22/10/2025
आज संध्याकाळी 07:00 वाजता....
मुकुल मंदिर शाळेच्या सर्व आजी-माजी वि?
22/10/2025
आज संध्याकाळी 07:00 वाजता....
11/02/2024
आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी *इंजिनीयर श्वेता शिरोडकर* यांची महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सिव्हिल इंजिनीयर असिस्टंटपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...💐💐💐
मुकुल मंदिर स्टुडंट्स परिवाराच्या उपक्रमांमध्ये श्वेता यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. मुकुल मंदिर स्टुडंट्स ग्रुप आणि सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने श्वेता शिरोडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!!☺️💐
#मुकुलमंदिर #मुकुलियन्स #मुकूलमंदिरस्टुडंट्स #मुकुलहार
15/11/2023
मुकुल मंदिर स्टुडंट्स आणि भक्ती गणेश ट्रस्ट आयोजित प्रदूषणविरहित दिवाळी महोत्सव "दीपोत्सव २०२३" दिनांक १४ नोव्हेंबर दिवाळी पाडव्याच्या दिवशी आनंदाने पार पडला.
मागील ११ वर्षांपासून काळा गणपती मंदीर सिडको एन-१ येथे दिपोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. प्रत्येक वेळी सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रकला-थीम वर आधारित दिव्यांची आरास रचून दीपोत्सव साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्राची अस्मिता असलेले गड-किल्ले यांचं संवर्धन करायला पाहिजे , प्रत्येकाने गड-किल्यावर होणारं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी प्रयत्न करून छत्रपती शिवरायांनी दिलेला वारसा जोपासला पाहीजे असा संदेश देणारी कलाकृती काढून त्यावर दिव्यांची आरास रचण्यात आली होती.
दीपोत्सवाची सुरुवात छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुनीलकृष्ण लांजेवार, श्री भक्ती ट्रस्ट चे श्री एस. एम कुलकर्णी, श्री सुधीर दातार, मुकुल मंदिर स्टुडंट्स ग्रुप चे श्री. शेखर निकम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मुकुल मंदिर शाळेच्या शिक्षिका मेधा भगाडे आणि सीमंत मॅडम यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
मुकुल मंदिर माजी विद्यार्थी परिवार दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. यावेळी प्रथमच शहरातील स्वच्छतेच्या सामाजिक प्रश्नावर काम करणारी छत्रपती संभाजीनगर प्लॉगर्स ची संपूर्ण टीम देखील या कार्यक्रमाचे सह-आयोजक म्हणून सामील झाले होते.
शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन या प्रकारची इको-फ्रेंडली दिवाळी साजरा करतात, सर्वांचे परिवार एकत्र येऊन सामाजिक सलोखा निर्माण करतात आणि जल्लोषात सण-उत्सव साजरे होतात त्यामुळे सर्वांमध्ये ऊर्जा संचारते. या कार्यक्रमाचे सातत्य सलग ११ वर्षे टिकवून ठेवल्यामुळे मुकुल मंदिर माजी विद्यार्थी परिवाराचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी मुकुल मंदिर स्टुडंट्स चे विशाल मेटे, शेखर निकम, मंगेश बनसोड, प्रफुल्ल वनारे,जान्हवी पारनाईक, प्रचिती हासेगावकर,श्रेयस सोनार, सागर मेटे, अबोली सेवेकर, उदित वैद्य,अलोक पांडे,दीप्ती रसाळ, प्रियांका पाटील,सुयोग खडसे,तन्वी कुलकर्णी, किरण वनारे,अभिजित सूर्यवंशी,अजिंक्य सवाई, छत्रपती संभाजीनगर प्लॉगर्स चे निखिल खंडेलवाल, ओंकार भरोटे, हर्ष संकलेचा आणि सदस्य या सर्वांनी मेहनत घेतली.
दिपोत्सवाचा उत्साह वाढविण्यासाठी आणि दिपोत्सव साजरा करण्यासाठी परिसरातील नागरिक,मुकुल मंदिर शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, छत्रपती संभाजीनगर प्लॉगर्स चे प्रतिनिधी, श्री भक्ती ट्रस्ट चे मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने हा दीपोत्सव २०२३ अगदी हर्षोल्हासात पार पडला.
दीपोत्सवाला सदिच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद..!!
- शेखर निकम
14/11/2023
दीपोत्सव २०२३...
सकाळी ६:३० वाजता फ्रेश फुलांची खरेदीने आजच्या दीपोत्सव च्या तयारीला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ७ वाजता सर्वजण भेटुयात काळा गणपती मंदीर सिडको येथे..!!☺️☺️
13/11/2023
सर्वांना यायचं आहेच!!
