09/05/2026
माननीय महेश मांजरेकर यांच्या लेखणीतून साकारलेले , अभिनेता सिद्धार्थ जाधव निर्मित, अभिनेता पंकज पंचारिया यांच्या अभिनयातून सज्ज झालेल्या ॲनिमल नाटकाच्या टीमला आणि सर्व कलावंतांना पुढील नाट्यप्रवासासाठी खूप खूप सदिच्छा.
Department of Dramatics was established in the year of 1973.
09/05/2026
माननीय महेश मांजरेकर यांच्या लेखणीतून साकारलेले , अभिनेता सिद्धार्थ जाधव निर्मित, अभिनेता पंकज पंचारिया यांच्या अभिनयातून सज्ज झालेल्या ॲनिमल नाटकाच्या टीमला आणि सर्व कलावंतांना पुढील नाट्यप्रवासासाठी खूप खूप सदिच्छा.
01/05/2026
https://youtu.be/3gFkvis_sRE?si=A6p_h7AZtWaPdb4r
University workshop video
AK PUBLIC NEWS 16 likes, 2 comments. "Kuchipudi Dance Workshop at Department of Dramatics , DR BAMU by Dr Rajyalakshmi Seth, Mumbai #2023"
17/04/2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने विद्यापीठातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना.
30/03/2026
नाट्य अभिवाचनातून वाड्यातील स्त्रियांच्या जीवनातील निःशब्द संघर्षाचा वेध: ‘तुळईसुक्त’ला उत्स्फूर्त प्रतिसाद..!
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागात आज ‘तुळईसुक्त’ या नाटकाचा अभिवाचन प्रयोग उत्साहात सादर करण्यात आला. लेखक अमोल कुलकर्णी (बुलढाणा) आणि सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक श्री. अभिजीत झुंजारराव (मुंबई) यांच्या सर्जनशीलतेतून साकारलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना १९५० च्या दशकातील वाडा संस्कृतीच्या गुंतागुंतीच्या वास्तवात नेले.
‘तुळईसुक्त’ हे नाटक वाड्यातील पाटलाच्या चार बायका आणि त्यांच्या आयुष्यातील वेदना, अपेक्षा व अन्याय यांचे प्रभावी चित्रण करते. स्त्रीजीवनातील दडपण, मुलगा होण्याची अपेक्षा आणि घराणेशाहीच्या चौकटीत अडकलेली मानसिकता यांचे संवेदनशील आणि विचारप्रवर्तक दर्शन या अभिवाचनातून घडले. संवादांच्या ताकदीमुळे आणि आशयाच्या गहनतेमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. प्रा. प्रदीप कांबळे, डाॅ. विशाखा शिरवाडकर, प्रा. सुनिल कांबळे, उल्का कुलकर्णी, वैशाली दाभाडे, प्रेरणा खरात, साधना विठोरे यांनी उत्कृष्ट भुमिका साकारल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप कांबळे यांनी केले. विभागप्रमुख डाॅ. वैशाली बोदेले यांच्या वतीने प्रास्ताविकात डॉ. गजानन दांडगे यांनी नाट्यकलेचे सामाजिक भान अधोरेखित करत ‘तुळईसुक्त’च्या आशयाची ओळख करून दिली. तसेच डॉ. स्मिता साबळे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून 'तुळईसुक्त’ नाट्यसंहितेच्या मांडणी बाबत विचार प्रकट केले. हे नाटक सामाजिक रचना, स्त्रीचे स्थान आणि परंपरेच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायाचे जिवंत आणि विचारप्रवर्तक चित्र उभे करते.
