10/09/2023
शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या एक्सीड विज्ञान व वाणिज्य महाविद्याल ,बारामती व लातूर सायन्स अकॅडमी बारामती आयोजित भरारी यशाची गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ या कार्यक्रमासाठी मा.श्रीमती पद्माताई भोसले ( अध्यक्ष शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पुणे), मा.श्री.डाॅ. गिरीश देसाई (सचिव शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पुणे), मा.श्री. तुषार रंजनकर सर( खजिनदार शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पुणे), मा.श्री. गारटकर सर( सदस्य शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पुणे), मा.श्री.हुसेन हाजिते ( शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट प्रकल्प प्रमुख दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना), मा.श्रीमती विना गिरीश देसाई मॅडम आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची शोभा वाढवून कार्याला शुभेच्छा दिल्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे मनापासून आभारी आहे.
Shankarrao Patil Charitable Trust
Padma Tai Bhosale
Dr. Girish Desai
13/09/2021
स्व. शंकररावजी (भाऊ) पाटील,
यांच्या १५ व्या पुण्यतिथी निमित्त
॥ विनम्र अभिवादन॥ 🙏🙏
EXED Jr college Baramati
02/09/2021
११ वी सायन्स व कॉमर्स शाखेचे प्रवेश सुरु
*SPCT's Exed Junior College, Baramati
११ व १२ वी प्रवेश प्रकिया साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांने पूर्ण माहिती भरून द्यावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe0ZbTNjA0IGQFNP_hSyfYanoo7AfWpdlU5MX8pgZF9p4m4-w/viewform
*SPCT's Junior college मध्ये प्रवेश घेण्याचे फायदे*
🔶SPCT कॉलेजमध्ये 11 वी कॉमर्स ला प्रवेश घेतल्यापासुन CA/CS/ICWA/CMA यांसारख्या फाउंडेशन कोर्स तसेच बँकिंग कोर्स ची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते.
🔶 कॉलेज व कोचिंग एकाच ठिकाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होते.
🔶 हुशार व होतकरू विद्यार्थ्यासाठी कॉलेज तर्फे स्कॉलरशिप व अन्य सुविधा उपलब्ध.
🔶 डिजिटल ऑनलाईन लेक्चर ची सुविधा उपलब्ध.
🔶 पुणे येथील तज्ञ व अनुभवी CA/CS/PhD qualified प्राध्यापक वर्ग.
🔶 बाहेर गावच्या विद्यार्थ्यांसाठी रूम व मेस ची सुविधा कॉलेज शेजारी उपलब्ध
*📞अधिक माहिती साठी संपर्क*
पत्ता:- SPCT, प्रथमेश कॉम्प्लेक्स,TC काॅलेज समोर,बारामती.
मो: 9975615764/9881743536/8888416348
17/08/2021
*Admission Open for 11th & 12th Science/11th -12th integrated/Commerce* *2021 -2022*
*SPCT's Junior College , & Latur Science Academy Baramati (Pune) - 413102*
११ व १२ वी प्रवेश प्रकिया साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांने पूर्ण माहिती भरून द्यावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe0ZbTNjA0IGQFNP_hSyfYanoo7AfWpdlU5MX8pgZF9p4m4-w/viewform
*SPCT's Junior college व Latur Science Academy मध्ये प्रवेश घेण्याचे फायदे*
🔶 SPCT कॉलेजमध्ये Crop science/ IIT यासारख्या स्कोरिंग विषयाची सोय
🔶लॉक डाऊन काळामध्ये 11वी आणि 12वी साठी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन लेक्चर ची सुविधा सुरू.
🔶SPCT कॉलेजमध्ये 11 वीला प्रवेश घेतल्यापासुन IIT-JEE, NEET,NATA, CET यांसारख्या Entrance Exam ची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते.
🔶 कॉलेज व कोचिंग एकाच ठिकाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होते.
🔶 हुशार व होतकरू विद्यार्थ्यासाठी कॉलेज तर्फे स्कॉलरशिप व अन्य सुविधा उपलब्ध.
🔶 डिजिटल ऑनलाईन लेक्चर ची सुविधा उपलब्ध.
🔶 लातूर व कोटा येथील तज्ञ व अनुभवी IIT/NIT qualified प्राध्यापक वर्ग.
🔶 बाहेर गावच्या विद्यार्थ्यांसाठी रूम व मेस ची सुविधा कॉलेज शेजारी उपलब्ध
*📞अधिक माहिती साठी संपर्क*
पत्ता:- SPCT, प्रथमेश कॉम्प्लेक्स,TC काॅलेज समोर,बारामती.
मो: 9975615764/7020229303/
8888416348
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट चे EXED Jr. College of Science & Commerce, Baramati मो. नं. ९९७५६१५७६४/८८८८४१६३४८
नवीन विद्यार्थी प्रवेश २०२१-२२
08/07/2021
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती मध्ये प्रथमच
अकरावी व बारावी कॉमर्स प्रवेश सुरु
BARAMATI #
29/06/2021
Admissions open for 11th science and integrated (2 years) and commerce 's Exed Jr College,Baramati for AY 2021-22
CROP SCIENCE ( 200 MARKS ) AVAILABLE
INFORMATION TECHNOLOGY (100 MARKS)
HURRY UP LIMITED SEATS AVAILABLE.
