आश्रम शाळा शैक्षणिक संकुल, खामगांव

  • Home
  • India
  • Barshi
  • आश्रम शाळा शैक्षणिक संकुल, खामगांव

आश्रम शाळा शैक्षणिक संकुल, खामगांव "परिपूर्ण आणि जागृत युवक निर्माण करणारी संस्था"

मागील महिनाभरात खूप थंडी पडली आहे. आपल्या प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयमध्ये आसपासचा ग...
15/12/2025

मागील महिनाभरात खूप थंडी पडली आहे. आपल्या प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयमध्ये आसपासचा गावातून अनेक मुले मुली बसने प्रवास करून शाळेत येतात. शक्यतो बस वेळेवर येतेच पण कधीकधी अपघाताने बस बंद पडते मग काय काही मजेशीर अनुभव येतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळांची एसटी बस उशिरा आली की असे प्रसंग घडतात. कुसळंब –तावडी येथील अनेक मुले मुली बसने शाळेत प्रवास करतात. आज एसटी बस १.३० तास उशिरा आली. इथल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना घरी जायला उशीर झाला. मग काय ! शाळेच्या कर्मचाऱ्यांनी आणि मुलांनी मिळून शेकोटी लावली आणि गुजगोष्टी करत वेळ मजेत घालवली.
पण तुम्हाला सांगायला आनंद आहे की आसपासच्या खेड्यातील मुलांना आश्रम शाळा शैक्षणिक संकुल परिवार शाळेची स्वतःची बस उपलब्ध करून देणार आहे. मग काय तुम्ही तयार आहेत ना मोफत शिक्षणाचा हक्क अनुभवायला ?

प्राथमिक आश्रम शाळेची मुले निघाली नवे जग अन् नवे अनुभव घ्यायला गावाला !आज आमच्या प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची ...
12/11/2025

प्राथमिक आश्रम शाळेची मुले निघाली नवे जग अन् नवे अनुभव घ्यायला गावाला !

आज आमच्या प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात अकलूज या गावाला निघाली. विद्यार्थी या सहलीत विविध ठिकाणी भेट देऊन ज्ञान, आनंद आणि नवीन अनुभवांची गोड मैफिल अनुभवतील. 🌳🚌

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहलीचे उत्कृष्ट आयोजन करून मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवाव. 😊🌼

📸 आठवणींच्या या दिवसाचे काही खास क्षण लवकरच तुमच्यासमोर येतील...!

#शैक्षणिकसहल #आश्रमशाळा #विद्यार्थ्यांचा_आनंद

प्रिय पालकवर्ग.... Prabhakar Damare Sunil Lande Kakasaheb Zambare
16/10/2025

प्रिय पालकवर्ग....
Prabhakar Damare
Sunil Lande Kakasaheb Zambare

नारीशक्तीस वंदन...! 🌸आज आमच्या शाळेमध्ये नारीशक्ती वंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील सर्व मुलींनी ...
30/09/2025

नारीशक्तीस वंदन...! 🌸

आज आमच्या शाळेमध्ये नारीशक्ती वंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील सर्व मुलींनी एकसारखा गुलाबी ड्रेस परिधान करून आपली उपस्थिती नोंदवली. गुलाबी रंगातून प्रेम, सौंदर्य, संवेदनशीलता आणि नारीशक्तीचे प्रतीकत्व व्यक्त झाले.

कार्यक्रमामध्ये उपस्थित मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मुलींच्या या सहभागाचे कौतुक केले आणि सर्वांना नारीशक्तीचा सन्मान करण्याचा संदेश दिला.

या उपक्रमामुळे शाळेचे वातावरण आनंददायी झाले व समाजात स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला..!

दिनांक–३०/०९/२०२५

18/09/2025

बार्शी तालुका शालेय क्रीडा कबड्डी स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खामगाव 19 वर्षे वयोगट अजिंक्य !!! विजेते संघाचे अभिनंदन ✨💫

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर, जि...
12/09/2025

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर, जिल्हा तायक्वाँदो असोसिएशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ या वर्षातील जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धा पिलीव ता– माळशिरस, सोलापूर येथे पार पडली.
या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय, खामगावचा विद्यार्थी अभिजीत खोत याने उत्कृष्ट खेळ करत आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर १९ वर्षे वयोगट जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली असून पुढील टप्प्यात तो आपले कौशल्य सादर करणार आहे.
अभिजीतच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर डमरे, Prabhakar Damare मुख्याध्यापक सचिन डमरे, क्रीडाशिक्षक जाधव सर, Bipin Jadhav व लोखंडे सर, Mohan Iokhande पर्यवेक्षक चेतन डमरे, Chetan Damare मार्गदर्शक अमित गोसावी Amit Gosavi यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अभिजीतच्या या कामगिरीमुळे खामगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून विभागीय स्पर्धेतही तो नक्कीच यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

06/09/2025

गणपती विसर्जन २०२५


06/09/2025

गणपती विसर्जन २०२५


माध्यमिक आश्रम शाळा, खामगाव​सादर करीत आहोत...​'माझ्या हाताने बाप्पाची मूर्ती'​गणेशोत्सव विशेष उपक्रम​या वर्षीच्या गणेशोत...
26/08/2025

माध्यमिक आश्रम शाळा, खामगाव
​सादर करीत आहोत...

​'माझ्या हाताने बाप्पाची मूर्ती'

​गणेशोत्सव विशेष उपक्रम
​या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी, आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हातांनी बनवण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन आणि कलात्मकता जोपासत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला.

​उपक्रमाची उद्दिष्ट्ये:
​पर्यावरण संवर्धन: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster of Paris) मूर्त्यांना टाळून, नैसर्गिक मातीचा वापर करून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणे.
​कला आणि संस्कृतीचा प्रसार: विद्यार्थ्यांना भारतीय कला, संस्कृती आणि परंपरांशी जोडून घेणे.
​सर्वांगीण विकास: विद्यार्थ्यांना त्यांच्या कलात्मक कौशल्यांना वाव देणे आणि त्यांच्यातील सर्जनशीलता वाढवणे.
​सामूहिक सहभाग: एकत्र येऊन काम केल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकोपा आणि संघभावना वाढवणे.

​उपक्रमातील सहभागी:
शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी.

​विशेष आभार:
या उपक्रमासाठी मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक श्री. डमरे सर आणि प्रोत्साहन देणारे पालक.
​हा उपक्रम केवळ मूर्ती बनवण्यापुरता मर्यादित नसून, पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करतो.
​आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या सुंदर मूर्त्यांचे नक्की कौतुक करावे.

​अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
प्रशासकीय कार्यालय, माध्यमिक आश्रम शाळा, खामगाव.
दूरध्वनी: 9823463523
ईमेल: [email protected]

15/08/2025

सांस्कृतिक कार्यक्रम काही दृश्ये...!

Address

Khamgaon
Barshi
413401

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 10:30am - 5pm
Friday 10:30am - 5pm
Saturday 7am - 11pm
Sunday 9am - 11pm

Telephone

+919923255581

Alerts

Be the first to know and let us send you an email when आश्रम शाळा शैक्षणिक संकुल, खामगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to आश्रम शाळा शैक्षणिक संकुल, खामगांव:

Shortcuts

Share

Category