Sks class

Call Directions Website Contact the school

Sks class sks class is a place where you can get the best education with all subject and skill full teaching.

14/05/2026

SK'S CLASS | Prize Distribution Ceremony part 3 | भव्य बक्षीस वितरण सोहळा भाग 3| Abacus Winners

08/05/2026

Prize Distribution Ceremony | भव्य बक्षीस वितरण सोहळा |

एस.के.एस क्लासच्या २०० विद्यार्थ्यांची गगनभरारीमान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरवविद्यार्थी व संचालक...
26/04/2026

एस.के.एस क्लासच्या २०० विद्यार्थ्यांची गगनभरारी
मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव
विद्यार्थी व संचालक इम्रान शेख यांच्या टिमचे सर्वत्र कौतूक
बीड/प्रतिनिधी: येथील जालना रोड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून अविरत कार्यरत असलेल्या एस.के.एस. क्लास व अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी विविध परिक्षांमध्ये मोठी गगनभरारी घेतली असून याचे औचित्य साधुन क्लासचे संचालक यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हावा यासाठी दि. २२ एप्रिल रोजी मोठ्या व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमोल गरकळ (विभागीय वनाधिकारी, बीड),भगवान सोनवणे (उपशिक्षणाधिकारी प्राथमिक बीड), शशिकांत सावंत (जेष्ठविधीतज्ञ जिल्हा व सत्र न्यायालय, बीड), नामदेव चांगण, उपप्राचार्य, दिलीप चौरे पाटील, कैलास चौरे पाटील, नितीन चौरे पाटील, डॉ. सुनील मस्तुद, व्यंकटेश वैष्णव (जिल्हा प्रतिनिधी, पुण्यनगरी), रमेश मस्के उपस्थित होते.
एस.के.एस. क्लासेसचे संचालक इम्रान शेख व त्यांची टिम नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काही धडपड करत असल्याचे वारंवार दिसून येते. एस.के. एस. च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी विविध परिक्षांमध्ये मोठी गगनभरारी घेतली असून यामध्ये राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत देशभरातील ६००० विद्यार्थ्यांमधून क्लासेसचे १६ राष्ट्रीय विजेते ज्यातील दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विजेते पदाला गावसणी घातली, म्हणजेच देशातून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान - रुद्र आत्माराम नवले व श्वेता रमेश मस्के या दोन विद्यार्थ्यांना मिळाला.एन.एम.एम.एस. परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात अकरा विद्यार्थी नशिब आजमावून पास होवून यश संपादन केले तर सायन्स व मॅथ इंटरनॅशनल ऑलंपियाड मध्ये एकूण ३६ मेडल व चार विद्यार्थी लेवल दोन साठी पात्र झाले आहेत. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत इयत्ता सहावी व नववी मधून १६ विद्यार्थी पास व एक विद्यार्थिनी लेवल दोन साठी पात्र ठरली आहे. त्याचबरोबर क्लासेसच्या अभ्यासावर आधारित २६ विद्यार्थ्यांना आऊटस्टँडिंग रिझल्ट हा सर्वात मोठा पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानंतर 18 विद्यार्थ्यांना कॉन्स्टंट रिझल्ट हा पुरस्कार देण्यात आला तसेच ३२ विद्यार्थ्यांना इम्प्रुव्हमेंट रिझल्ट अवॉर्ड जाहीर झाला. असल्याने मोठा उत्साह निर्माण झाला आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही थोड्या गोष्टी कमी राहिलेल्या २७ विद्यार्थ्यांची बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड मध्ये निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना दि. २२ एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, पुष्पगुच्छा देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास विशेष उपस्थितीमध्ये दत्ता आजबे दै. पुढारी, आप्पासाहेब महानोर दै. पुण्यनगरी, गणेश जाधव उपसंपादक दै. दिव्य मराठी,नितीन चव्हाण उपसंपादक दै. सकाळ, धनंजय जोगडे उपसंपादक दै. कार्यारंभ, अभिषेक सोळंके उपसंपादक दै. प्रजापत्र व लक्ष्मीकांत लिमकर सिनिअर टेक्नेशियन, महावितरण यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी देखन्या साहळ्यामध्ये सन्मान झाल्याने विद्यार्थी भारावून गेले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये एस.के.एस.चे संचालक इम्रान शेख व त्यांच्या टिमचे तोंडभरून कौतुक केले. क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मान्यवरांनी देखील कौतूक केले. क्लासेसच्या सर्व शिक्षक वृंदाला क्लासेसच्या वतीने बेस्ट टीचर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट
दोन विद्यार्थ्यांना सायकल भेट
अबॅकस स्पर्धेत देशातून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळविणाऱ्या रुद्र आत्माराम नवले व श्वेता रमेश मस्के या दोन विद्यार्थ्यांना सायकलचा प्रथम पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक भारावून गेल्याचे दिसून आले. तसेच यावेळी अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्यचे चित्र यावेळी दिसून आले.

Address

Sanskar Colony Jalna Road
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sks class posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sks class:

Shortcuts

Share

Category