ZEST Academy

ZEST Academy ZEST is an excellent educational institution providing quality and competitive coaching for the students of
RSCS SAINIKI JR COLLEGE and
SHRI. Biloli Dist.

CHHATRAPATI SHIVAJI JR COLLEGE, Sagroli Tq. Nanded

झेस्ट सायन्स चे ज्येष्ठ शिक्षक श्री विजय चिद्रावर यांना महात्मा ज्योतिराव शिक्षण परिषदे तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प...
04/09/2023

झेस्ट सायन्स चे ज्येष्ठ शिक्षक श्री विजय चिद्रावर यांना महात्मा ज्योतिराव शिक्षण परिषदे तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नांदेड येथे नुकताच प्रदान करण्यात आला असून त्यांचे अभिनंदन zest science च्या वतीने करण्यात आले.

*प्रमोद पाटील यांनी NDA/JEE/NEET यशस्वी होण्याचा दिला कानमंत्र*संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी व करिअर पॉईंट कोटा यांच्या स...
24/07/2023

*प्रमोद पाटील यांनी NDA/JEE/NEET यशस्वी होण्याचा दिला कानमंत्र*

संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी व करिअर पॉईंट कोटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या XI Kota batch व VI ते XII वी पर्यंत च्या फाउंडेशन बॅच च्या विद्यार्थी व पालकांना श्री प्रमोद पाटील यांनी सविस्तर असे मार्गदर्शन करत 12 वी नंतर विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर च्या विस्तृत संधी बद्दल माहिती दिली.

*बारावी बोर्ड परीक्षेत सामान्य ज्ञान विषयात तुकाराम चे १०० गुण : सैनिकी विद्यालयासाठी विशेष विषयात राज्यात प्रथम : तांत्...
24/07/2023

*बारावी बोर्ड परीक्षेत सामान्य ज्ञान विषयात तुकाराम चे १०० गुण : सैनिकी विद्यालयासाठी विशेष विषयात राज्यात प्रथम : तांत्रिक कारणासाठी निकाल उशिरा प्राप्त*

“मला प्रथम प्राप्त झालेल्या सामान्यज्ञान विषयात चक्क १० गुण पाहून मी नाराज झालो. हे केवळ अशक्य असल्याचे माझ्यासह माझे शिक्षक डॉ. मंगेश कुलकर्णी यांना पण वाटले. त्यांनी शाळेच्या वतीने पत्रव्यवहार करून सत्यस्थिती पडताळून पहिली असता मंडळाच्या तांत्रिक अडचणीमुळे असे चूक झाली आणि मला विषयात १०० पैकी १०० गुण मिळाल्याचे समजले. मी नियमित चालू घडामोडीसह इतिहास, भूगोल आदी विषयांचे वाचन करीत असे. राज्य मंडळाच्या वतीने ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. त्याचा योग्य सराव व्हावा यासाठी अध्यापक डॉ. मंगेश कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांचा चांगला सराव घेतला. त्यामुळेच मला हे यश मिळविता आले”, - तुकाराम कासेवार

या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गिरीश अलुरकर तसेच झेस्ट सायन्स विभागाचे प्रमुख श्री पाटील साईनाथ व अन्य सहकार्यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले. यावेळी सैनिकी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पुढे सैन्य दलात प्रवेश घेण्याचे स्वप्न मी पूर्ण करणार असे तुकाराम यांनी सांगितले.

झेस्ट मध्ये जे शिकलो ते अमेरिकेमध्ये सादर करण्याची संधी संस्कृति संवर्धन मंडळाने उपलब्ध करून दिली - राहुल देगलुरे 2018 झ...
21/07/2023

झेस्ट मध्ये जे शिकलो ते अमेरिकेमध्ये सादर करण्याची संधी संस्कृति संवर्धन मंडळाने उपलब्ध करून दिली - राहुल देगलुरे
2018 झेस्ट बॅच च्या माजी विद्यार्थ्याचे मनोगत.

झेस्ट मधून 12 वी पूर्ण केल्यानंतर राहुल यास संस्थेने रोटरी क्लब च्या माध्यमातून त्यास कोल्हापूर येथे हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पदवी पूर्ण करण्यास सहाय्य केले.

पुढे त्याची अमेरिकेतील जे -1 internship programme अंतर्गत "Nopsi Hotel New Orleans in State Louisiyana" येथे शेफ या पदी वार्षिक 23 लाख एवढ्या मानधनासह नेमणूक झाली आहे.

