24/08/2026
#किचनटिप्स
कृती :तांदूळ जो पर्यन्त तांदळातून पांढर पाणी जाऊन स्वच्छ पाणी येत नाही तो पर्यंत स्वच्छ धुऊन घ्या.कारण तांदूळ धुताना जे पेजे सारखं पांढर पाणी निघत ते असत स्टार्च नावाचं पीठ असत ज्याला आपण खळ म्हणतो, पूर्वी फेविकोल नव्हतं त्यावेळी खळीचा वापर चिकटवण्यासाठी वापरलं जायचं. मग आता सांगा जर हे स्टार्च तांदळातून नाही काढलं तर काय होईल? भातात खळ तयार होईल की नाही. म्हणजे भात चिकट. चला अर्धी लढाई आपण जिंकलो.
शिजयला घालताना थोड तेल किंवा तूप त्यात घाला म्हणजे भात मोकळा व्हायला अजुन मदत होईल. आणी आता त्यात अर्ध लिंबू पिळा. लिंबात असत साईट्रिक ऍसिड या खळीचा (स्टार्च )जानी दुश्मन. ते उरलं सुरलं स्टार्च तांदळाला चिकटू देत नाहीत. हे त्रिदेव जर भात शिजवताना वापरले तर काय होईल?कॉमेंट करून नक्की सांगा.
#वारी_विज्ञानाची 🚩