माझी शाळा

माझी शाळा MAZI SHALA - WHERE YOU WILL SHARE YOUR BEST, HAPPIEST, UNFORGETTABLE MEMORIES , PHOTOS, POEMS, JOKES.

05/11/2014
New English SchoolDolrewadi .
27/10/2012

New English School
Dolrewadi .

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील  यांची आज जयंती . त्यांच्या जीवन्कार्यास माझे शतकोटी प्रणाम !!डॉ. कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय ...
22/09/2012

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती . त्यांच्या जीवन्कार्यास माझे शतकोटी प्रणाम !!

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो !!
" रयत शिक्षण संस्थेचा विजय असो "!!
" स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद " !!

17/09/2012

फार फार वर्षापूर्वीची मी देखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.

इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .

पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .

पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत सुरपाठ्या/ गोट्या खेळत होतो.

मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .

पावसाळ्यात चिखलात शाळेचा ड्रेस मुद्दामहून भरवत होतो,

दुसऱ्या दिवशी ड्रेस नाही म्हणून रंगीत कपडे घालत होतो .

मुलींची छेड काढली म्हणून बापाला कधी शाळेत आणत न्हवतो ,

दुसऱ्या दिवसी मात्र गुरुजींचा मार खाऊन कण्हत होतो .

दर गुरुवारी "शक्तिमान" बघायला शाळेतून पळून आल्यानंतर

आईची ओरड चुपचाप ऐकत होतो .

शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी..
..प्रशांत ...

17/09/2012

!! शाळेतले ते दिवस !!

अडगळीच्या खोलीमधलं दप्तर
आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||

प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर
तुमच्यासारखं स्वतःलाच
रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय
आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा समास
तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||

Address

Dorlewadi
Baramati
413102

Telephone

8055840725

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझी शाळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category