतो
तर कोणी खूप शब्दांत व्यक्त होतं
हे intelligence कमी-जास्त असण्याचं लक्षण नाही.
ही विचार करण्याची पद्धत आहे.
थोडक्यात काय तर
आपण कसा विचार करतो
कसं शिकतो
कसं व्यक्त होतो
हे सगळं ग्रह ठरवत असतात.
म्हणूनच सगळ्यांना सगळं सारखं जमत असं नाही.
आपण प्रेम कसं करतो?
आणि आपल्याला प्रेम कसं हवं आहे?
यालाही असंख्य कंगोरे असतात.
कोणी शब्दांनी प्रेम व्यक्त करतो.
कोणी कृतीने.
कोणी वेळ देऊन.
कोणी सुरक्षितता देऊन.
जर ही भाषा जुळली नाही,
तर “प्रेम असूनही” नातं अडतं.
थोडक्यात ग्रह आपली भावनिक भाषा ठरवतात.
ही भाषा समजली की नात्यांमधले गैरसमज कमी होतात.
प्रत्येक माणसाकडे एक natural strength असते
आणि काही weakness
आपण सगळ्यातल सगळं करू शकत नाही.
आणि ते चुकीचंही नाही.
कारण ग्रह आपल्याला सांगतात —
कुठे आपली ताकद आहे
कुठे जास्त मेहनत घ्यावी लागेल
कुठे संयम आवश्यक आहे
आणि हीच माहिती स्वतःला स्वीकारायला मदत करते.
थोडक्यात काय तर ग्रह आपल्याला ओळख देतात म्हणजे नेमक काय देतात?
ग्रह आपल्याला नशीब देत नाहीत.
ते आपल्याला स्वभाव, प्रतिक्रिया आणि जीवनदृष्टी देतात.
ते सांगतात — आपण कसे विचार करतो
कसे प्रेम करतो
कसे दुखावतो
कसे घडतो
ते आपल्याला बदलायला भाग पाडत नाहीत.
ते आपल्याला समजावतात.
थोडक्यात सांगायचं झालं तर...
ज्योतिष म्हणजे
“उद्या काय होईल?” याचं उत्तर नाही.
ज्योतिष म्हणजे
“मी असा का आहे?”
याचं उत्तर.
आणि जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो,
तेव्हा स्वतःशी भांडण कमी होतं.
स्वीकार वाढतो.
आणि आतून शांतता सुरू होते.
म्हणजेच ग्रह फक्त दिशा दाखवतात.
चालायचं…
आणि घडायचं…
आपल्यालाच असतं.
अंबज्ञ 🙏🏻
Dr. Sonal Ajit Pandit
(Ph.D. in Astrology & Aromatherapy | Astroaroma)