10/05/2023

नमस्कार विद्यार्थी व पालक !
10 वी नंतर JEE/NEET/NDA च्या तयारीसाठी विद्यार्थी व पालकांचा ओढा हा शहरातल्या विविध क्लासेस कडे असतो. मात्र ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी, कष्टकरी, सामान्य व्यापारी व आर्थिक पाठबळ नसणाऱ्या या गटाची शहरातील क्लासेस ची फी भरणे व राहण्याखान्याची व्यवस्था करतांना कुचंबणा होऊन यांचे पाल्य JEE/NEET/NDA सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहातांना दिसतात.
या होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांना इतरांप्रमानेच समान संधी मिळावी म्हणून सं सं मंडळ सगरोळी येथील संस्थेने CAREER POINT, KOTA या नावाजलेल्या व यशस्वी क्लासेस च्या संयुक्त विद्यमाने नाममात्र फीस मध्ये कोटा येथील तज्ञ अध्यापकांचे मार्गदर्शन संस्था उपलब्ध करून देत आहे.
JEE/NEET/NDA चे थेओरी क्लासेस, अभ्यासिका व साप्ताहिक चाचणी चे नियोजन असून एनडीए च्या विशेष तयारीसाठी संस्थेने एसपीआय औरंगाबाद च्या धर्तीवर आधारित SWIMMING POOL, HOURSE RIDING, FIRING, SPORTS च्या सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय 6 वी ते 10 वर्गापासून JEE/NEET/NDA चे फौंडेशन क्लासेस देखील होणार आहेत.
तरी बाबत सविस्तर मार्गदर्शन (ORIENTATION) सत्राचे आयोजन मानधना निवास, नवीन सराफा, देगलूर येथे दि. 20 मे 2023 रोजी सायं. 6 वा. व हॉटेल नैवेद्यम, छत्रपती चौक, नांदेड येथे दि. 21 मे 2023 रोजी सायं. 6 वा. केले आहे. तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन (ORIENTATION) सत्राचा लाभ घ्यावा हि विनंती.

27/01/2023
*पोचारम अभयारण्यात झेस्ट च्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद* एक दिवसीय शैक्षणिक सहलीमध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांनी ...
09/01/2023

*पोचारम अभयारण्यात झेस्ट च्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद*
एक दिवसीय शैक्षणिक सहलीमध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांनी मेदक ( तेलंगणा ) येथील आशिया खंडातील क्रमांक दोन चे सर्वात जूने व मोठे चर्च पहिले. सात प्रवाहाच्या संगमवरती वसलेल्या ( एडूपायलू ) दुर्गा मातेचे व नेमली येथील श्री साई बाबांचे दर्शन घेतले. विशेषत्वाने पोचारम अभयारण्यात DEER BREEDING CENTRE ला भेट देऊन GUIDE च्या मदतीने येथील हरण, नीलगाय, सांबर ई. प्राण्याविषयी अधिक माहिती घेतली. सहलीमध्ये 115 विद्यार्थी व 13 सहकारी सहभागी होते.

क्रिडा स्पर्धा:विविध क्रिडाप्रकारात झेस्ट च्या विद्यार्थ्यांचा दबदबा:अभ्याससोबतच आपली आवड जोपासत झेस्ट च्या विद्यार्थ्या...
24/12/2022

क्रिडा स्पर्धा:
विविध क्रिडाप्रकारात झेस्ट च्या विद्यार्थ्यांचा दबदबा:
अभ्याससोबतच आपली आवड जोपासत झेस्ट च्या विद्यार्थ्यांनी कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, गोळाफेक, थाळीफेक, क्रॉसकंट्री, रिले, जलतरण आणि फुटबॉल या विविध क्रिडास्पर्धेत तालुका पातळी पासून ते राज्य पातळी पर्यन्त यश मिळविले आहे. सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन!

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत झेस्ट च्या विद्यार्थ्यांचे यश:नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंह बॅडमिंटन इनडोअर स्टेडियम...
10/12/2022

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत झेस्ट च्या विद्यार्थ्यांचे यश:
नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंह बॅडमिंटन इनडोअर स्टेडियम मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत झेस्ट च्या विद्यार्थ्यांनी यश मिळऊन पुढील स्तरासाठी पात्र झाले आहेत. सर्व खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन.

To join Armed forces you should be deciplined, good at critical thinking, decesion making n communication skills such va...
13/09/2022

To join Armed forces you should be deciplined, good at critical thinking, decesion making n communication skills such valuable motivation given by Capt. Virendra Maka while addressing to ZEST students and senior students of RSCS Sainiki Vidyalaya.

Also he shared his experiences of serving in Siachen at -52 degree temp.
And he asked students to be physically and mentally fit.

Address

Biloli
431731

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+918919949257

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZEST Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ZEST Academy:

Shortcuts

Share

Category