सौ हि ने न शाह कन्या प्रशाला बार्शी

  • Home
  • India
  • Barsi
  • सौ हि ने न शाह कन्या प्रशाला बार्शी

सौ हि ने न शाह कन्या प्रशाला बार्शी Founded in १९४१
First girl's school in Barshi

Start Admission ProcessIn S. H. N. N. Shah kanya prashala Barshi.
25/03/2026

Start Admission Process
In S. H. N. N. Shah kanya prashala Barshi.

20/11/2025

सौ. हि. ने. न. शाह प्रशालेत स्टेज समोरील दर्शनीय भागात व संपूर्ण व्हरांडा मध्ये (corridor) फरशी घालण्याचे काम चालू आहे. एक पाऊल प्रगती कडे

20/11/2025

तब्बल 60 वर्षांनी भरली #शाळा, भेटल्या मैत्रिणी, शाळेला 1 लाखाची देणगी

बार्शी - शाळेच्या मित्रांसोबत पुन्हा एकत्र व्हावे आणि बालपण जगावे असं प्रत्येकालाच वाटत असते. पुन्हा तीच घंटा वाजावी आणि गुरुजींचा वर्ग भरावा, त्याच्या बेंचवर बसावे आणि थोडीशी दंगामस्ती करावी. म्हातारपण हे दुसरं बालपण म्हणतात ते असंच, या वयात तब्बल 60 वर्षांनी शाळेतील जुन्या मैत्रीणींचा क्लास भरला होता. शहरातील माहेर ग्रुपच्या वतीने सौ हि. ने. न.शाह कन्या प्रशालेमध्ये 13 फेब्रुवारी रोजी स्नेहबंध मेळावा साजरा करण्यात आला. 60 वर्षांनी यासर्व सख्या गोडबोले सर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या. यावेळी, आपलं दायित्व समजत त्यांनी प्रशालेस 1 लाखाची रोख रक्कम देणगी स्वरूपात दिली.

शहरातील कन्या प्रशालेत मैत्रिणींची शाळा भरली, वयाची साठी आणि हाती काठी आल्यानंतर या मैत्रिणी पुन्हा एक दिवसांसाठी लहान झाल्या, आपलं बालपण एका दिवसांत भरभरून जगल्या. अतिशय सुंदर आणि आठवणींचा भावबंध जपणारा हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सेक्रेटरी चिन्मय वालवडकर यांनी केले. आपल्या वर्गातील, शाळेच्या स्मृतींना उजाळा देत देत अनेकांनी आपल्या आठवणी सांगितल्या. आशा जोशी, छाया गंगावणे, शोभा घोरपडे, सुषमा नारकर, विजया जहागीरदार, लीला डागळे, मालती पवार, चंदा पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले तर शुभांगी काळे, सुमन पानगावकर, मृणाल कुलकर्णी, शोभा रणशूर, विजया देशपांडे यांनी स्वरचित कविता केल्या. मीरा हातोळकर यांच्या भारुडाने व लावणीने कार्यक्रमाला रंगत आली. सर्वांनीच शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका हेमा भाभी देसाई, कृष्णा देसाई, मुख्याध्यापिका जोशी मॅडम, या ग्रुपचे प्रणेते गोडबोले, काटकर सर, ए आर कुलकर्णी, टिळक , शेटे सर इत्यादी गुरुवर्य उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मंदाताई वैद्य, मंगलताई काळे, आशा जोशी, उज्वला जोशी, मृणाल कुलकर्णी, जयश्री काळे व गोडबोले यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेचे शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुब शेख, ऋजुता हातोळकर यांनी केले. तर, आभार उज्वला जोशी यांनी मांडले.

Address

Near Bhagwant Temple
Barsi
413401

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सौ हि ने न शाह कन्या प्रशाला बार्शी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category