Bhagiratha Bhaskar Anusuchit Jati Jamati Shikshan Sanstha

Bhagiratha Bhaskar Anusuchit Jati Jamati Shikshan Sanstha Bhagiratha Bhaskar Anusuchit Jati Jamati Shikshan Sanstha is founded in 1972 by Late C B Shambharkar

संस्था संचालित शाळांची संयुक्त सभा भास्कर अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्था अंभोरा  अंतर्गत   चालत असलेल्या शाळेतील कर्म...
04/12/2024

संस्था संचालित शाळांची संयुक्त सभा

भास्कर अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्था अंभोरा अंतर्गत चालत असलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांची आणि संस्थेच्या मान्यवर सभासदांची सभा सप्टेंबर महिन्यात माननीय प्रोफेसर देविदास घोडेस्वार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची आणि संस्थेच्या सभासदांची संयुक्त सभा पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून घेण्याची महत्त्वपूर्ण सूचना दिली होती. त्याप्रमाणे नुकतेच दिनांक 30 नोव्हेंबरला ही ही मासिक सभा घेण्यात आली ज्यामध्ये पावरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तीनही शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शाळेची प्रगतीच्या अहवाल प्रस्तुत केला यामध्ये विविध विषय जसे अप्रगत विद्यार्थ्यांची प्रगती , अभ्यासक्रम किती प्रमाणात पूर्ण झाला आहे याची माहिती त्याचप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना तयारी करवून परीक्षेत उत्तम यश प्राप्त करण्याकरिता कार्य योजना आदी विषयांवर महत्वपूर्ण सभा झाली. या सभेमध्ये संस्थेच्या सभासदांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना अमूल्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या यशाकरिता त्यांनी परिश्रम घेऊन उत्तम यश प्राप्त करावे अशा शुभेच्छा दिल्या

संस्थापक तात्यासाहेब शंभरकर यांची 96 वी जयंती संपन्न : दिनांक 10 ऑगस्ट ला भागीरथा भास्कर अनुसूचित जाती/जमाती शिक्षण संस्...
30/08/2024

संस्थापक तात्यासाहेब शंभरकर यांची 96 वी जयंती संपन्न :

दिनांक 10 ऑगस्ट ला भागीरथा भास्कर अनुसूचित जाती/जमाती शिक्षण संस्थेचे संस्थापक तात्यासाहेब शंभरकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या प्रसंगी पंचशील पूर्व माध्यमिक शाळा, भागीरथा भास्कर हाय स्कूल भंडारा व टवेपार येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह तात्या साहेब शंभरकर यांच्या कार्यप्रति अभिवादन सभा घेण्यात आली व शिक्षक , विद्यार्थ्यानी त्यांच्या कार्याची माहिती करून दिली . याप्रसंगी सर्व विद्यार्थ्याना सुग्रास भोजन देण्यात आले.
त्यानंतर संस्थेतर्फे तिन्ही शाळांचा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी प्रा. देविदास घोडेस्वार व मा. हर्षल मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षेकत्तर कर्मचारी आणि भाषण देणारे काही निवडक विद्यार्थी या प्रसंगी हजर होते.
या प्रसंगी मा. हर्षल मेश्राम यांनी तात्या साहेबांना तात्या ही पदवी कशी मिळाली आणि त्यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती सर्वाना करून दिली.
तसेच प्रा. देविदास घोडेस्वार यांनी महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेतील तात्यासाहेब शंभरकर होते असे म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच, गुरु अर्थात शिक्षकांची काय महती आहे , ही संत कबीर यांच्या दोह्यांच्या सहाय्याने उद्धृत केली. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व राज्य अभ्यासक्रम आराखडा यांच्या माध्यमातून सरकारी आणि अनुदानित शाळांसमोरील आवाहणे यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. त्यांच्या भाषणाचा संपूर्ण विडियो https://youtu.be/imJFE1VLs6U या लिंक वर उपलब्ध आहे.
शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

भागीरथा भास्कर अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्था ही विगत सुमारे 50 वर्षांपासून विशेषता गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांकरित...
11/07/2024

