Mpsc Aspirent

Mpsc Aspirent

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mpsc Aspirent, Education, Bhir.

29/11/2023
04/05/2023

गीतांजली चौथ्या कवितेचे(शीर्षक:प्रार्थना)

विपत्तीमध्ये तु माझे रक्षण कर,
ही माझी प्रार्थना नाही,
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा।

दु:खातापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे तु सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही ,
दु:खावर जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा।

जगात माझे नुकसान झाले केवळ फसवणूक वाट्याला आली, तर माझे मन खंबीर व्हावे एवढीच माझी इच्छा।

माझे तारण तु करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही,
तरुण जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे एवढीच माझी इच्छा।

माझे ओझे हलके करून
तु माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही,
ते ओझे वहायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा....

सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी ओळखुन काढेनच,
मात्र दु:खाच्या रात्री सारे जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये
एवढीच माझी इच्छा.......

- रवींद्रनाथ टागोर✍️

04/05/2023

✍✍

निसर्गाकडुन 6 गोष्टी शिकुया...🌳

मित्रांनो, माणसाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी निसर्ग आपल्याला मोफत देतो

जमीन आपल्याला खाण्यासाठी अन्न देते... झाडे ऑक्सिजन देतात... झाडांच्या फांद्यापासुन लाकडांपासून आपण वेगवेगळे साहित्य तयार करू शकतो, घर तयार करू शकतो. टेबल खुर्ची बनवु शकतो किंवा लाकडे जाळून त्यावर अन्न शिजवू शकतो...

थोडक्यात सांगायचं म्हणजे निसर्ग आपल्याला खूप काही देतो आणि खूप काही शिकवतो सुद्धा... आपल्या फक्त निसर्गाकडुन शिकता आलं पाहिजे...

आई बाबा आणि शिक्षक हे आपले तीन गुरु असतात कारण ते आपल्याला ज्ञान देतात आपल्याला शिकवतात...

त्याचप्रमाणे निसर्गसुद्धा आपला एक गुरुच आहे... आपण निसर्गाकडुन खूप साऱ्या गोष्टी शिकु शकतो. जीवन जगण्याचा मार्ग आपण निसर्गाकडुन शिकु शकतो... फक्त आपल्याला निसर्गाची भाषा समजायला हवी आणि आपल्यामध्ये शिकण्याची भुक असायला हवी....

मित्रांनो, निसर्गाकडुन मी ज्या गोष्टी शिकलो त्यासर्व गोष्टी तुमच्यासोबत Share करत आहे...
1) बदल हा निसर्गाचा नियम आहे.
👉 मित्रांनो, प्रत्येक चार महिन्यानंतर मौसम बदलत असतो... जसे की, उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा.

सध्या उन्हाळा सुरु आहे तरीसुद्धा पावसाळा सारखा पाऊस पडत आहे... म्हणजे काय वातावरणात बदल झाला... 😄

वातावरण जसे बदलते तसेच आपले मित्र, नातेवाईक बदलत असतात...

एखाद्या व्यक्तीवर तुमचा खूप विश्वास असेल आणि तो अचानक तुमच्याशी बोलत नसेल किंवा तो तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्याला परत कॉल msg करू नका... कोणावर जबरदस्ती करू नका...

बदल हा निसर्गाचा नियम आहे. काम झाल्यावर लोकं बदलतात त्यांना बदलु द्या आपण आपले चांगले कर्म करत रहा...

2) झाडासारखे बना अथवा द्याला शिका...
👉 मित्रांनो, झाडासारखे बना याचा अर्थ असा नाही की, तुम्ही अंगावर झाडाचा पाला बांधून झाडासारखं उभ राहावं... 😄😄😄🤦🏻‍♂️

*झाडासारखं बना म्हणजे झाडासारखं द्यायला शिका ते सुद्धा बिनमतलबचे...*

झाड माणसाला ऑक्सिजन, फळे देतो, फुले देतो, सावली देतो, झाड वाळल्यावर लाकडाचा इंधन म्हणून उपयोग केला जातो.

