Vidyā-Araṇyam

Vidyā-Araṇyam

Share

A school with a vision to reinstate the lost values blending it with the contemporary needs, futuristic view, ecological harmony

24/12/2025

विद्या अरण्यम संकुल, गांधेली ,
छत्रपती संभाजीनगर
२४डिसेंबर २०२५
साने गुरुजी यांची जयंती
24 डिसेंबर म्हणजे साने गुरुजी यांची जयंती निमित्त विद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी त्रिभुवन यांनी स्वीकारले.इयत्ता सातवीचा विद्यार्थी सोहम याने साने गुरुजींनी लिहिलेले एक गीत सादर केले. त्यांना इयत्ता आठवीचे विद्यार्थिनी वैष्णवी घोडके हिने भाषण सादर केले तसेच अनन्या ढोले हिने साने गुरुजींच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. इयत्ता आठवीचे विद्यार्थिनी तनुजा शिंदे हिने श्यामची आई पुस्तकातील एक गोष्ट मुलांना सांगितली. त्यानंतर श्रीमती मंजुषा दीदी यांनी साने गुरुजींच्या जीवनातील एक गोष्ट विद्यार्थ्यांना समजावून सांगितली व त्यातून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. त्यानंतर अनन्याने आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली. अशाप्रकारे विद्यालयात साने गुरुजींची जयंती उत्साहात पार पडली.

Photos from Vidyā-Araṇyam's post 24/12/2025

विद्या अरण्यम संकुल, गांधेली, छत्रपती संभाजीनगर
22 डिसेंबर 2025
राष्ट्रीय गणित दिवस
विद्या अरण्यम विद्यालयामध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . हा दिवस थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त विद्यालयात छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी त्रिभुवन यांनी स्वीकारले. हा दिवस थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो.इ.8वी च्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.7वी व 8वी च्या विद्यार्थिनींनी सुंदर भित्तीपत्रके तयार केली होती त्यांचे अनावरण मुख्याध्यापकांनी केले. बालवर्ग व पहिलीच्या विद्यार्थ्यांनी गणितावरील सुंदर कविता सादर केल्या. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणित दिवसाबद्दल माहिती सांगितली . श्रीनिवास रामानुजन रामानुजन यांच्या बद्दल माहिती सांगितली व त्यांनी लावलेले विविध शोध याबद्दलही माहिती सांगण्यात आली. तसेच राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त विद्यालयात गणित प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यानंतर श्रीमती अपर्णा कुलकर्णी दीदी यांनी गणित दिवसाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अनन्या ढोले हिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशाप्रकारे विद्यालयात गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

07/12/2025

विद्या अरण्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 06 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केलेले मनोगत व कविता.

Photos from Vidyā-Araṇyam's post 07/12/2025

विद्या अरण्यम् संकुल
६ डिसेंबर २०२५
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा
महापरिनिर्वाण दिन
विद्या अरण्यम् विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी त्रिभुवन दिदी यांनी भूषविले. अध्यक्षांनी प्रतिमेस पुष्पहार करून अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता नववीची विद्यार्थिनी रिया ढोले हिने केले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणे कविता गाणे गीते सादर केले. त्यानंतर विद्यालयाच्या सहशिक्षिका छाया जोंधळे दीदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. श्रीमती कल्पना शेट्टी दीदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले.तसेच श्रीमती किरण दीदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. त्यानंतर विशोका हरणे दीदी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. समृद्धी घोडके हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. अशाप्रकारे विद्यालय महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

03/12/2025

विद्या अरण्यम् संकुल, गांधेली, छ. संभाजीनगर.

1 डिसेंबर 2025,
जागतिक एड्स दिन

जागतिक एड्स दिन, दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रथम 1988 मध्ये HIV/AIDS महामारीवर जागतिक लक्ष केंद्रित करण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एड्समुळे मृत्यू झालेल्यांचा स्मरणार्थ स्थापना केली होती.
एड्स कशामुळे होतो व त्यावर पासून वाचण्याचे उपाय काय व एड्स विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी या दिवसाचे महत्त्व सांगितले.

या दिवसानिमित्त शाळेच्या सह शिक्षिका श्रीमती स्मिता साळुंखे यांनी याविषयी माहिती दिली.

