25/05/2024
🌟 Exciting News! 🌟
We are thrilled to announce that Dr. B.A.M. University - UDCT Ch.Sambhajinagar's B.Tech Program in Chemical Technology has been granted NBA accreditation for the period 2024-2027! 🎓 This achievement is a testament to the incredible teamwork, dedication, and pursuit of excellence within our institution.
From our devoted stakeholders to our esteemed alumni and dedicated professors, this accreditation belongs to each and every one of you. Together, we've set new standards in education and paved the path for success.
Let's continue to soar higher, united in our commitment to excellence! 💼
DrPravin Wakte Bhagwan Sakhale Ganesh Pandhre
20/03/2024
"Thrilled to host Prof. R D Kulkarni, Vice Chancellor of Mumbai University, at UDCT Chhatrapati Sambhajinagar. Also he is adjunct Professor of our department.
A momentous occasion as we extend our heartfelt felicitation during his recent visit to our department,
Celebrating academic excellence and collaboration.
13/03/2024
डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ.अनिकेत प्रदिप सरकटे यांचे मंगळवारी (दि.१२) सायंकाळी सातच्या दरम्यान हृदयाविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या चाळीशीतच निधन झाले आहे. सहा राष्ट्रीय संशोधन प्रकल्प पूर्ण करणारे संशोधक व 'यंग सायंटिस्ट ॲवॉर्ड'प्राप्त प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती.
सप्टेंबर २००९ पासून ते विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉ.देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच डी प्राप्त केली होती. राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय परिषदांमधून १२५ संशोधन पेपर त्यांनी सादर केले होते. आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नललमध्ये १२ शोधनिबंध प्रकाशित झाले होते. तर तीन पुस्तके लिहिली. तसेच विभागप्रमुख डॉ . भगवान साखळे व डॉ. प्रवीण वक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरील सहा संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले होते . यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग, आयसीएमआर, आयसीटीई, डीएसटी, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिशन आदी राष्ट्रीय संस्थांच्या अनुदानातून हे प्रकल्प पूर्ण झाले. त्यांना आठ वर्षांपूर्वी 'यंग सायंटिस्ट ॲवॉर्ड' प्राप्त प्राध्यापक म्हणून गौरविण्यात आले होते.
भावपूर्ण श्रद्धांजली
02/03/2024
छत्रपती संभाजीनगर - 28/02/2024
रसायन तंत्रज्ञान विभागात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान विभागात दिनांक २४ फेब्रुवारी, २०२४ शनिवार
रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बेळी विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. भगवान साखळे, प्राध्यापक डॉ. प्रविण वक्ते व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फाईझर हेल्थकेयर इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी श्री. महेश बावगे आणि बॉण्ड लाईफ सायन्स लिमिटेडचे संचालक डॉ. सुशील बाहेकर प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्यासाठी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यात कार्यरत, उद्योजक असलेले अनेक माजी विद्यार्थी आवर्जुन उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी विभागात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व आपल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले तसेच भविष्यात विभागाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करुन व्यावसायिक संधी सांगितल्या अनेक विद्यार्थी बऱ्याच वर्षांनी विभागात
आल्यामुळे आठवणीत रममान झाल्याचे दिसुन आले. अध्यक्षीय समारोपात विभागप्रमुख डॉ. बी. के. साखळे यांनी माजी विद्यार्थ्यांना विभागाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच माजी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तसेच संशोधनासाठी सांमजस्य करार व आंतरवासिता उपक्रमासाठी मदत करण्याचे आवाहन केले तसेच
दर महिन्याला माजी विद्यार्थ्यांचे व्याख्यान आयोजित करण्याचा संकल्प सांगितला तसेच आता पर्यंत विभागाने केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. माजी विद्यार्थ्यांची बैठक घेवुन पुढिल दिशा व धोरणे निश्चित करण्यात आले व एका कार्यकारिणी समितीचे गठण ही करण्यात आले. माजी विद्यार्थी मेळाव्यातून भविष्यकालीन योजना, नवे बदल आणि भावनिक क्र णानुबंध एका सूत्रात जोडले जातात असा संदेश यातून देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील शिक्षक माजी विद्यार्थी असोसिएशनचे प्रभारी प्रा. विवेक राठोड, प्रा. गणेश पांढरे, प्रा. विनय लोमटे, डॉ.सचिन भुसारी, प्रा. गौरी कल्लावार, प्रा. सुषमा वैष्णव, विभागातील पदवी व पदव्युत्तरचे सर्व विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. विनोद सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. गौरी पाटिल व कु. समृध्दी शेळके यांनी केले व आभार प्रदर्शन संशोधक विद्यार्थी श्री. प्रविण वैरागर यांनी मानले.
28/02/2024
Today we celebrated the national science Day by organising various competitions like science quiz competition, essay writing competition and seminar presentations On the theme of “Indigenous technologies for Vikasit Bharat”at department of chemical technology, Dr Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhaji Nagar. The chief guest of today’s function was Prof. (Dr.) K.V. Kale, honourable Vice chancellor, Dr Babasaheb Ambedkar technological University, Lonere,Dist. Raigad. On the auspicious hands of honourable guest, certificates have been awarded to the winners of various competitions in presence of Dr. BK Sakhale, Head, UDCT. On this occasion, Prof. Pravin Wakte, NSDC coordinator, Prof. VD Rathod, Dr Sachin Bhusari, Prof. Ganesh Pandhre, Prof.Vinay Lomte and students of UG and PG of the department were present.
PhD scholars Mr. Kalusing Padvi, Ms. Radha Waghchoure, Ms.Bhagyashree Nikam, Ms.Mahadevi Kendre has taken the efforts for successful conduction of National Science Day !!
02/02/2023
3 Days to Go !
Register for UDCT Alumni Meet 2023 ✨
Reunite at your Alma Mater and Meet your old Friends
01/02/2023
UDCT Alumni Meet!
Just 4 days to go !
Let's Reconnect and Reunite on 5th February
Register on Below link
https://forms.gle/wpL4t6vbV5ruhgvr7