26/10/2024
विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची पुणे येथील "साहित्यिक कॅलिडोस्कोप 2024” मध्ये चमकदार कामगिरी
लिटररी कॅलिडोस्कोप २०२४ हा साहित्यिक महोत्सव २० सप्टेंबर २०२४ रोजी विश्वशांती गुरुकुल वर्ल्ड स्कूल,लोणीकाळभोर, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. इयत्ता ३ री ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी साहित्य ग्राफिटी, स्वगत, वादविवाद, कॉस्मोकॉन यांसारख्या विविध साहित्यिक स्पर्धा इंग्रजी भाषेतून घेण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील विविध शाळांनी यात सहभाग घेतला
होता. बारामती विद्यानगरी येथील विद्याप्रतिष्ठानच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील १६ विद्यार्थ्यांनी विविध साहित्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली साहित्यिक प्रतिभा दाखवून पाच पारितोषिके पटकावली.
साहित्य कलाकृतीतील वेगवेगळी पात्रे सादरीकरण स्पर्धेत ( कॉस्मोकॉन) ऐश्वर्या राऊत (८वी) हिला पहिले पारितोषिक मिळाले. सायली पाटील, राधिका भापकर, श्रावणी मोरे आणि समिक्षा कोंडे (१० वी) यांना बातमी सादरीकरण स्पर्धेत सांघिक गटात द्वितीय पारितोषिक मिळाले.
वैष्णवी शिंदे (४थी) हिला साहित्य ग्राफिटीसाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. गोविंद लोंढे (७वी) याला कॉस्मोकॉनसाठी दुसरे पारितोषिक मिळाले. उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेसाठी अर्णव लालगे (५ वी) याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या साहित्य महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साधनांविषयी माहिती देण्यात आली. शाळेतील इंग्रजी विभागातील सर्व इंग्रजी
विषय शिकविणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांसाठी मार्गदर्शन केले.