20/12/2025
वारणा प्रसाद विद्यालय, बिळाशी या शाळेत शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझा आशीर्वाद व नमस्कार 🙏🙏
2026 हे वर्ष वारणा प्रसाद विद्यालय, बिळाशी - अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा विद्यालयात घेण्याचे आम्ही ठरवलेले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा नंतर कळवण्यात येईलच. या मेळाव्याला आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती. कार्यक्रम पत्रिका नंतर दिली जाईल. याप्रसंगी भव्य शोभा यात्रेचेही नियोजन करावयाचे आहे. दिनांक 29 जानेवारी 2026 ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हे सर्व कार्यक्रम आपण घेणार आहोत. आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढणार आहे. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. तेव्हा आपण नक्की भेटू या. धन्यवाद 🙏🙏