या कार्यक्रमाला विभागातील प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी तसेच शहरातील नाट्यरसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. अभिवाचन प्रयोगानंतर नाटकाच्या विषयावर रंगलेली चर्चा ही कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली. ‘तुळईसुक्त’च्या माध्यमातून वाडा संस्कृतीतील स्त्रीजीवनाचा वेध घेत सामाजिक वास्तवावर भाष्य करण्यात आले असून, या प्रयोगाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
30/03/2026
प्रादर्शिक कला विभागात
*तुळईसुक्त नाटकाचे आज अभिवाचन*
छत्रपती संभाजीनगर, दि.२९: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रादर्शिक कला विभागात नाट्य अभिवाचन , कार्यक्रम सोमवारी (दि.३०) आयोजित करण्यात आला आहे
सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक अभिजित झुंजारराव यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रसिद्ध लेखक अमोल कुलकर्णी लिखित तुळईसूक्त या नाटकाचे अभिवाचन विभागाच्या प्रांगणात विभागातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची वेळ दुपारी दोन वाजता ही आहे.सर्व नाट्यरसिक प्रेक्षकांनी या अभिवाचनास सहभागी होऊन उपस्थित रहावे .असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. वैशाली बोदेले यांनी केली आहे.
*सोबत कार्यक्रमपत्रिका*
30/03/2026
*रंगभूमी दिनानिमित्त नाट्यसंवाद प्रशिक्षण शिबिर*
_'घर दोघांचे' एकांकिकेचेही सादरीकरण
छत्रपती संभाजी नगर,दि.२८: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कला सादरीकरण विभागात (डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स) जागतिक रंगभूमी दिनानिमित्त नाट्यसंवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच 'घर दोघांचे' एकांकिकेचेही सादरीकरण करण्यात आले.
विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागामध्ये जागतिक रंगभूमी दीन उत्साहात साजरा...
2 प्रादर्शिक कला विभागामध्ये नाट्य संवाद प्रशिक्षण शिबिर पार पडले. यासाठी सुप्रसिध्द सिने,नाट्य अभिनेते,लेखक मा.ओंकार गोवर्धन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून 'प्रशिक्षण हे नाटासाठी अंत्यत आवश्यक आहे '. असे मत प्रतिपादन करताना विभागाच्या दैदिप्यमान इतिहासाची आणि वर्तमानाची प्रशंसा केली. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. यावेळी विभागप्रमुख प्रा डॉ.वैशाली बोदेले यांनी प्रास्ताविक करताना जागतिक रंगभूमी दिनाचे महत्त्व आणि विभागाचे जागतिक पातळीवरील योगदान यावर प्रकाश टाकला. यानंतर आशिष देव लिखित आणि सिध्देश्वर थोरात दिग्दर्शित " घर दोघांचं " या एकांकिकेचा प्रयोग संपन्न झाला. आजच्या आधुनिक काळात प्रेमाच स्वरूप बदलले असताना त्यागाची भावना आणि शारीरिक नव्हे तर मानसिक पातळीवरील प्रेम कसे पारदर्शक व व्याकूळ करणारे असते याची प्रचिती या एकांकिकेतून अनुभवास आली. विभागाच्या संपन्न झालेल्या पन्नासाव्या सुवर्ण मोहत्सवी नाट्य महोत्सवात जाहीर केल्या प्रमाणे स्व. प्रा.डॉ.रुस्तुम अचलखांब, स्व.प्रा.डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर आणि स्व.प्रा. कुमार देशमुख यांचे कार्य कर्तृत्व आणि आठवणींना उजाळा मिळून विद्यार्थ्यांना या वरील गुरुजनांच्या नावातून सतत ऊर्जा आणि प्रेरणा मिळण्यासाठी, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ.संतोष गालफाडे यांच्या तर्फे प्रदान केला जाणारा " सिन्सियर आर्टिस्ट ऑफ द इअर " हा पुरस्कार विभागाचा गुणी विद्यार्थी कलावंत सुमित सोळंके याला तर प्रा. प्रदीप कांबळे आणि डॉ.विशाखा शिरवाडकर यांच्या तर्फे प्रदान केला जाणारा " बेस्ट डीसिप्लीन डायरेक्टर अवॉर्ड " हा पुरस्कार सौरभ मोरे आणि साधना विठोरे या विद्यार्थी कलावंतांना मा. ओंकार गोवर्धन , प्रा.डॉ.वैशाली बोदेले, डॉ.स्मिता साबळे,डॉ.गजानन दांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सोबत फोटो*
30/03/2026
*'मोरूची मावशी'ने एकांकिका महोत्सवाचा समारोप*
छत्रपती संभाजीनगर, दि.२६: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभाग आयोजित सुवर्ण महोत्सवी नाट्यमहोत्सवाची सांगता आणि समारोप 'मोरूची मावशी ' या नाटकाने करण्यात आला.
