31/10/2024
नरक चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती
आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा.
#नरकचतुर्थी
SHANTINIKETAN ENGLISH SCHOOL IS A REPUTED SCHOOL IN BEED PERIPHERY. PERSONAL ATTENTION TO EVERY SINGLE CHILD, FOCUS ON SCHOLASTIC
IT HAS EMINENT, HARD WORKING, SKILLFUL & DEDICATED STAFF MEMBERS WHO THRIVE HARD TO MAKE BETTER CITIZENS OF TOMORROW'S INDIA!
31/10/2024
नरक चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती
आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा.
#नरकचतुर्थी
16/10/2024
आपल्या सर्वांच्या आयुष्यात चंद्राची शीतलता आणि निखळ आनंद नांदो!
कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
03/10/2024
तालुका स्थर क्रिकेट स्पर्धेत शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलचे यश
बीड. महाराज राज्य क्रीडा युवक संचनालय आणि जिल्हा क्रीडा कार्यालय बीड द्वारा आयोजित 17 वर्षाखालील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल,पांगरी रोड,बीड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने तालुकास्तरावर विजेता ठरण्याचा मान पटकावला.
साखळी स्पर्धेत शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल ने बीड येथील विविध शाळेचा पराभव करताना अंतिम सामन्यात धडक मारून सामना जिकला.
या प्रसंगी शिक्षण संस्थेचे संचालक श्री. बी.बी.जाधव सर (सनदी लेखापाल ), प्रा. मदनराव जाधव सर, सौ. वैशालीताई जाधव मॅडम, शाळेचे प्राचार्य श्री.अनिल जोशी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विजेत्या संघाला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
03/10/2024
ग्लोबल प्री प्राइमरी शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती साजरी
बीड. प्रतिवर्षी 2 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.
याप्रसंगी ग्लोबल प्री प्राइमरी शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल पांगरी रोड,बीड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये या दिवशीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील शिक्षिका सौ जयश्री नाईक मॅडम उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेची प्राचार्य श्री अनिल जोशी सर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.प्रमुख अतिथींचे स्वागत कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये गीत, मार्गदर्शन पर भाषणे आणि समूहगीत यांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार लवकिक भागानगरे आणि कुमारी आरुषी कुटे यांनी केले.
प्रस्ताविक भाषणात शाळेतील शिक्षिका सौ. राजश्री गवते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भाषण करताना नाईक मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बापूजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाचा आदर्श घेण्याचा संदेश दिला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका महेक काविण्य मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षिका आसमा सय्यद मॅडम, सौ. अश्विनी सुपेकर मॅडम आणि सौ. रत्नमाला लाखे मॅडम यांनी केले होते.
याप्रसंगी शिक्षण संस्थेचे संचालक श्री. बी. बी.जाधव सर (सनदी लेखापाल ),प्रा. मदनराव जाधव सर,सौ.वैशालीताई जाधव मॅडम आणि शाळेचे प्राचार्य श्री.अनिल जोशी सर यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
SOME OF THE MOMENTS OF THE SUMMER CAMP 2024 !
WHAT, ARE YOU MISSING IT ? JUST JOIN US FROM TOMORROW ! NO BARRIERS OF AGE, CLASS OR SCHOOL ! CALL : 9809457777.
15/04/2024
प्रिय पालक वर्ग,
ग्लोबल प्री प्रायमरी व शांतिनिकेतन सेकंडरी इंग्लिश स्कूल, बीड (3 वर्ष ते 15 वर्षे वयोगटा करिता) समर कॅम्प आयोजित करीत आहोत ते पण अगदी मोफत! मोफत! मोफत!.
( कोणत्याही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी )
समाविष्ट उपक्रम :-
1. प्रार्थना.
2. सूर्यनमस्कार, योगासन.
3. हस्ताक्षर वर्ग.
4. आरोग्य विषयक मार्गदर्शन.
5. नृत्य दिग्दर्शन.
6. चित्रकला.
7. खेळातून शिक्षण.
8. इंग्लिश स्पीकिंग ग्रुप. ॲक्टिव्हिटी.
9. बौद्धिक मार्गदर्शन.
10. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ( गट ब )
11. क्ले मोल्डिंग ऍक्टिव्हिटी.
12. शाळेच्या अप्रतिम परिसरात सुसंस्कार मार्गदर्शन.
13. मान्यवरांचे मार्गदर्शन.
दिनांक: 19 एप्रिल ते 28 एप्रिल.
वेळ : सकाळी 8:00am ते 10:30am
अधिक माहितीसाठी संपर्क करा
8830623209/9809457777.
पत्ता: ग्लोबल प्री प्रायमरी व शांतिनिकेतन सेकंडरी इंग्लिश स्कूल, पांगरी रोड बीड.
| Monday | 8am - 4pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 4pm |
| Thursday | 9am - 4pm |
| Friday | 9am - 4pm |
| Saturday | 8am - 5pm |