भागीरथा भास्कर अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्था ही विगत सुमारे 50 वर्षांपासून विशेषता गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांकरिता विद्यादानाचे उदात्त कार्य करीत आहे. या कार्यात संस्थेचे सर्व पदाधिकारी , शिक्षक आणि शिक्षयकेत्तर कर्मचारी तन, मन आणि धनाने परिश्रम करीत आहे. आमच्या कार्याची पावती म्हणून आम्ही काही पालकांची प्रशंसा पत्रे प्रसिद्ध करीत आहोत. विद्या दानाच्या या खडतर प्रवासात विद्यार्थी , पालक, हितैषी आणि दानदाते सोबत असल्याने आमचा आनंद आणि उत्साह कायम आहे. आपण सर्वांचे सहकार्य असेच लाभेल ही मनोकामना !
*भागीरथा भास्कर हायस्कूल , टवेपार*
1. माझे नाव मंगेश कवळू जांभूळकर आहे माझी मुलगी कु. मृणाली मंगेश जांभूळकर हि वर्ग १० वी तून मार्च २०२३-२४ मध्ये प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेली आहे. मी माझ्या मुलीला वर्ग ५वी मध्ये भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार येथे सन २०१८ मध्ये घातले होते. शाळेत प्रवेश घेतला तेव्हा वाचन, लेखन अडखळत करायची. वर्ग शिक्षक आणि विषय शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले. मी या शाळेबद्दल खूप आनंदी व समाधानी आहे कारण वर्ग १० मध्ये वर्ग शिक्षक यांनी सर्वांगीण विकासासाठी आवश्यकते नुसार मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा महत्वाची कशी आहे? ते समजावून सांगितले. शिक्षणाबरोबरच शिस्तीचे धडे सुद्धा देण्यात आले. शिक्षणाशिवाय गरिबांच्या मुलांना पर्याय नाही त्यामुळे स्वताची प्रगती करण्यासाठी अभ्यास खूप महत्वाचा असतो ते समजावून सांगितले शाळेने सर्वांगीण विकासासाठी भरपूर संसाधने आणि संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे मी इतर पालकांना त्यांची मुले याच शाळेत प्रवेशित करण्याकरिता सुचवेल .

2. माझे नाव संदीप कोसरे माझी मुलगी भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार या शाळेत वर्ग ९ मध्ये शिक्षण घेत आहे मी या शाळेबद्दल खूप आनंदी व समाधानी आहे मी तिला या शाळेत वर्ग ५ मध्ये दाखल केले. त्या वेळेस तिला वाचनात रस नव्हते परंतु शाळेत शिक्षकांच्या खूप परिश्रमामुळे ती आता खूप हुशार झाली आहे. तिचा वर्गातून प्रथम क्रमांक आला. शाळेने सर्वांगीण विकासासाठी प्रोजेक्टर सारखे शैक्षणिक साधन शाळेत उपलब्ध केल्यामुळे अनेक घटकाची माहिती मिळाली तसेच शाळेत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मेहनत घेतली जाते, म्हणून मी इतर पालकांना त्यांची मुले याच शाळेत प्रवेशित करण्याकरिता सुचवेल.

3. माझे नाव दिनकर जयराम पुडके आहे. माझा मुलगा आयुष दिनकर पुडके हा भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार येथे वर्ग ८ वी मध्ये शिकत आहे.मी या शाळेबद्दल खूप आनंदी आणि समाधानी आहे. मी त्याला या शाळेत वर्ग ५ वी मध्ये दाखल केले तेव्हा त्याला बरोबर लिहिता वाचता येत नव्हते. शाळेतील वर्ग शिक्षिका कु. हर्षा झंझाड मँडम यांनी त्याच्या अभ्यासावर परिश्रम घेतले तसेच शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे तो हुशार झाला आहे. मी इतर पालकांना सुचवेल कि त्यांनी आपल्या मुलांना भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार याच शाळेत प्रवेशित करण्याकरिता सुचवेल