प्र.के.अत्रे लिखित आणि विभागाचा विद्यार्थी सौरभ मोरे दिग्दर्शित ' मोरूची मावशी ' हे मराठी रंगभूमीवरील अतिशय लोकप्रिय विनोदी नाटक सादर झाले.नाटकाची गोष्ट मोरू आणि भैया या दोन कॉलेजमधील मित्रांभोवती फिरते, जे एकत्र एका बंगल्यात भाड्याने राहतात.मोरूची मावशी, जी 'कांडा संस्थानची' राणी आहे, ती त्यांना भेटायला येणार असते.मावशी येणार असल्यामुळे मोरू आणि भैया आपल्या मैत्रिणी जी आणि वनिता यांना भेटायला बोलावतात. ऐनवेळी मावशीचा दौरा रद्द होतो, पण मैत्रिणी आधीच ठरल्याप्रमाणे येतात. त्यांच्यासोबत एक वयस्कर स्त्री असणे आवश्यक असते, जी 'मावशी'ची भूमिका निभावू शकेल. मावशीच्या अनुपस्थितीत, मोरू आणि भैया आपल्या तिसऱ्या मित्राला, 'बंड्या'ला, मावशीचा स्त्रीवेष परिधान करून मावशी बनण्यास भाग पाडतात.
बंड्याने साकारलेली खोटी 'मोरूची मावशी' आणि तिच्याभोवती घडणाऱ्या गमतीजमती, संवाद आणि गोंधळातून नाटकात प्रचंड विनोदनिर्मिती होते.मावशीची भूमिका रामा पाडूळे याने दमदार पद्धतीने साकारून प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले. नाटकातील इतर पत्रातील जीवा ही घरातील नोकराची व्यक्तिरेखा आपल्या चालण्या बोलण्यातून आणि शारीरिक अंगविक्षेपातून प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. त्याचबरोबर गंगू,काका,कर्नल यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.यातून एका चांगल्या विनोदी नाटकाची अनुभूती उपस्थित सर्व रसिकांनी अनुभवली. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. वैशाली बोधले, डॉ. स्मिता साबळे डॉ. गजानन दांडगे गजानन दांडगे यांच्यासह विभागातील प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी यांनी परीक्षण घेतले. आजी माजी विद्यार्थी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवासाठी यांच्यासह विभागातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
*सोबत फोटो*
कॅप्शन : मोरूची मावशी या गाजलेल्या नाटकातील एक दृश्य.
28/03/2026
नाट्य अभिवाचनास आपण सहर्ष आमंत्रित आहात
28/03/2026
विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागामध्ये जागतिक रंगभूमी दीन उत्साहात साजरा...
27 मार्च हा जगभरात जागतिक रंगभूमी दीन म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागामध्येही तो दी. 27 मार्च 2026 रोजी विभागात थाटात साजरा करण्यात आला. याच दिवशी विशेष अशा काही उपक्रमांचे आयोजन केले होते.त्यात एकदिवसीय नाट्य संवाद प्रशिक्षण शिबिर पार पडले. यासाठी सुप्रसिध्द सिने,नाट्य अभिनेते,लेखक मा.ओंकार गोवर्धन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून 'प्रशिक्षण हे नाटासाठी अंत्यत आवश्यक आहे '. असे मत प्रतिपादन करताना विभागाच्या दैदिप्यमान इतिहासाची आणि वर्तमानाची प्रशंसा केली. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. यावेळी विभागप्रमुख प्रा डॉ.वैशाली बोदेले यांनी प्रास्ताविक करताना जागतिक रंगभूमी दिनाचे महत्त्व आणि विभागाचे जागतिक पातळीवरील योगदान यावर प्रकाश टाकला. यानंतर आशिष देव लिखित आणि सिध्देश्वर थोरात दिग्दर्शित " घर दोघांचं " या एकांकिकेचा प्रयोग संपन्न झाला.
26/03/2026
नाटक - मोरूची मावशी