22/02/2023
शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.किरणकुमार चव्हाण यांना राज्यपालांच्या हस्ते एमर्जिंग डेंटिस्ट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल संपूर्ण मुकुल मंदिर परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा..💐💐
kirankumar88 .in
#मुकुलमंदिर #मुकुलमंदिरस्टुडन्ट्स #मुकुलहार #मुकूलमंदिरपरिवार
22/02/2023
नुकताच औरंगाबाद शहरात वारली पेंटिंग संबंधित विश्वविक्रम नोंद झाला. १२० मुली-महिलांनी सहभाग नोंदवत या विश्वविक्रमाला गवसणी घातली. याच टीम मध्ये आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी जान्हवी पारनाईक यांनी देखील सहभागी होत आपल्या चित्रकलेने हातभार लावला, मुकुल मंदिर परिवारातर्फे या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐"
#मुकुलमंदिर #मुकुलमंदिरस्टुडन्ट्स #मुकूलमंदिरपरिवार
30/10/2022
पर्यावरणपुरक दिवाळी महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने मुकुल मंदिर स्टुडंट्स आणि श्री भक्ती गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने मागील १० वर्षांपासून दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
२५ ऑक्टोबर रोजी काळा गणपती मंदिर येथे दीपोत्सव संपन्न झाला. यावेळी कोरोना काळात तसेच सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना हक्काने आनंदाने जीवन जगता यावं याकरिता सतत राबणारे समाजातील घटक डॉक्टर्स, पोलीस, सर्व प्रकारचे कर्मचारी वर्ग यांना धन्यवाद देणाऱ्या थीमवर आधारित २०२२ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच उपस्थितांनी मिळून या समाजातल्या "हिरोंसाठी" टाळ्यांचा कडकडाट करून आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे उदघाटन मुकुल मंदिर शाळेचे मुख्याध्यापक जयंत चौधरी आणि श्री भक्ती ट्रस्ट चे कुलकर्णी सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मयूर भालेराव, किरण चव्हाण, मेधा भागडे, सीमंत मॅम, सुधीर दातार, सवाई साहेब आणि भक्ती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्य सवाई, मंगेश बनसोड, चिन्मय शिरोडकर, श्रेयस सोनार, किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्यासोबतच औरंगाबादच्या बाहेरगावी राहत असलेल्या मित्र-मैत्रीणींना एकत्रितपणे भेटता यावे याकरिता हा कार्यक्रम आयोजित केल्या जातो असं मत मुकुल मंदिर स्टुडंट्स च्या शेखर निकम यांनी मांडले.
हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी कलाप्रेमी आणि शाळेची माजी विद्यार्थी जान्हवी पारनाईक, अबोली सेवेकर, प्रचिती हसेगावकर, दीप्ती रसाळ, प्रतीक सराफ, सिद्देश सुरसे, गौरव पाखले, ओंकार कुलकर्णी,विशाल मेटे, किरण वनारे , सागर मेटे आणि मुकुल मंदिर स्टुडंट्स ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
#मुकुलमंदिर #मुकूलमंदिरपरिवार #दिपोत्सव #दिपोत्सव२०२२
23/10/2022
मुकुल मंदिर शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा आवडता उत्सव, पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्यासोबतच सामाजिक संदेश देणारा आपला "दीपोत्सव २०२२" सलग ११ व्या वर्षी आपण साजरा करत आहोत.
◆◆ *"दीपोत्सव २०२२"* ◆◆
*दिनांक - २५ ऑक्टोबर २०२२, मंगळवार*
*वेळ - सायंकाळी ७:३० वाजता*
*ठिकाण - काळा गणपती मंदिर, एन-१ सिडको, औरंगाबाद.*
शाळेतल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा आनंद लुटण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन *"मुकुल मंदिर स्टुडंट्स"* ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी प्रतिनिधींना संपर्क करू शकता , तसेच आपल्या फेसबुक-इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा.
मंगेश बनसोड - 9665260795
अंजिक्य सवाई - 9665201320
जान्हवी पारनाईक - 7387024473
★★आपले विनीत★★
*टीम मुकुल मंदिर स्टुडंट्स*
https://www.facebook.com/Mukulmandirstudents/
Instagram.com/mukulmandirstudents
https://wa.me/+919579983763
दरवर्षीप्रमाणे आपण साजरा करत असलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या नियोजनात सहभागी होण्यासाठी आपण इच्छूक असाल तर मुकुल मंदिर स्टुडंन्ट्स ग्रुप च्या प्रतिनिधींना पुढील लिंकद्वारे संपर्क करा.
https://wa.me/9579983763
- Team Mukul Mandir Students