4. माझे नाव चंद्रशेखर कातोरे आहे.माझा मुलगा नैतिक चंद्रशेखर कातोरे हा आपल्या भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार येथे वर्ग ७ वी मध्ये शिकत आहे. मी या शाळेबद्दल खूप आनंदी आणि समाधानी आहे. मी त्याला वर्ग ५ वी मध्ये दाखल केले तेव्हा तो अडखळत वाचत होता. त्याचे वर्ग शिक्षक श्री. अरुण डोमाजी बांडेबुचे तसेच शाळेतील इतर शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. शिक्षकांनी परिश्रम घेतले त्यामुळे तो अभ्यासात हुशार झाला. या शाळेतील चांगल्या शिक्षणामुळे मी माझ्या मोठ्या मुलीला नूतन महारष्ट्र या शाळेतून काढून आपल्या भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार या शाळेत घातले. तिचीपण प्रगती चांगली आहे. त्यामुळे मी इतर पालकांना याच शाळेत प्रवेशित करण्याकरिता सुचवेल.

5. माझे नाव श्री. मनोज तिजारे माझी मुलगी भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार येथे वर्ग ६ वी मध्ये शिकत आहे. जेव्हा माझ्या मुलीला वर्ग ५वी मध्ये दाखल केले तेव्हा तिला बरोबर वाचन करता येत नव्हते व तसेच गणिती क्रिया सुद्धा बरोबर येत नव्हत्या परंतु आपल्या शाळेतील शिक्षकांनी अधिक परिश्रम घेतल्यामुळे तिला आज लिहिता ,वाचता येत आहे. बेरीज व वजाबाकी क्रिया करीत आहे, त्यामुळे मी आपल्या शाळेविषयी खूप आनंदी व समाधानी आहे. त्यामुळे मी इतर पालकांना सुद्धा आपल्या शाळेत आपले पाल्याचे नाव दाखल करण्यात सांगेन.

6. माझे नाव रामप्रसाद नेवारे आहे. माझी मुलगी कु. अश्विनी रामप्रसाद नेवारे आपल्या भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार येथून सन २०२३-२४ मध्ये वर्ग ९ वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. वर्ग ५ वी मध्ये सन २०१९ ला शाळेत प्रवेशित झाली होती तेव्हा तिला बरोबर वाचता येत नव्हते. शाळेतील शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले त्यामुळे ती अभ्यासात हुशार झाली.मी भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार या शाळेबद्दल खूप आनंदी आहे. वर्ग ९ वी मध्ये वर्गशिक्षिका कु. देशभ्रतार मँडम यांनी मुलींकडे खूप लक्ष दिले. आपल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे समजावले.या शाळेत मुलांना चांगले संस्कार दिले जातात. मी माझ्या तिन्ही मुलांना आपल्या भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार येथे शिकविले. माझ्या मुलीला रोज शाळेत जायला आवडते. मी इतर पालकांना त्यांची मुले याच शाळेत भरती करण्याकरिता सुचवेल.

11/07/2024

भागीरथा भास्कर अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्थेच्या संचालिका मॅडम शुक्लतारा मेश्राम यांना जन्म दिवसाच्या अनंत शुभेच्छा. आपले आयुष्य आनंदी , निरोगी आणि सुख समाधानाचे राहो , हीच शुभ कामना ! 💐💐💐

भागीरथा भास्कर अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्था ही विगत सुमारे 50 वर्षांपासून विशेषता गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांकरित...
11/07/2024

भागीरथा भास्कर अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्था ही विगत सुमारे 50 वर्षांपासून विशेषता गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांकरिता विद्यादानाचे उदात्त कार्य करीत आहे. या कार्यात संस्थेचे सर्व पदाधिकारी , शिक्षक आणि शिक्षयकेत्तर कर्मचारी तन, मन आणि धनाने परिश्रम करीत आहे. आमच्या कार्याची पावती म्हणून आम्ही काही पालकांची प्रशंसा पत्रे प्रसिद्ध करीत आहोत. विद्या दानाच्या या खडतर प्रवासात विद्यार्थी , पालक, हितैषी आणि दानदाते सोबत असल्याने आमचा आनंद आणि उत्साह कायम आहे. आपण सर्वांचे सहकार्य असेच लाभेल ही मनोकामना !
*भागीरथा भास्कर हायस्कूल , भंडारा*
1. मी कविता विलास मेश्राम माझी मुलगी कु. प्राची विलास मेश्राम आपल्या शाळेत भगीरथा भास्कर हायस्कूल भंडारा येथे वर्ग ८ वा अ मध्ये शिकत असून तिला पूर्वीपेक्षा चांगल्या प्रकारे वाचता व लिहिता येते. याचे श्रेय सर्व शिक्षकांना जाते. माझी मुलगी सांगत असते कि आमच्या शाळेत अनेक कार्यक्रम होतात, व त्यामध्ये मला सहभागी करतात. सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सुद्धा सहभाग राहतो, तसेच आमच्या शाळेत एटीयल लॅब आहे. सर आणि मॅडम शिकवतात. अशी सांगत असते. त्यामुळे माझ्या मुलीला तुमच्या शाळेत प्रवेशीत केले याचा मला आनंद वाटतो.