Photos from Vidyā-Araṇyam's post 03/12/2025

विद्या अरण्यम् संकुल
२८नोव्हेंबर २०२५
महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी
आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी विद्यालयात साजरी करण्यात आली . अध्यक्षांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती योगिता हमने दीदी यांनी केले. महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्य विषयी श्रीमती क्रांती देशपांडे दिदी यांनी माहिती दिली. तसेच महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कधी प्रदान करण्यात आली या बद्दल श्रीमती विशोका हरणे दिदी यांनी माहिती दिली. श्रीमान पांढरे सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशाप्रकारे विद्यालयात महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

Photos from Vidyā-Araṇyam's post 03/12/2025

विद्यार्थ्यांना विविध भौगोलिक क्षेत्रांची माहिती होण्यासाठी व त्यांची निरीक्षण क्षमता विकसित होण्यासाठी व वारसा स्थळांना भेट देण्याचा उद्देशही सहलीमागे आहे त्या निमित्ताने
18 नोव्हेंबर 2025 रोजी विद्या अरण्यम् विद्यालयाची इयत्ता
पाचवी ते बारावीची सहल भंडारदरा तसेच शिर्डी येथे गेली. सकाळी सहा वाजता सहल विद्यालयातून निघाली आणि साडेअकरा वाजता भंडारदरा येथे पोहोचली .भंडारदरा येथे पोहोचल्यावर सर्वप्रथम सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले कळसुबाई हरिश्चंद्रगड हे अभयारण्य बघितले. तेथे विविध प्रकारचे झाडे दऱ्या डोंगर इत्यादींचे निरीक्षण केले .तसेच वेगवेगळे धबधबे देखील पाहिले . त्यामध्ये वसुंधरा फॉल मुलांना सर्वाधिक आवडला. त्यानंतर विल्सन डॅम हे धरणही पाहिले ,यानंतर अमृतेश्वर महादेव हे हेमाडपंथी मंदिर बघितले. आणि परतीच्या प्रवासात शिर्डी येथे गेलो शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन केले आणि परतीच्या प्रवासास लागलो सर्व उद्देशांची पूर्ती होऊन सहल उत्साहात पार पडली

Photos from Vidyā-Araṇyam's post 14/11/2025

14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त शिक्षण विभागाने गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात सहावीचा विद्यार्थी सफवान शेख यांनी गीत गायन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन क्रमांक पटकावला .मा.शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाटकर मॅडम यांनी आयोजित बाल आनंद उत्सवात विद्यार्थी सफवान शेख यांस शुभ आशीर्वाद दिले.( छत्रपती संभाजी नगर)

Photos from Vidyā-Araṇyam's post 14/11/2025

विद्या अरण्यम् संकुल, गांधेली, छ. संभाजीनगर.

दिनांक 14 नोव्हेंबर 2025

बाल दिवस

संकुलात आज बाल दिवसानिमित्त आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने बालवर्ग व इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या आनंदनगरीमध्ये खाद्यपदार्थांचे, बाजारात मिळणाऱ्या खाऊचे, भाजीपाल्याचे स्टॉल्स लावले होते.

विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान अवगत व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी खरेदी करून त्यांचा उत्साह वाढवला.

शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे सहकार्याने आनंद नगरी उत्साहात पार पाडण्यात आली.

Photos from Vidyā-Araṇyam's post 14/11/2025

14 नोव्हेंबर 2025
'बालदिना, निमित्त विद्या अरण्यम संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक आरोग्य विषयक उपक्रम घेण्यात आली. त्यासाठी एमजीएम हॉस्पिटल मधून डॉक्टर विद्यालयात आले होते व त्यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या 7 स्टेप्स शिकवल्या . तसेच विविध रोगांविषयी माहिती दिली . जसे की covid-19, रेबीज इ. रोग कसे होतात ,कशापासून होतात, कसे पसरतात, त्या रोगांची लक्षणे काय काय असतात, तसेच ते रोग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी . याबद्दल डॉक्टरांनी माहिती दिली व मुलांमध्ये रोगाविषयी जागरूकता निर्माण केली.

Photos from Vidyā-Araṇyam's post 16/10/2025

Annual showcase "Pankh" of Vidya Aranyam School education cluster concluded with great enthusiasm on 12th October.

On Sunday, October 12, 2025, the annual cultural showcase "Pankh" was to be organized at the scenic Vidyaranyam Campus at MGM Gandheli. The program conceptualized by Visian Director Ms. Parwati Dutta was aimed at facilitating creative expressions in the students in schools. The chief guests for the program Shri. Mansingh Pawar, Founder of Chhatrapati Shivaji Education Society Kannada and President of Ratnaprabha Motors Private Limited and Ms. Richa Deokar Labhale, Director of Mahatma Gandhi School, Pune praised the efforts of the school team.

