14/10/2022
जि. प. शाळा कवाड
आदर्श शाळेअंतर्गत कौशल्य शिक्षणावर भर देण्यात येईल असा अनामवीरा सुगंधित उटणे बनवण्याचा उपक्रम इ.7वी च्या विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला.
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मुद्दल स्वरूपात काही रक्कम जमा केली त्यातून साहित्य आणले .ते स्वतःच मिक्सरमधून फिरवून,चाळून पावडर बनवली.पॅकिंग साठी लागणारे लिफाफेसुध्दा विद्यार्थ्यांकडून बनवून घेण्यात आले.या उटण्यात सर्व आयुर्वेदिक घटकांचा वापर करण्यात आला असून यातून मिळणारा नफा विद्यार्थ्यांकडून सैनिक निधी म्हणून सैनिकांना पाठवणार आहोत.
तरी सर्वांना नम्र विनंती आहे कि आमच्या विद्यार्थ्यांच्या ह्या उपक्रमास आपणाकडून हे सुगंधित उटणे खरेदी करून शुभेच्छा व प्रोत्साहन द्यावे
मार्गदर्शक शिक्षक
श्री.भास्कर फुलपगारे
श्रीम.नंदा उदय फुलपगारे
तंत्र स्नेही शिक्षिका
श्रीम.शितल पुंजू सोनावणे
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे
आमचे सर्व शिक्षकवर्ग