2. माझे नाव श्री ज्ञानेश्वर बावनकर, माझी मुलगी कु. स्वाती ज्ञानेश्वर बावनकर हि भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा शाळेत १० वा (मराठी माध्यम) वर्गात शिकत आहे. मी तिला या शाळेत वर्ग ८ वी मध्ये दाखल केले, ती अगोदर अभ्यासात फारशी चांगली नव्हती, नेहमी तिला अभ्यासाचा आळस यायचा, परंतु भागीरथा भास्कर हायस्कूल भंडारा शाळेत आल्यापासून ती आपला अभ्यास स्वतः करायला लागली, व १० व्या वर्गात उत्तीर्ण झाली. मी याबद्दल खूप आनंदी आहे व समाधानी आहे. येथील संपूर्ण शिक्षक विद्यार्थांकडे लक्ष देतात. व त्यामुळे मी माझ्या मुलाला या शाळेत बर्ग ८ वी मध्ये दाखल केले आहे. व आपल्या आजू बाजूच्या नातेवाईकांना लोकांना सांगतो कि आपल्या पाल्यास या शाळेत दाखल करा.
भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा या शाळेमध्ये दाखल झाल्यापासून माझ्या मुलीचा आत्मविश्वास वाढला व ती प्रत्येक भाषणासाठी स्वतः तयार होत होती, जेव्हा हि गोष्ट मला तिच्या शिक्षकांनी सांगितली तेव्हा मला खूप आनंद झाला या वर्षीच्या स्नेहसंमेलनात होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनीत तिने स्वतः भाग घेतला व माझ्या मदतीने तिने प्रयोग तयार केला. तेव्हा मला खूप समाधान वाटले. व त्यामुळे सर्वाना सांगेन कि आपल्या पाल्यास या शाळेत दाखल करा.
धन्यवाद ...

3. माझे नाव श्री गणेश काशीराम मंदुरकर, माझी मुलगी कु. ख़ुशी गणेश मंदुरकर हि भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा शाळेत १० वा (सेमी इंग्रजी माध्यम) वर्गात शिकत आहे. मी तिला या शाळेत वर्ग ८ वी मध्ये दाखल केले होते, ती अगोदर अभ्यासात कमकुवत होती, व तिला इंग्रजी बरोबर स्पष्ट वाचता येत नव्हते.परन्तु ती आता सर्व विषयात हुशार झाली असून दहाव्या वर्गात तिचा शाळेतून प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि ती आता इंग्रजीमध्ये बोलुपन शकते. शाळेत झालेल्या इंग्रजी स्पिकिंग क्लास मुळे तिचा आत्मविश्वास वाढला व इंग्रजी मध्ये बोलायला लागली. मी भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा शाळेबद्दल खूप आनंदी व समाधानी आहे. मी आजूबाजूच्या पालकांना आपल्या या शाळेत दाखल करण्यास नेहमीच सांगत असतो. व मी माझ्या लहान मुलीला या शाळेत ८ व्या वर्गात प्रवेशित केले आहे. माझी मुलगी कु. ख़ुशी हि प्रत्येक Activity मध्ये सहभाग घेत असते भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा या शाळेत ATL लँबमुळे तिला बरीचशी महिती मिळालेली आहे. व शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने ती विज्ञान प्रदर्शनीत मध्ये सहभाग घेत असते. शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर संसाधने आणि संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. संपूर्ण शिक्षक व मुख्याध्यापक पालकांना नेहमी सहकार्य करीत असतात. व त्यामुळे मी आपल्या सर्व मुला – मुलीना याच शाळेत शिकवीन व आपल्या नातेवाईकांना संबधित लोकांनाही सांगेन.
धन्यवाद ...

4. भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा, हि शाळा शहराच्या मध्यवर्ती भागात असून मी माझी मुलगी, कु. अंतरा प्रकाश धुर्वे हीला २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात वर्ग ८ वी त दाखल केले. सुरवातीस माझी मुलगी लाजाळू स्वभावाची होती, परन्तु या शाळेतील शिक्षकवर्ग उपक्रमशील असल्यामुळे फारच कमी कालावधीत माझी मुलगी निर्भीळ बनली, आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतरही सहशालेय उपक्रमात भाग घेऊ लागली.या शाळेतील ATL लँब मधून जे अध्ययन अनुभव माझ्या मुलीने घेतले. त्यामधून तिच्या वैज्ञानिक दृष्टीकोनात सुद्धा बदल झालेला आहे. या शाळेतील शिस्त व संस्कृतिचे मी कौतुक करते, तसेच शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन मंडळ यांच्या सदैव सहकार्याबद्दल मी धन्यवाद मानते.

5. माझे नाव सौ मीना राजेश कांबळे आहे. माझी मुलगी कु. आकांक्षा राजेश कांबळे ही, इयत्ता ५ वी पासून भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा येथे शिकते. खेड्यातून शहरात पाठविल्यामुळे आम्हाला शाळेची, शिक्षकांची भीती वाटायची, पण शिक्षकांनी आमच्या मुलीला कुठेही कमी पडू न दिले नाही. तिच्या अभ्यासावर शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले. ५ व्या वर्गात ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली त्यामुळे आमचा शिक्षक व शाळेवर विश्वास बसला. शिक्षणाबरोबर इतरही उपक्रमावर लक्ष दिले जाते, शाळेत संगणक शिकवले जाते, त्यामुळे आमच्या मुलीची शिकण्याची जिद्द वाढली. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आमच्या मुलीचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे आम्ही आजूबाजूच्या लोकांना सांगतो कि एकदा तरी भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा या शाळेला भेट द्या, व आपल्या पाल्याचा प्रवेश या शाळेत करा.

6. सौ. पायल सखाराम शेंडे मी भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा बद्दल सांगू इच्छिते कि,माझी मुलगी कल्याणी शेंडे हि वर्ग ६ वी ला होती ती आता ७ वी ला गेली. ती ज्या विषयात कमी पडायची त्या विषयात शिक्षकानी परिश्रम घेऊन न समजलेल्या भाग शिकवायचे. पालक व शिक्षक यांचे वेळोवेळी संवाद साधला गेला त्यामुळे आमच्या मुलीचा समस्या सुटत गेल्या. मुलगी नियमित अभ्यास करू लागली. ती शिक्षकांचा आदर करू लागली, नियमित शाळेत येऊ लागली,तिच्या मनात शाळेबद्दल आदर व प्रेम निर्माण झाले. शाळेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही उपक्रम घेतले जातात. त्यामुळे मुलीचा उत्साह वाढला. शाळेत वेळोवेळी मुलीच्या समस्या सोडविण्यात येते.
शाळेचे मुख्याध्यापक आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यामुळे हि शाळा आम्हाला कुटुंबासारखे वाटते. आम्ही दुसऱ्यांना या शाळेत आपली मुले दाखल करण्यास सांगतो.

7. माझे नाव श्रीमती मनीषा हेमराज भुरे आहे. माझा मुलगा इयत्ता ५ वी पासुनच भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा या शाळेत शिकत आहे. ४ थी पर्यंत तो अभ्यासात खूप कमी होता. पण नंतर भागिरथा भास्कर हायस्कूल भंडारा या शाळेत आल्यानंतर शिक्षकांच्या सहकार्याने व त्यांच्या प्रयत्नांनी तो आता समोर आला. मुख्याध्यापक सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने आता तो वर्ग ७ वी ला चांगल्या मार्कांनी पास झाला. शिक्षण हा जीवनाचा पाया आहे, हे शिक्षकांनी पटवून दिले. त्यामुळे त्याची प्रगती चांगली झाली याचा मला खूप आनद आहे.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यात चांगला संवाद आहे. संवाद असल्याने मुलांचे अडचणी दूर होतात. शाळेत शिक्षण बरोबर इतरही उपक्रम घेतल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आमचा शिक्षक व शाळेवर खूप विश्वास आहे.
इतरांनीही आपल्या मुलांना या शाळेत दाखल करावे असे आम्ही सांगत असतो.

