14/09/2022
*रफ वही*
साधारण नव्वदी पर्यंत प्रचलित आणि कार्यरत असलेलि ही वही आताच्या पिढी ला नाही समजणार तीच महत्व. आपला भारत देश आणि रफ वही ह्या मध्ये मला एक सार्धाम्य आढळते जसे आपला देश सर्वसमावेशक आहे तसंच काहीस रफ वही बद्दल म्हणता येईल सगळे विषय तिच्यात समावलेले असायचे.
आमच्या शालेय जीवनात ह्या रफ वहिला फार महत्व असायच.विषयाच्या तासाचे वेळापत्रक दर दिवशी वेगवेगळे असायचे त्याप्रमाणे रात्री झोपण्या आधी दुसऱ्या दिवसाचे वेळापत्रक प्रमाणे डफ्टर लावायची आमची पद्धत होती. ती आता देखील आहे म्हणा पण आमच्या वेळच काही खास होत मुळात सगळ्यात आधी ही रफ वही ण विसरता डफ्तर मध्ये विराजमान असायची त्यानंतर बाकीचे विषय च्या वह्या पुस्तकं भरली जायची.
तुम्ही म्हणाल ह्यात काय इतकं रफ वही च कौतुक तर थांबा खरी गोम पुढे आहे.
समजा चुकून माकून एखादी विषयची वही राहिली भरायची तर तेव्हा दुसऱ्या दिवशी हीच वही कामी यायची सगळे विषय थोडे थोडे त्यातले प्रश्न उत्तर ह्या वहीत असायचे.
वार्षिक परीक्षेत जेव्हा काही महत्वाचे उत्तर गाईड मध्ये सापडत नसतं तेव्हा तीच उत्तर ह्याच वहीत सापडायची हे विशेष.
ही वही देखील मजेशीर होती म्हणजे आम्ही कधी हिला विकत आणली नाही आधल्या वर्षीच्या राहिलेल्या वाह्यांची कोरी पान फाडून हिला बाईंडींग केल जायचं वेग वेगळ्या पानांची ती वही असायची 😀😀😀गंम्मत म्हणजे त्यात बऱ्याच वेळी चित्रकलेची कोरी पान, गणिताची चौकट असलेली पान असायची. हल्ली प्रत्येक विषयची वेगळी वही रफ वही हद्दपार झालीय. सहज आज मुलाने नवीन वही आणायला सांगितलं आणि ह्या रफ वही ची आठवण आली. तशी ती तुम्हाला आठवते का बघा..... आणि आठवा ते दिवस 😀😀😀😀👌👌👌🙏