The program started with the inauguration of a Smart Classroom by the guests. The students of class 8th welcomed the dignitaries by presenting a welcome song. The Incharge Headmistress of the school, Smt. Pallavi Tribhuvan, while reading the annual report, informed the students about the success achieved in the field of academics and sports. Students of class 7-12 presented a short play based on the theme of science. The main theme for this year's 'Pankh' was "Ras Loka" based on the world of sentiments described in Bharatmuni's Natyashastra. Shringaar, Hasya, Karuna, Raudra, Veer, Bhayanak, Bibhatsa, Adbhut and Shanta – these are the Navras which every person experiences in life. 'Raslok' was presented by students of classes 1st to 12th through 9 short scenes - each scene based on a rich literary work in a language. The diversity of literature in Braj language, Shringar in Braj language, Hasya in Oriya, Rudra and Bibhatsa in Sanskrit, Bhayanak in Bundeli, Karun in Pali language and veer in Hindi was woven with dance, music, drama and narration . Mahagami Gurukul students designed and taught the Rasaloka dance-drama for the students that was appreciated by all.

The annual issue of 'Pankh' magazine containing articles and poems written by the students was also published on this occasion. Also, those who worked hard and contributed for the programme were given certificates of honor by the dignitaries present and Sushri Parwati Didi. The announcements were by senior teachers Aparna Kulkarni and Kranti Deshpande and another teacher of the school, Kiran Shetty concluded the program with a vote of thanks.Annual showcase "Pankh" of Vidya Aranyam School education cluster concluded with great enthusiasm on 12th October.

On Sunday, October 12, 2025, the annual cultural showcase "Pankh" was to be organized at the scenic Vidyaranyam Campus at MGM Gandheli. The program conceptualized by Visian Director Ms. Parwati Dutta was aimed at facilitating creative expressions in the students in schools. The chief guests for the program Shri. Mansingh Pawar, Founder of Chhatrapati Shivaji Education Society Kannada and President of Ratnaprabha Motors Private Limited and Ms. Richa Deokar Labhale, Director of Mahatma Gandhi School, Pune praised the efforts of the school team.

The program started with the inauguration of a Smart Classroom by the guests. The students of class 8th welcomed the dignitaries by presenting a welcome song. The Incharge Headmistress of the school, Smt. Pallavi Tribhuvan, while reading the annual report, informed the students about the success achieved in the field of academics and sports. Students of class 7-12 presented a short play based on the theme of science. The main theme for this year's 'Pankh' was "Ras Loka" based on the world of sentiments described in Bharatmuni's Natyashastra. Shringaar, Hasya, Karuna, Raudra, Veer, Bhayanak, Bibhatsa, Adbhut and Shanta – these are the Navras which every person experiences in life. 'Raslok' was presented by students of classes 1st to 12th through 9 short scenes - each scene based on a rich literary work in a language. The diversity of literature in Braj language, Shringar in Braj language, Hasya in Oriya, Rudra and Bibhatsa in Sanskrit, Bhayanak in Bundeli, Karun in Pali language and veer in Hindi was woven with dance, music, drama and narration . Mahagami Gurukul students designed and taught the Rasaloka dance-drama for the students that was appreciated by all.

The annual issue of 'Pankh' magazine containing articles and poems written by the students was also published on this occasion. Also, those who worked hard and contributed for the programme were given certificates of honor by the dignitaries present and Sushri Parwati Didi. The announcements were by senior teachers Aparna Kulkarni and Kranti Deshpande and another teacher of the school, Kiran Shetty concluded the program with a vote of thanks.

Photos from Vidyā-Araṇyam's post 01/10/2025

विद्या अरण्यम् संकुल,
गांधेली ,छत्रपती संभाजीनगर

२ ऑक्टोबर २०२५

महात्मा गांधी जयंती
आज विद्या अरण्यम् विद्यालयात महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी अनन्या ढोले हिने महात्मा गांधींविषयी माहिती सांगितली. तसेच सहावीची विद्यार्थी आदिती ढोले, अकरावीच्या विद्यार्थिनी वैष्णवी लकवाळ,राणी उगले यांनी महात्मा गांधीच्या कार्याविषयी माहिती सांगितली.
त्यानंतर इयत्ता नववीची विद्यार्थिनी रिया ढोले कार्यक्रमाचे आधार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा, श्रम या मूल्यांचे महत्त्व गांधीजींना गांधीजींनी भारतीयांना दिलेल्या मूल्यांबाबत भाषण केले तसेच, विद्यार्थ्यांनी श्रमदान करून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. अशाप्रकारे विद्यालयात महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


BaghTalav, MGM Hills Gut No. 284 Gandheli
Aurangabad
431007

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm