Creative Science Academy, Baramati

Creative Science Academy, Baramati Creative Science Academy Baramati, founded in 2012 by Prof. Balasaheb Ghadge and Prof.Sheshrao Kale

15/07/2026

माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
🗣️ शिवराज महादेव सुरवसे

15/07/2026

माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
🗣️ संस्कार काकडे

13/07/2026

कालच्या निकालावर नाही, आजच्या मेहनतीवर उद्याचे यश ठरते.!

Drop हा शेवट नाही, तर नव्या यशस्वी प्रवासाची नवी सुरुवात आहे.

NEET मध्ये अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून स्वप्न सोडायचे नसते. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजनबद्ध तयारी आणि स्वतःवरील विश्वास यांच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थी आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण करू शकतो.

NEET Repeater Batch 2027
Batch Starts : 13 July 2026

(Creative Science Academy, NEET Repeater Batch, NEET 2027, Medical Entrance, Baramati Coaching, NEET Preparation, Admissions 2026, Dropper Batch)





One Dream. One Goal. One Plan. One Success.NEET 2027 मध्ये उत्कृष्ट यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Cre...
10/07/2026

One Dream. One Goal. One Plan. One Success.

NEET 2027 मध्ये उत्कृष्ट यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Creative Science Academy, प्रगतीनगर, बारामती घेऊन येत आहे NEET Repeater Batch.

प्रारंभ : १३ जुलै २०२६

अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यास, नियमित टेस्ट्स आणि वैयक्तिक मेंटरिंगसह करा AIR Rank च्या दिशेने आत्मविश्वासपूर्ण वाटचाल.

आजच प्रवेश निश्चित करा!

संपर्क:
राऊत सर – 9623468433
काळे सर – 9850664536
घाडगे सर – 9881419822

Drop घेतला आहे? आता थांबायचं नाही... AIR Rank मिळवायची.!यशस्वी डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला योग्य दिशा देण्यासाठी Creativ...
09/07/2026

Drop घेतला आहे? आता थांबायचं नाही... AIR Rank मिळवायची.!

यशस्वी डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला योग्य दिशा देण्यासाठी Creative Science Academy, प्रगतीनगर, बारामती घेऊन येत आहे NEET Repeater Batch, प्रारंभ १३ जुलै २०२६.

अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, Concept Based Teaching, नियमित Test Series, Daily Doubt Solving आणि वैयक्तिक Mentoring यांच्या बळावर करा NEET मध्ये उत्कृष्ट यशाची तयारी.

आजच प्रवेश निश्चित करा!

संपर्क:
राऊत सर – 9623468433
काळे सर – 9850664536
घाडगे सर – 9881419822

(Creative Science Academy, NEET Repeater Batch, NEET 2026, Medical Entrance, Baramati Coaching, NEET Preparation, AIR Rank, Admissions 2026)





तीस वर्षांनंतर... शिक्षक म्हणून आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण! कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे शब्दांत मांडणं ख...
06/07/2026

तीस वर्षांनंतर... शिक्षक म्हणून आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण!

कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे शब्दांत मांडणं खरंच कठीण असतं. काल असाच एक क्षण माझ्या आयुष्यात आला.

सुमारे तीस वर्षांपूर्वी, एम.एस्सी. पूर्ण झाल्यानंतर माझ्या अध्यापनाच्या प्रवासाची सुरुवात अहमदनगर येथील काकासाहेब म्हस्के विद्यालय (एमआयडीसी) येथे झाली. अवघ्या एका वर्षासाठी मला आठवीच्या वर्गाचा वर्गशिक्षक होण्याची संधी मिळाली. तो काळ माझ्यासाठी अध्यापनाच्या प्रवासातील एक सुंदर पर्व होता. प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून शिकवताना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चांगले संस्कार रुजवण्याचा आणि विश्वास, आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.

काल त्या आठवीतल्या काही विद्यार्थ्यांनी माझा शोध घेतला, संपर्क क्रमांक मिळवला, मी सध्या कुठे कार्यरत आहे याची माहिती घेतली आणि खास बारामतीला येऊन मनापासून भेट दिली. सर्वांना येता आलं नाही, पण जे आले त्यांनी तीस वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या. त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवलं... शिक्षक म्हणून आपण त्या काळात जे काही दिलं, ते विद्यार्थ्यांच्या मनात आजही तितक्याच जिव्हाळ्याने जपलं गेलं आहे. शिक्षकासाठी यापेक्षा मोठा सन्मान कोणता असू शकतो.?