11/07/2024

भागीरथा भास्कर अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्था ही विगत सुमारे 50 वर्षांपासून विशेषता गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांकरिता विद्यादानाचे उदात्त कार्य करीत आहे. या कार्यात संस्थेचे सर्व पदाधिकारी , शिक्षक आणि शिक्षयकेत्तर कर्मचारी तन, मन आणि धनाने परिश्रम करीत आहे. आमच्या कार्याची पावती म्हणून आम्ही काही पालकांची प्रशंसा पत्रे प्रसिद्ध करीत आहोत. विद्या दानाच्या या खडतर प्रवासात विद्यार्थी , पालक, हितैषी आणि दानदाते सोबत असल्याने आमचा आनंद आणि उत्साह कायम आहे. आपण सर्वांचे सहकार्य असेच लाभेल ही मनोकामना !
*पंचशील पूर्व माध्यमिक शाळा , भंडारा*

1. माझे नाव श्री. नंदकिशोर भेदे रा. नवीन टाकळी भंडारा येथे राहात असून माझी मुलगी नामे दिव्यानी नंदकिशोर भेदे ही आपल्या पंचशील पूर्व माध्य. षाळा भंडारा येथे शिकत असून ती नर्सरी पासून या शाळेत शिकत आहे. ती आत पहिल्या वर्गात शिकत असून अभ्यासात खूप हुशार आहे. शाळेचे शिक्षक खूप चांगले शिकवतात. वैयक्तीक सर्व विद्याथ्र्यांवर लक्ष देतात. मागे पडलेल्या विद्याथ्र्यांस उपचारात्मक वर्ग घेवून शिकवतात. माझी मुलग शाळेत दर शनिवारला वेगवेगळया activities घेतात. त्यात सहभागी होते. व मला घरी येवून सांगते. मला खूप आनंद होते. ती मराठी छान वाचते. इंग्रजीचे पण शब्द वाचन करते. मी या शाळेत माझ्या मुलीला टाकून आनंदी आहे. कारण या शाळेचे शिक्षण खूप चांगले आहे. माझ्या मुलीबरोबर मी दोन नवीन विद्यार्थी या शाळेत दाखल केले आहेत व माझी अजून एक लहान मुलगी आहे. तिला पण मी याच शाळेत शिकवणार आहे. शाळेत मी पण नियमित जात असतो. शिक्षकांसोबत हितगूज साधत असतो. शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक आम्हाला नियमित सहकार्य करत असतात. शाळेत शालेय शिक्षणाबरोबर संस्कार व व्यावहारीक जिवनोपयोगी शिक्षण दिल्या जाते. म्हणून इतर पालकांनाही मी या शाळेत विद्यार्थी भरती करण्याचा आग्रह करेन.

2. मी नामे विलास सयाम रा. नेहरुवार्ड मेंढा माझी मुलगी नामे डिंपल विलास सयाम ही पंचशील पूर्व माध्य. शाळा भंडारा येथे तिसऱ्या वर्गात शिकत आहे. ती अभ्यासात छान हुशार असून या शाळेत वेगवेगळया प्रकारच्या अॅक्टीवीटीज होतात. पालकांचा सन्मान केला जातो. माझी मुलगी अभ्यासाबरोबर कविता गायण, खेळ सर्व गोष्टीत भाग घेते. मला माझ्या मुलीचा व शाळेचा अभिमान आहे की ती वर्गाचे नेतृत्व करते. माझ्या दोन मुली या शाळेत शिकल्या असून मी आजूबाजूच्या परिसरातील लोकांना पंचशील पूर्व माध्य. शाळेत प्रवेश घ्यायला सांगतो. कारण शाळेतले शिक्षक नियमित भेट घेतात. अभ्यासाविषयी चैकशी करतात. घराजवळच शाळेची गाडी येते. वाहतूक व्यवस्था मोफत व दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे मी या शाळेत माझ्या मुलीला टाकून आनंदी आहे.

