24/04/2026
आदित्य सायन्स अकॅडमी, बारामतीचा अभिमान ✨
आमचा विद्यार्थी सार्थक मुळे याने JEE Mains मध्ये 96.81%tile मिळवत JEE Advanced 2026 साठी पात्रता मिळवली आहे . तसेच अश्या अनेक विद्यार्थ्यांनी JEE Mains 2026 मध्ये मिळवले घवघवीत यश 🚀
💐 हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!💐
19/04/2026
आदित्य सायन्स अकॅडमी कडून अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼✨
या पवित्र आणि मंगलमय दिवशी
आपल्या ज्ञानयात्रेला नवी ऊर्जा, नवी दिशा आणि नवी प्रेरणा लाभो
प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाची उंच शिखरे गाठावीत
स्वप्नांना पंख मिळोत आणि उज्ज्वल भवितव्याची सुंदर सुरुवात व्हावी हीच मनःपूर्वक सदिच्छा 🙏📚✨
आपल्या आयुष्यात सदैव प्रगती, आत्मविश्वास आणि सकारात्मकता नांदो
आणि प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरो हीच शुभेच्छा 🌟
ज्ञानातून प्रगती, शिक्षणातून यश! 🎯📖✨
17/04/2026
🙏 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
ज्ञान, तत्त्वज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात
अमूल्य योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाला
आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली 💐
एक आदर्श शिक्षक, विचारवंत आणि राष्ट्रनेते म्हणून
त्यांनी दिलेला ज्ञानाचा अमूल्य वारसा
आजही प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देत आहे ✨
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी
आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या
या महान गुरूंना Aaditya Science Academy कडून
विनम्र अभिवादन 🙏
🎯 “खरा शिक्षक तोच,
जो विद्यार्थ्यांच्या मनावर आणि आयुष्यावर अमिट छाप सोडतो.”
14/04/2026
💙 ज्ञान, विज्ञान आणि शिक्षणाच्या बळावर समाज परिवर्तनाचा मार्ग दाखवणाऱ्या महामानवाला मानाचा मुजरा…
📖 “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”
या महान विचारांनी लाखो आयुष्यांना दिशा दिली आणि समानतेचा पाया मजबूत केला.
✨ न्याय, समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभा असलेला आधुनिक भारत घडवणाऱ्या
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!
आदित्य सायन्स अकॅडमी कडून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💙
11/04/2026
आदरणीय विद्यार्थी आणि पालक,
आपणांस कळविण्यात आनंद होतो की यावर्षी इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन माध्यमातून पार पडत आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार नाही. दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
📌 सरकारी संकेतस्थळ:
👉 https://mahafyjcadmissions.in
🏫 आदित्य सायन्स अकॅडमी मध्ये ११ वी प्रवेशासाठी संपूर्ण मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे!
तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरताना कोणतीही अडचण असेल तर आमचे मार्गदर्शन पूर्णतः विनामूल्य आहे.
🏫 आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वंजारवाडी, बारामती
हे महाविद्यालय देखील FYJC च्या ऑनलाईन लिस्टमध्ये उपलब्ध आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना “Aditya International School & Jr. College, Baramati” या नावाचा विचार जरूर करावा.
📝 नोंदणी प्रक्रिया (11th FYJC Admission)
१. वेबसाइटला भेट द्या:
👉 https://mahafyjcadmissions.in
२. नवीन विद्यार्थी नोंदणी:
New Registration वर क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरा – नाव, मोबाइल, ईमेल, 10 वी चा सीट नंबर, बोर्ड, इ.
पासवर्ड तयार करा व नोंदणी पूर्ण करा.
३. लॉगिन आयडी मिळवा:
नोंदणी पूर्ण झाल्यावर Login ID व Application Number मिळेल.
४. फॉर्म 1 भरा:
लॉग इन करून संपूर्ण माहिती, कुटुंबाचा तपशील, जात प्रवर्ग, इ. भरा.
५. कागदपत्रे अपलोड करा:
10 वी गुणपत्रिका
रहिवासी दाखला
जातीचा दाखला (लागू असल्यास)
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला इ.
👉 महत्त्वाची सूचना:
जर वरीलपैकी कोणतेही आवश्यक कागदपत्र सध्या उपलब्ध नसेल, तर त्या कागदपत्रासाठी सेल्फ डिक्लेरेशन – हमीपत्र विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शासकीय नमुन्यानुसार, स्वतःच्या सहीसह साध्या कागदावर लिहून द्यावे.
हे हमीपत्र संबंधित कागदपत्र अपलोड करण्याऐवजी वापरले जाऊ शकते आणि मूळ कागदपत्र उपलब्ध झाल्यावर महाविद्यालयात सादर करणे बंधनकारक असेल.
६. नोंदणी शुल्क भरा:
ऑनलाइन पेमेंट द्वारे शुल्क भरा.
७. फॉर्म 2:
तुमच्या पसंतीची कॉलेज यादी भरा.
(नक्की करा की “Aditya International Jr. College, Baramati” यामध्ये तुमचे प्राधान्य आहे!)
८. गुणवत्तानुसार गुणवत्ता यादी:
तुमचे कॉलेज निश्चित झाले की प्रवेश तिथे घेणे गरजेचे आहे.
📄 अत्यावश्यक कागदपत्रे:
(जर लागू असल्यास, पुढील कागदपत्रे तयार ठेवा)
जात प्रमाणपत्र
नॉन क्रिमीलेअर
EWS
दिव्यांग प्रमाणपत्र
प्रकल्पग्रस्त / सैनिक पाल्य / खेळाडू इ.
🙋 कोणतीही शंका असल्यास...
Contact Us
11/04/2026
🌼 महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त 🌼
भारतातील सामाजिक क्रांतीचे जनक, शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि समतेचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन 🙏
स्त्री शिक्षण, शेतकरी कल्याण आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य अमूल्य आहे.
अज्ञान, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध लढा देत त्यांनी ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचवला.
त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन, शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संकल्प करूया ✨
📚 ज्ञान, गुणवत्ता आणि यशाचा मार्ग – आदित्य सायन्स अकॅडमी 📚
09/04/2026
🎯 ASAT 2026 – महाराष्ट्राची महाशिष्यवृत्ती परीक्षा 🎯
📍 आदित्य सायन्स अकॅडमी, बारामती
NEET / IIT-JEE / MHT-CET | Foundation (5वी ते 10वी)
Olympiads | NDA | IISER | Competitive Exams
✨ Admission 2026–28 साठी सुवर्णसंधी
🏆 100% पर्यंत शिष्यवृत्ती
👩🎓👨🎓 Limited Batches & Limited Seats
📅 परीक्षा दिनांक: एप्रिल 2026
📝 परीक्षा पद्धत: Offline (Pen & Paper) | MCQ
📍 परीक्षा केंद्र: बारामती
🚀 आजच नोंदणी करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत पाऊल उचला!
📞 संपर्क: 9284524234 / 9423221947
09/04/2026
🎓 आदित्य सायन्स अकॅडमी, बारामती 🎓
✨ ASAT 2026 – महाराष्ट्राची महाशिष्यवृत्ती परीक्षा ✨
NEET / JEE / MHT-CET व Foundation साठी
📚 Std. 5वी ते 11वी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
🏆 100% पर्यंत शिष्यवृत्ती
💰 ₹25 लाखांपर्यंतच्या भव्य शिष्यवृत्ती
📍 परीक्षा केंद्र: बारामती
📅 एप्रिल 2026 मध्ये परीक्षा
तुमच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात आजच करा!
👉 आताच नोंदणी करा
📞 संपर्क: 9284524234 / 9423221947