अनिल लिमण, अशोक रोडे, उद्धव पवार, संध्या दिवटे आणि दिलीप भांडे... प्रत्येक जण आज आपल्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून यशस्वीपणे उभा आहे. कोणीतरी उद्योगात, कोणीतरी सैन्य सेवेतून देशसेवा करून, कोणीतरी औषधनिर्मिती क्षेत्रात, कोणीतरी उद्योजक म्हणून तर कोणीतरी शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. त्यांचं यश पाहताना मन अभिमानाने भरून आलं.

आज मी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी जोडलेलो आहे. दरवर्षी नवनवीन विद्यार्थी येतात, त्यांच्यासोबत नवे प्रवास सुरू होतात. पण वर्षानुवर्षांनंतर एखादा विद्यार्थी केवळ प्रेमाने, कृतज्ञतेने आणि "सर, तुम्हाला भेटायचंच होतं..." या भावनेने दारात येऊन उभा राहतो, तेव्हा शिक्षक म्हणून मिळणारं समाधान शब्दांच्या पलीकडचं असतं.

शिक्षक म्हणून आपण किती शिकवलं हे काळ विसरतो; पण विद्यार्थ्यांच्या मनात आपण किती जिव्हाळा निर्माण केला, हे अशा भेटींमधून समजतं. माझ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनो, तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि आजही जपलेला हा ऋणानुबंध... हीच माझ्या शिक्षक म्हणून आयुष्यभराची खरी कमाई आहे.
मनापासून आभार... आणि प्रत्येकाच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

– प्रा. शेषराव काळे सर

स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचवला. युवकांमध्ये आत्मवि...
04/07/2026

स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचवला. युवकांमध्ये आत्मविश्वास, चारित्र्य आणि सेवाभाव जागवण्याचे महान कार्य त्यांनी केले. "उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका" हा त्यांचा प्रेरणादायी संदेश आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे.

त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्यांना नवी दिशा दिली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

#स्वामी_विवेकानंद

#विचारांची_प्रेरणा
#राष्ट्रनिर्माण

जीवनाला नवसंजीवनी देणाऱ्या, संकटाच्या क्षणी आशेचा किरण ठरणाऱ्या आणि आपल्या ज्ञान, कौशल्य व सेवाभावाने असंख्य जीव वाचवणाऱ...
01/07/2026

जीवनाला नवसंजीवनी देणाऱ्या, संकटाच्या क्षणी आशेचा किरण ठरणाऱ्या आणि आपल्या ज्ञान, कौशल्य व सेवाभावाने असंख्य जीव वाचवणाऱ्या सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त मनःपूर्वक अभिवादन!

आपल्या निःस्वार्थ सेवेमुळे समाज अधिक निरोगी, सक्षम आणि सुरक्षित बनत आहे. आपल्या समर्पणाला मनःपूर्वक सलाम!

राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा!

दैनिक लोकमतचे मनःपूर्वक आभार.!क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेला (IISE...
27/06/2026

दैनिक लोकमतचे मनःपूर्वक आभार.!

क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेला (IISER) दिलेल्या शैक्षणिक भेटीची दखल घेत ही प्रेरणादायी बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक लोकमत परिवाराचे मनःपूर्वक आभार.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, संशोधनाची जिज्ञासा आणि उच्च शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना आपल्या वृत्तांकनामुळे अधिक बळ मिळाले आहे.

लोककल्याणकारी राज्यकारभाराचे आदर्श असलेले थोर समाजसुधारक आणि बहुजनांचे उद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांस जयंती नि...
26/06/2026

लोककल्याणकारी राज्यकारभाराचे आदर्श असलेले थोर समाजसुधारक आणि बहुजनांचे उद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांस जयंती निमित्त कोटी कोटी वंदन!

Address

Behind T. C. College Pragatinagar Baramati
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Creative Science Academy, Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Creative Science Academy, Baramati:

Shortcuts

Share

Category