अक्षर सुधार प्रकल्प....
Madhymik Vidyalay Rampuri
Official Page of माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी
11/03/2026
स्वराज्याच्या रक्षणाखातर मृत्यूलाही निर्भीडपणे कवटाळणारे 'स्वराज्यरक्षक' छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!
07/03/2026
जालना जिल्ह्यातील मौजे जळगाव सपकाळ ता.भोकरदन येथील श्री.भिकन जगन रोजेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत 812 वी रँक मिळवत या तरुणाने मिळवलेलं यश नेत्रदीपक आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मिळवलेले हे यश संपूर्ण जालना जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
वडील सालगडी म्हणून काम करत, तसेच घरची अवघी दोन एकर शेती सांभाळत होते; तर आईही मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होती. आर्थिक परिस्थिती बेताची असताना आणि शिक्षणाविषयी पुरेसे मार्गदर्शन नसतानाही भिकन यांनी अथक परिश्रमांच्या जोरावर मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.
भिकन, तुम्हाला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा!!! आपल्या हातून समाजाची सेवा घडो, हीच सदिच्छा..!
| #गौरव_महाराष्ट्राचा |
शिवजयंती.... विद्यार्थी मनोगत
शिवजयंती विद्यार्थी मनोगत...
20/02/2026
शिवजयंती....
19/02/2026
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्स्व निमित्ताने मनापासून शुभेच्छा...!
छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!
09/02/2026
मा व उच्च मा विद्यालय रामपुरी शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीनिमीत्त ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट
दरवर्षीप्रमाणे रामपुरी शाळेची सहल शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री तौर सर व पर्यवेक्षक वैराळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली छ.संभाजीनगर परिसर येथील बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, वेरूळ,घृष्णेश्वर,भद्रा मारोती व पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी जाऊन आली. विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन आपला इतिहास जाणून घेतला.केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष स्थळांना भेटी दिल्यामुळे इतिहास आणि भूगोल समजून घेण्यास विद्यार्थांना मदत झाली.सहलीदरम्यान शिक्षकांनी प्रत्येक ठिकाणाचे महत्त्व आणि इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.विद्यालयाचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,प्राध्यापकवृंद यांच्या सुनियोजित नियोजनामुळे ही सहल शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडली.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Address
Rampuri To Georai Road, Rampuri
Bhir
431129