🌳 झाड आपल्याला कधी असं म्हणते का.?? तुला फळ पाहिजे असेल तर, मला एक टाकी पाणी दे किंवा मला 500 रुपये दे... 😅

झाड आपल्याला काहीच मागत नाही... झाड ज्या गोष्टी देऊ शकतो त्या गोष्टी तो प्रेमाने माणसाला देऊन टाकतो...

मित्रांनो, झाडे माणसाला खूप साऱ्या गोष्टी फुकटात देतो. मग आपण माणुस असुन एकमेकांना काही देऊ शकत नाही का..??

*तुम्ही म्हणाल, सर मी गरीब आहे.. माझ्याकडे पैसे नाही मग मी लोकांना काय देणार* 🤷‍♂️

आपण बोलु शकतो. लोकांना प्रेमाचे शब्द बोला. तुमच्या बोलण्यातून त्यांना आनंद मिळेल अशी प्रेमाची भाषा वापरा...

एखादा व्यक्ती अडचणीत असेल तर त्याला मार्ग सांगा प्रेमाने समजुन सांगा... देवाच्या मंदिरात गेल्यावर मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवा... लहान मुलांना प्रेरणादायी गोष्टी सांगा...

मित्रांनो, स्वतःच व्यक्तिमत्व असं बनवा की, लोकांना तुमच्याशी बोलावंसं वाटेल, तुमच्यासोबत बोलताना त्यांना आनंद ख़ुशी मिळायला हवी... लोकांनी तुमच्या बोलण्याची वाट पाहायला हवी... असे सुंदर व्यक्तिमत्व बनवा.. ❤

3) झाडाची पानगळ
👉 मित्रांनो, झाडाची पानगळ प्रत्येक वर्षी होतं असते. झाडाची जेंव्हा पानगळ होते तेंव्हा झाड कोणाला दोष देत नाही. जे पक्षी रोज येऊन फांद्यांवर झाडावर बसायचे ते पक्षी झाडाची पानगळ झाल्यावर झाडाकडे येत सुद्धा नाही... 🌳

मित्रांनो, झाडाची जेंव्हा पानगळ होते त्या वेळी झाड काहीच करत नाही फक्त संयम ठेवतो वाईट वेळ निघुन जाण्याची वाट पाहतो... काही कालावधी निघुन गेल्यावर झाडावर परत नवीन पाने येतात. झाड पुन्हा हिरवेगार होते. पक्षी पाखरे झाडाकडे परत वापस येतात... ❤

मित्रांनो, जेंव्हा पण तुम्ही संकटात असाल किंवा जीवनात समोर काय करायला पाहिजे हे तुम्हाला समजतं नसेल तर आशा वेळी शांत रहायला शिका...

वाईट वेळ आल्यावर शांत रहा थोडा वेळ निघुन जाऊद्या... वेळ निघुन गेल्यावर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील...

सुख × दुःख, चांगल × वाईट
दुःख × सुख, वाईट × चांगल

जीवनाचं हे चक्र सुरूच राहणार आहे, दुःखानंतर सुख येतच असते...

मित्रांनो, जीवनात जेंव्हा पण तुम्हाला अपयश येईल किंवा दुःख येईल तेंव्हा वाईट पाऊल उचलू नका...🙏 थोडा संयम बाळगा थोडा वेळ जाऊद्या वाईट वेळ निघुन गेल्यावर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील...

4) नदीसारखे वाहत चला...
👉 मित्रांनो, नदीला मार्ग सापडतो कारण नदी नेहमी वाहते नदी कुठेच थांबत नाही.

मित्रांनो, सर्वात आधी जीवनाचे निश्चित ध्येय ठरवा... ध्येय ठरवल्यानंतर नदी सारखे रोज मेहनत करा... कोणत्या रिकाम्या गोष्टीच्या मागे लागु नका... 24 तासाचे नियोजन करा...आणि रोज ध्येयाच्या दिशेने मेहनत करा...🏋️‍♂️
नरेंद्र दिपके सरांनी लिहलेले लेख.....!!

16/04/2023

🌿🍂परिस्थितियां जितनी ज्यादा
आपको तोड़ती हैं
उससे कहीं ज्यादा आपको
मजबूत बना देती हैं।🍁☘

😊😍☺️

Want your school to be the top-listed School/college in Bhir?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Bhir
431122