SarSam College of Pharmacy, Baramati

SarSam College of Pharmacy, Baramati तालुका बारामती मौजे. पळशिवाडी येथे नव?

27/09/2024

सुदर्शन एज्युकेशनल फाउंडेशनचे सारसम कॉलेज ऑफ फार्मसी, मोरगाव पळशी येथे शैक्षणिक वर्ष २०२४ पासून मास्टर ऑफ फार्मसी (M.Pharm) या कोर्सला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत एक महत्वपूर्ण टप्पा गाठला असून, या कोर्समध्ये एम.फार्म इन फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, क्वालिटी अश्युरन्स, आणि फार्माकोलॉजी या विषयांच्या प्रत्येकी १५ जागांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील तज्ञतेसाठी एक मजबूत पाया मिळणार असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष् डॉ. नागेश एस गवळी यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात अत्याधुनिक प्रयोगशाळा, उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज अभ्यास केंद्रे, आणि तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांपुरतेच नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवावर आधारित ज्ञान मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.M.Pharm कोर्सच्या मान्यतेमुळे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधींचे नवे दरवाजे उघडले आहेत. औषध निर्मिती, फार्मास्युटिकल संशोधन, आणि गुणवत्ता नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करण्याची संधी मिळेल. विशेषतः, फार्मास्युटिक्समध्ये औषधांचा विकास, उत्पादन, आणि वितरण याबाबतची सखोल माहिती दिली जाईल. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये औषधांच्या रसायनशास्त्राची विस्तृत माहिती मिळेल, तर क्वालिटी अश्युरन्समध्ये औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षेची खात्री कशी करावी यावर भर दिला जाईल. फार्माकोलॉजी या शाखेत औषधांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचे अध्ययन केले जाईल, अशी माहिती डॉ. नागेश एस गवळी यांनी दिली.
भविष्यात महाविद्यालय आणखी उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यासाठी आणि नवीन संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील, तसेच या मान्यतेमुळे विद्यार्थ्यांचा विश्वास वाढला असून, शिक्षणाच्या उन्नतीसाठी नवी दिशा मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासोबतच त्यांच्या क्षेत्रात नवे करियर घडवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. महाविद्यालयाच्या या यशामुळे स्थानिक समाजात आनंदाचे वातावरण आहे. या मान्यतेमुळे महाविद्यालयाच्या यशामध्ये आणखी एक मोलाची भर घातली गेली आहे आणि भविष्यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी सारसम कॉलेज ऑफ फार्मसी निश्चितच आदर्श स्थळ बनेल, अशी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नागेश एस गवळी यांनी दिली आहे.
संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, विश्वस्त, प्राचार्य, प्राध्यापक मंडळ, आणि विद्यार्थ्यांनी या यशाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.

27/09/2024

Address

Baramati
411043

Alerts

Be the first to know and let us send you an email when SarSam College of Pharmacy, Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SarSam College of Pharmacy, Baramati:

Shortcuts

Share

Category