3. मी मनिषा शिवरकर शाळेबद्दल खूप आनदी आणि समाधानी आहे. शाळेने विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाठी भरपूर संसाधने आणि संधी उपलब्ध करुन दिली आहे. माझी मुलगी पूर्वी शिवरकर 7 व्या वर्गात शिकत आहे. 4 थी पर्यंत माझी मुलगी बाहेरगावी शिकत होती. तिथे तिला वाचता लिहिता येत नव्हते. आता शाळेच्या शिक्षकांनी माझ्या मुलीच्या प्रवेशासाठी वांरवार विनंती केली. मी पण शिक्षकांवर विश्वास ठेवून माझ्या मुलीचा प्रवेश घेतला. ती आता छान वाचण करते. अभ्यासाची आवड लागली. ती आता स्वतः अभ्यासाला बसते. शाळेचे शिक्षक खूप चांगले आहेत. म्हणून मी माझ्या लहान मुलाला पण पंचशील पूर्व माध्य. शाळा भंडारा येथे टाकले. तो पण खूप हुशार आहे. मी माझ्या मुलीला पण पहिली पासून शिकवले असते. तर ती अजून हुशार झाली असती. या शाळेत मुलांच्या पोषक बुध्दीमत्तेनुसार शिक्षण दिल्या जाते. शाळेत आम्ही भेट घेतो. तेव्हा शिक्षक आमच्या बरोबर मोकळया चर्चा करतात. आम्ही मोकळीक पणे आमच्या मुलांच्या समस्या मांडतो. व शाळेचे शिक्षकही आमच्या घरी भेट देतात. आम्ही आजूबाजूच्या परिसरातील लोकांना शाळेविषयी सांगतो व मुले प्रवेश करत असतात. माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण चांगले आहे. म्हणून शिक्षक व शाळेचे मी आभारी आहे.

4. मी श्री देवेंद्र यशवंत मुळे, पंचशील पूर्व मा. शाळा भंडारा येथे माझ्या दोन मुली शिकत आहेत. साक्षी देवेंद्र मुळे 7 वी व चेतेश्वरी देवेंद्र मुळे 5 वी मध्ये शिकत आहे.अगोदर माझ्या मुली इतर खाजगी कान्वेंट शाळेत शिकत होत्या . पण पंचशिल पुर्व माध्य. शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला भेट दिली आणि मी सेमी इंग्रजी मध्ये प्रवेश घेतले. माझ्या मुलीचे शिक्षक मुलींसोबत शिक्षकासारखे न वागता एकदम मित्रा सारखे राहतात. आता माझ्या दोन्ही मुलींची प्रगती कान्वेंट पेक्षा छान आहे. शाळेच्या प्रेरक व मुक्त संस्कृतीचे मी कौतुक करतो. मला ‘शाळेचा शनिवार’ खूप आवडला कारण शनिवारला वेगवेगळया कृती घेतात. त्यातून माझ्या मुली खूप चांगल्या तयार झाल्या आहेत. शाळेत मुलींना संवाद साधण्यासाठी प्रोत्साहीत केले जाते. माझ्या मुलींना शाळेत येण्याचा खूप आनंद वाटतो. शाळचे शिक्षक नियमित गृहभेट देत असतात. त्यामुळे मुलांमध्ये सन्मानयुक्त भिती असते व संस्कार युक्त शैक्षणिक प्रगती होण्यात मदत होत आहे. पालकांच्या स्पर्धा होतात. त्यामध्ये आम्ही पण सहभागी होत असतो. म्हणून शाळा आम्हाला खूप आवडते. आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांना पण या शाळेत आपले मुल प्रवेशीत करण्याकरिता विनंती करतो.

