स्वयंप्रेरणा गुरुकुल बारामती

स्वयंप्रेरणा गुरुकुल बारामती शालेय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र
बालमानसशास्त्रावर आधारित एकमेव कोचिंग सेंटर.

स्वयंप्रेरणा अकॅडमी २०१० पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून बालमानसशास्त्रावर आधारित अध्ययन-अध्यापन ही वेगळी ओळख आम्ही तयार केलेली आहे.विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावणारी, आवड निर्माण करणारी अध्ययन -अध्यापन पद्धती आम्ही राबवित आलेलो असून गेल्या दहा वर्षात हजारो विद्यार्थी आमच्या या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
अभ्यासतंत्र कार्यशाळा,सुजाण पालकत्व कार्यशाळा,तज्ज्ञांची विद्यार्थी पालकांसाठी व्याख्याने,भरपूर सराव परीक्षा,सहली आणि आनंददायी शिक्षण असे भरगच्च उपक्रम वर्षभर राबविले जातात,यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासा सोबत,वाचनाची आवड आणि वक्तृत्व/संभाषण कौशल्ये अशा बाबींवर सुद्धा आम्ही भर देत आहोत.
बारामती परिसरातील अनेक सुज्ञ पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या कोचिंग क्षेत्रातील थोड्या वेगळ्या प्रयोगावर विश्वास ठेवला आणि त्याचे योग्य परिणाम आम्हाला देता आले याचा मनस्वी आनंद आहे.
सध्या ४थी ते १०वी च्या रेग्युलर आणि ११-१२वी साठी अभ्यासतंत्र कार्यशाळा आणि काही शॉर्ट टर्म बॅचेस आम्ही चालवीत आहोत.

पोपटपंची पाठांतरापेक्षा मूळ संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करून त्यांचा पाया पक्का करणं यावर आम्ही आजपर्यंत काम केले असून त्याचे जबरदस्त फायदे पुढे JEE,NEET आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले आहेत.आपल्या पाल्याच्या वेगळेपणाचा,त्याच्या उपजत बुद्धिमत्तेचा अभ्यास आणि विकास व्हावा या हेतूने आम्ही आपणांस निमंत्रित करीत आहोत

-टीम स्वयंप्रेरणा अकॅडमी

संतविचार आणि संविधानिक मूल्यांचा प्रेरणादायी संगम स्वयंप्रेरणा गुरुकुलमध्ये!आज स्वयंप्रेरणा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठ...
15/07/2026

संतविचार आणि संविधानिक मूल्यांचा प्रेरणादायी संगम स्वयंप्रेरणा गुरुकुलमध्ये!

आज स्वयंप्रेरणा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक संवादाचे आयोजन करण्यात आले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत **‘संविधान समता दिंडी’**च्या माध्यमातून संतविचार आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार करणारे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

आपल्या प्रभावी आणि ओघवत्या शैलीत त्यांनी संतविचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकशील जीवनपद्धती यांचा सुंदर संगम विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. संत साहित्य हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून ते वैज्ञानिक विचार, तर्कशुद्धता, परिश्रम, शिस्त आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा देते, हे त्यांनी विविध उदाहरणे आणि दाखल्यांच्या माध्यमातून स्पष्ट केले.

विद्यार्थीदशेत चांगल्या सवयी, सातत्यपूर्ण सराव आणि प्रामाणिक प्रयत्न यांचे महत्त्व सांगताना त्यांनी संत तुकाराम महाराजांचा सुप्रसिद्ध अभंग उद्धृत केला—

“असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे”

या एका ओळीतून सातत्य, अभ्यास आणि चिकाटी यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हा अत्यंत प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना मिळाला.

याच कार्यक्रमात संविधान प्रचारक म्हणून भारतभर भ्रमंती करणारे मा. नागेश जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा अर्थ, त्यामागील मूल्ये आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी अत्यंत कृतिशील पद्धतीने समजावून सांगितली. अभिनय, विद्यार्थी सहभाग आणि सहज संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये सहज आणि प्रभावीपणे समजली.

या संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संतांचे विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन, संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि जबाबदार नागरिकत्व यांची प्रेरणा मिळाली.

स्वयंप्रेरणा गुरुकुल अशा प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार, विवेक आणि राष्ट्रीय मूल्ये रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
या कार्यक्रमात संस्थेचे संचालक दिनेश आदलिंग, मा.मिलिंद होवाळे,मा.सदाशिव शिनगारे,मा.अशोक देवकते हेही मान्यवर उपस्थित होते

ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि मा. नागेश जाधव यांचे स्वयंप्रेरणा गुरुकुल परिवारातर्फे मनःपूर्वक आभार! 🙏

टीम स्वयंप्रेरणा गुरुकुल

अमेरिकेतील शिकागो शहरात Elnfochips कंपनीत Embedded Engineer &Architect म्हणून १७ वर्षे कार्यरत असलेले इंदापूर येथील गोतं...
23/06/2026

अमेरिकेतील शिकागो शहरात Elnfochips कंपनीत Embedded Engineer &Architect म्हणून १७ वर्षे कार्यरत असलेले इंदापूर येथील गोतंडी गावचे सुपुत्र श्री.तन्मय नलवडे यांनी आज स्वयंप्रेरणा गुरुकुलच्या विद्यार्थांशी संवाद साधला. कष्ट,इच्छाशक्ती आणि स्वतःवर विश्वास ठेवत स्वप्नांचा पाठलाग करा,नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तत्पर रहा,परिस्थितीचा बाऊ न करता स्वतःला घडवण्यासाठी सज्ज रहा या शब्दात श्री तन्मय नलवडे यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.अमेरिकेतील त्यांच्या कामाचे स्वरूप आणि आजवरचा शैक्षणिक प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलघडला. यावेळी नववी इयत्तेतील गौरव पवार याचा Best Reader of the Month साठी सत्कार करण्यात आला,तसेच मंथन परीक्षेत यशस्वी झालेल्या शिवम पाटील,संचित मोरे व ओनेला आदलिंग सह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

22/06/2026

पालकांची भारावून टाकणारी प्रतिक्रिया #स्वयंप्रेरणा_गुरुकुल #सैनिकीशाळाप्रवेश

23/05/2026

स्वयंप्रेरणा बालसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरार्थी विरेन ❤️

Address

Muktai Textile Road, Near Bhigwan Road
Baramati Midc Area
413133

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वयंप्रेरणा गुरुकुल बारामती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category