26/03/2021
Heartiest congratulations to Hon. Dr. Girish Desai sir
Patil Charitable trust
11/03/2021
आज शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट येथे श्रद्धेय शंकररावजी पाटील तथा भाऊ यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा मा. पद्माताई भोसले, खजिनदार मा. श्री. तुषार रंजनकर सर, संस्थेचे विश्वस्त मा. श्री. अरविंद गारटकर सर, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कॉर्डिनेटर श्री महादेव चव्हाण सर व संस्थेचा सर्व स्टाफ उपस्थित होता.
Shankarrao Patil Charitable Trust ( )
04/01/2021
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट (Shankarrao Patil Charitable Trust) चे प्राथमिक आरोग्य केंद्र; देशासाठी एक माॅडेल प्रोजेक्ट:-मा. हर्षवर्धन पाटील
ऊसतोड मजूर हा स्थलांतरित होणारा मजूर असून त्याच्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्वाची बाब आहे.ऊस तोड मजूर हा गोरगरीब कुटुंबातील असून त्याच्या हाताला काम नसताना जर तो आजारी पडला तर त्याने उपचार कुठे करायचे हा त्याच्यापुढे पडलेला मोठा प्रश्न असतो.मात्र अशा परिस्थितीत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट ने प्राथमिक आरोग्य केंद्र चालू केले हे देशासाठी एक माॅडेल प्रोजेक्ट आहे असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व नवीन वर्षानिमित्त कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व निरा-भिमा सहकारी साखर कारखान्यातील ऊसतोड कामगारांसाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र चा शुभारंभ आज रविवार दि.03 जानेवारी रोजी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती.पद्याताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व निराभीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार,इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, माजी.व्हा.चेअरमन भागवत गटकूळ, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद,कर्मयोगीचे संचालक अतुल व्यवहारे,प्रशांत सुर्यवंशी,राजेंद्र चोरमले, माजी नगराध्यक्षा माया विंचू, मा.नगराध्यक्ष अशोक इजगुडे,मा.उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, आदिकुमार गांधी,सतिश व्यवहारे,दिपक जाधव,प्राचार्य संजय चाकणे, माऊली नाचन,हमीदभाई आतार,अमोल राऊत आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपंन्न झाला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले,की आज मनापासून आनंद झाला. निराभीमा व कर्मयोगी साखर या दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जो मजूर हंगामात काम करायला येतो त्यांच्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर च्या माध्यमातून हे विधायक काम केले आहे. हि ट्रस्ट आमच्या भगिनी पद्मा भोसले यांच्या माध्यमातून सूरु झाली आणि या भागतील युवा वर्गाला उत्तम प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे व त्यांच्या दोन हाताला काम देण्याचे महत्वाचे काम या ट्रस्ट च्या माध्यमातून झाले आहे.
या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रात निराभीमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना चालू गाळप हंगामात ऊसतोड मजुर व त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांसाठी विनाशुल्क (मोफत) सेवा दिली जाणार आहे.रुग्णांची तपासणी करून योग्य ते उपचार व औषधे दिली जाणार आहेत.डाॅ.वर्षा बोराडे, डाॅ.भाग्यश्री चव्हाण,डाॅ.अनुजा कुदळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणार आहेत.
इंदापूर उपजिल्हा रुग्नालय व शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदापूर मार्फत आठवड्यातून दोन दिवसांकरिता फिरता दवाखाना पध्दत अवलंबिण्यात येणार असून डॉक्टर नर्स, मदतनीस व इतर टीम च्या सहाय्याने कारखाना परिसर व शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोड मजूर काम करतात किंवा राहतात अशा ठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.
पद्मा भोसले म्हणाल्या की,आयोजक टीम ने जे कार्य हाती घेतले आहे त्यास ट्रस्ट पूर्ण सहकार्य करेल. यावर्षी हा उपक्रम नव्यानेच सुरवात केली आहे.यात काही त्रुटी जाणवून आल्या तर त्या सुधारून प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली जाईल. हे एक सामाजिक कार्य आहे.सर्वांनी मिळून ते तडीस घेऊन जाने ही आपली जबाबदारी आहे. शासकीय डाॅक्टर मंडळींचाही देखील या उपक्रमात सहभाग नोंदवत या उपक्रमाला सहकार्य केले आहे. ऊसतोड मजूरांसाठी हा महत्वपूर्ण उपक्रम असून यामुळे रुग्णांवर तात्काळ उपचार करुन त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यात मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील हा पहिला उपक्रम असून जो ऊसतोड कामगारांच्या आरोग्यासाठी राबवण्याच्या उद्देशाने शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर ने सुरु केला आहे. हे प्राथमिक स्वरुप असून भविष्यात महाराष्ट्रात याचे मोठे स्वरूप पहायला मिळेल. श्रमदानाच्या जागी कष्टकरी ऊसतोड मजुरांच्या आरोग्याच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाने याचा आदर्श घेऊन विविध ठिकाणी असे कार्य तडीस नेले तर आरोग्याच्या सुविधांचा अभाव भासणार नाही असे मत महादेव चव्हाण यांनी व्यक्त केले.
स्वराज्य ग्रुप विकास प्रतिष्ठान च्या वतीने कर्मयोगी कारखान्याचे संचालक अतुल व्यवहारे यांनी सदर प्राथमिक आरोग्य केंद्रास मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याचे जाहिर केले.अमोल जाधव,किरण खंडागळे, संजय शेलार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार श्री.तुषार रंजनकर यांनी केले. आभार किरण खंडागळे यांनी मानले.
18/09/2020
Admissions open for 11th CROP SCIENCE and commerce