5. माझे नाव श्रीमती शिला प्रकाश धुर्वे माझी मुलगी कु. विजया प्रकाश धुर्वे ही पंचशील पुर्व माध्य. शाळा भंडारा येथे वर्ग 7 वी (सेमी इंगजी) वर्गात शिकत आहे. मी तीला या शाळेत वर्ग 1 ली मध्ये दाखल केली होती. ती पहिल्या वर्गापासून अभ्यासामध्ये कमकुवत होती. तीला मुळाक्षराचा ज्ञान नव्हता. परंतु शिक्षकांनी त्या मुलीवर अधिक वेळ देवून षिक्षण प्रवाहामध्ये आणले . आता तिला मराठीच नव्हे तर इंग्रजी, गणित, विज्ञान विशयामध्ये तीला प्राविण्य प्राप्त गुण घेतले . आता वर्ग 7 वी मधून तिचा प्रथम क्रमांक सुध्दा आला आहे. आणि ती आता इंग्रजी मध्ये बोलू पण शकते. शाळेत घेण्यात आलेल्या इंग्लिश स्पिकिंग क्लासेस मुळे तीचा आत्मविश्वास वाढला व इंग्लिशमध्ये बोलायला लागली. त्याच बरोबर गणिती फार्मुले सुध्दा सहज करता येतात. मी पंचशील पूर्व माध्य. शाळा भंडारा शाळेबद्दल खूप आनंदी व समाधानी आहे. मी आपल्या चारही मुलीला पंचशील पूर्व माध्य. शाळा भंडारा येथे शिक्षण घेत आहेत. माझ्या आजूबाजूच्या पालकांना आपल्या पाल्यास या शाळेत दाखल करण्यास सदैव सांगत असते. माझी मुलगी कु. विजया ही प्रत्येक अॅक्टीव्हीटी मध्ये सहभाग घेत असते. शाळेत असलेल्या संगणकामुळे तीला बरीचशी माहिती मिळालेली आहे. व शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने तीला विज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभागी होत असते. शाळेने विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर संसाधने आणि संधी उपलब्ध करुन व संपूर्ण शिक्षक वर्ग विदयाथ्र्यांच्या कला गुणानुसार व आवश्यकते नूसार सोयीसुविधा उपलब्ध करीत असतात. त्यामुळे मी आपल्या सर्व मुलीना या शाळेत शिकवित आहे. व आपल्या नातेवाईंकांना, संबंधीत लोकांना सांगेन.
‘‘धन्यवाद पंचशील शाळा ’’

06/03/2022

We all the directors and signatories of Bhagiratha Bhaskar educational society wish all the students appearing for 10th examination on 21st March best success.

दि.24/08/2021पासून ATL चे प्रशिक्षण सुरू झाले आहे.सहभाग1)भागीरथा भास्कर हाय.भंडारा(2)पंचशील प्राथमिक शाळा भंडारा (3)भागी...
25/08/2021

दि.24/08/2021पासून ATL चे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
सहभाग1)भागीरथा भास्कर हाय.भंडारा(2)पंचशील प्राथमिक शाळा भंडारा (3)भागीरथा भास्कर हाय स्कूल टवेपार येथील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित आहेत.

पंचशील पूर्व माध्यमिक शाळा व भागीरथा भास्कर हायस्कूल , भंडारा येथील एकूण 159 लाभार्थीपैकी 95 पालकांचे लसीकरण केल्याबद्दल...
05/07/2021

पंचशील पूर्व माध्यमिक शाळा व भागीरथा भास्कर हायस्कूल , भंडारा येथील एकूण 159 लाभार्थीपैकी 95 पालकांचे लसीकरण केल्याबद्दल सर्व शिक्षक व शिक्षयकेत्तर कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐आमचे शिक्षक इतरही पालकांच्या संपर्कात राहून त्या सर्वाना लस घेण्यास प्रेरित करतील, कारण पालक सुरक्षित तर विद्यार्थी सुरक्षित !

06/06/2021

विद्यार्थीनी डॉ अलका ढोके मॅडम यांना धन्यवाद देताना

Address

Main Road
Bhandara
441904

Opening Hours

Monday 9am - 1pm
Tuesday 9am - 1pm
Wednesday 9am - 1pm
Thursday 9am - 1pm
Friday 9am - 1pm
Saturday 9am - 12pm

Telephone

+919423585886

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagiratha Bhaskar Anusuchit Jati Jamati Shikshan Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Bhagiratha Bhaskar Anusuchit Jati Jamati Shikshan Sanstha:

Shortcuts

Share

Category