27/03/2026
दि. 27 मार्च 2026 रोजी गांधी विद्यालय कोंढा, पहेला, सावरला, वलनी(चौ.), विरली खंदार, विरली बुज येथे सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत मिडलस्कूल, हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या तीन विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि भविष्यातील संधींच्या शोधासाठी त्यांना तयार करावे या उदात्त हेतूने संस्थेतर्फे दरवर्षी या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात.