17/11/2025
सोहळा पुन्हा एकत्र येण्याचा , सोहळा एकीने पुढे जाण्याचा, सोहळा नव्या उभारणीचा..
The Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Sanstha (C.S.M.S.S.)
Established in 1986 and was named after a renowned king and social worker of the State - CHHATRAPATI SHAHU MAHARAJ.
17/11/2025
सोहळा पुन्हा एकत्र येण्याचा , सोहळा एकीने पुढे जाण्याचा, सोहळा नव्या उभारणीचा..
10/11/2025
*सोहळा पुन्हा एकत्र येण्याचा , सोहळा एकीने पुढे जाण्याचा, सोहळा नव्या उभारणीचा...*
सकल मराठा
समाज बांधवांना
जय जिजाऊ !
छत्रपती संभाजीनगर शहरात *मराठा समाज प्रतिष्ठान* ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मराठा समाजातील गुणवंत गरीब, होतकरू आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी करण्यात आली. आज छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यवर्ती ठिकाणी आपल्या वसतिगृहाची बहुमजली सुसज्ज इमारत आहे. गरजवंत विद्यार्थी या वसतिगृहाचा लाभ घेत आहेत.
आज शिक्षण क्षेत्र झपाट्याने बदलते आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नवे उद्योग येऊ घातले आहेत. यामुळे उद्योग, व्यवसाय, नोकरी यात नव्या संधी निर्माण होणार आहेत. या संधीचे आपल्या समाजबांधवांना सोने करता यावे म्हणून *आऊसाहेब रिसर्च अँण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आरती)* या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्किल सेंटरच्या उभारणीचा निर्धार केला आहे. हा निर्धार पूर्णत्वास नेण्यासाठी गरज आहे आपल्या सर्वांच्या सहभागाची.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा *दीपस्तंभ* पुरस्काराने आपण सन्मान करणार आहोत आणि दीपावलीच्या निमित्ताने स्नेहमिलन सोहळा *शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५* रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या देखण्या सोहळ्याला उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पूर्णतः गैर राजकीय आहे.
समाजातील उद्योजक, वकील, डॉक्टर, शेतकरी, समाजकारणी, राजकारणी, व्यापारी संस्थाचालक, प्राध्यापक, शिक्षक ,पत्रकार, महिला, युवक या सर्वांनी या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी हातभार लावावा. या सोहळ्याचा दिवस जवळ येतो आहे. आपण अधिकाधिक समाजबांधवापर्यंत पोहचायला हवे. मला खात्री आहे की आपण सर्व समाजबांधव हा सोहळा यशस्वी करू.
उद्याच्या भविष्यासाठी आज नियोजन करूया. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.
आपले
*मराठा समाज प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर.*
🚩🚩🚩🚩🚩
07/11/2025
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलीत आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, कांचनवाडी , छत्रपती संभाजीनगर येथे "वंदे मातरम् " या राष्ट्रीय गीताच्या लेखनास 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, या राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन दि. 07.11.2025 रोजी करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते.
MUHS Public Relations
CSMSS Chh. Shahu College of Engineering, Aurangabad. DTE CODE- 2533
CSMS Sansthas College of Polytechnic, Aurangabad(MS)
Csmss College of Agriculture, Aurangabad
🌾 Standing with Our Farmers in Need 🌾
CSMSS Group has contributed ₹21 lakh to the Chief Minister’s Relief Fund to support farmers affected by the recent floods. 💧🤝
Collector Shri Deelip Swami appreciated this noble gesture and appealed to other institutions, NGOs, and individuals to come forward and extend their helping hands in this time of need. 🙏
CSMSS Chh. Shahu College of Engineering, Aurangabad. DTE CODE- 2533Csmss College of Agriculture, AurangabadCSMS Sansthas College of Polytechnic, Aurangabad(MS)
01/11/2025
💐"सियाम" कडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटींचे योगदान💐
अतिवृष्टी व पूर्वपरिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे नैतिक कर्तव्याच्या भावनेतून सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) यांनी या आपस्तीग्रस्त शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक कोटींचे योगदान दिले ....
Ajeet Seeds
CSMS Sansthas College of Polytechnic, Aurangabad(MS)
Csmss College of Agriculture, Aurangabad
CSMSS Chh. Shahu College of Engineering, Aurangabad. DTE CODE- 2533
31/10/2025
मराठवाड्यासाठी भूषणावह कामगिरी...
CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास NCISM व QCI चे भारतातून १० वे तर राज्यातून २ रे 'ए' ग्रेड मूल्यांकन.
छत्रपती संभाजीनगर कांचनवाडी, पैठण रोड येथील CSMSS छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली द्वारे (NCISM, New Delhi) व भारतीय गुणवत्ता परिषद, नवी दिल्ली (QCI) संपूर्ण भारतातील मूल्यांकन झालेल्या सर्व आयुर्वेद महाविद्यालयातून CSMSS आयुर्वेद महाविद्यालय संपूर्ण भारतातून 'ए' ग्रेड प्राप्त झालेल्या यादीमध्ये प्रथम १० महाविद्यालयामध्ये १० वा क्रमांक मिळविलेला आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS, Nashik) संलग्नित मूल्यांकन झालेल्या आयुर्वेद महाविद्यालयातून महाराष्ट्रात २ रे मूल्यांकन मिळाले आहे.
भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत ‘क्यूसीआय’ ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेचा उद्देश वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारणे हा आहे. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद, नवी दिल्ली यांच्या तपासणी पथकाने दिनांक १६ जुलै २०२५ ते १७ जुलै २०२५ या कालावधीत महाविद्यालय व रुग्णालयास निरीक्षणाला आलेल्या तीन सदस्यीय टीमने महाविद्यालय व रुग्णालयात मागील वर्षभरात रुग्णांचे उपचार, चाचण्यासह सर्व सोयी-सुविधांची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांच्या' शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास 'ए' ग्रेड दिला आहे. आयुर्वेद महाविद्यालयास यापूर्वी NAAC चे B++, ISO नऊ मानांकन तसेच रुग्णालय NABH मानांकन, ईट राईट प्रमाणपत्र, FSSAI प्रमाणित हॉस्पिटल किचन जागा, GMP प्रमाणित फार्मसीला प्राप्त झालेले आहे.
QCI 'ए' ग्रेड मूल्यांकनामुळे महाविद्यालयाकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे, रुग्णांची सुरक्षा, संशोधन, संस्थात्मक व्यवस्थापन आणि सेवा वितरण यासारख्या निकषांवर उत्कृष्ट कामगिरीमुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या तपासणीत संस्थेने प्रत्येक निकषावर उत्कृष्ट निकाल दिले आहेत. आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था सचिव श्री. पद्माकरराव मुळे यांनी दिली.
शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण केली असून ‘ QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकनामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिक वाढली असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख यांनी दिली.
यावेळी संचालक तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, मानव संसाधन व्यवस्थापक श्री. अनिल तायडे पाटील, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील आणि कार्यालय अधीक्षक श्री. बाबासाहेब प्रधान आदी उपस्थित होते.
13/10/2025
Ajeet Seeds CSMS Sansthas College of Polytechnic, Aurangabad(MS) Csmss College of Agriculture, Aurangabad CSMSS Chh. Shahu College of Engineering, Aurangabad. DTE CODE- 2533
19/08/2025
💐. 💐. 💐
#अभिनंदन
आणि
#शुभेच्छा...
💐. 💐. 💐
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय संचालकपदी
#डॉ_श्रीकांत_गुणवंतराव_देशमुख
यांची
तर
आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय प्राचार्यपदी
#डॉ_जयश्री_देशमुख
यांची नियुक्ती संस्थेचे सचिव
#मा_पद्माकरकाका_मुळे
यांनी केली आहे.
नियुक्तीनंतर मान्यवरांचा सत्कार रोपटे आणि शाल देऊन करण्यात आला.
यावेळी दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ. प्रवीण बैनाडे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. शशिकांत डीकले, डॉ. सदाशिव डावकर, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक श्री. अनिल तायडे, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील उपस्थित होते.💐
Ajeet Seeds
CSMS Sansthas College of Polytechnic, Aurangabad(MS)
Csmss College of Agriculture, Aurangabad
CSMSS Chh. Shahu College of Engineering, Aurangabad. DTE CODE- 2533
26/06/2025
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती दरवर्षी प्रमाणे उत्साहात साजरी....
12/06/2025
27/05/2025
*CSMSS ची विद्यार्थीनी कु. संस्कृती सतीश शेळके राज्यातून पहिली*
शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण करून देणाऱ्या कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील CSMSS छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाची विद्यार्थीनी कु. संस्कृती सतिश शेळके हिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी दि. 21/06/2025 रोजी जाहीर केल्यानुसार हिवाळी-2023 विद्यापीठ परीक्षेत तृतीय वर्ष बीएएमएस परीक्षेत महाराष्ट्रातील 107 महाविद्यालयामधुन प्रथम क्रमांक घेऊन सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच ती महाराष्ट्र राज्यातून पहिली आली आहे.
यापूर्वी कु. संस्कृती प्रथम वर्ष बीएएमएस उन्हाळी-2021 परीक्षेत महाराष्ट्रात 4 था क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती.
गंगापूर येथील श्री. सतीश श्रीरंग शेळके यांची कन्या संस्कृती शेळके ही दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली होती. छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय वैद्यकीय शिक्षण घेऊन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिकमार्फत घेण्यात आलेल्या बीएएमएस तृतीय वर्षाच्या परीक्षेत १०५० पैकी ८३१ गुण मिळवून तिने महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला. संस्कृतीचे वडील श्री. सतीश श्रीरंग शेळके संगणक दुरुस्तीचे काम करतात, तर आई सौ. शीला शेळके या शिलाईचे काम करतात. प्रतिकूल परिस्थिती असताना संस्कृतीने हे यश मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजित मुळे, सचिव . श्रीपद्माकरराव मुळे, सदस्य, प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, उपप्राचार्य डॉ. जयश्री देशमुख तसेच अध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी कु. संस्कृती सतिश शेळकेचा सत्कार संस्थेचे सचिव श्री. पद्मकरराव मुळे यांच्या हस्ते करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोगरे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. शशिकांत डिकले, एच. आर. श्री. अनिल तायडे तसेच जनसंपर्क अधिकारी श्री. सजंय अंबादास पाटील उपस्थित होते.
---------------
*जिद्द, सातत्य, काहीतरी नवीन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली म्हणून हे यश - कु. संस्कृती सतीश शेळके*
सर्वप्रथम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमध्ये महाराष्ट्रातून मला सर्वाधिक सुवर्ण पदक मिळाले आहे. त्याचे सर्व श्रेय माझे आई, वडील व CSMSS आयुर्वेद महाविद्यालयाला देईन. कारण आज मी जे काही यश मिळवलं ते यांच्यामुळे. डॉ. श्रीकांत देशमुखसर आणि टीम यांनी जी जिद्द, सातत्य, काहीतरी नवीन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली होती, खरे तर हेच माझे प्रेरणास्थान होते. त्याच्याकडून मी या गोष्टी शिकले. कोणती ही गोष्ट म्हणजे अकॅडेमिक, स्पोर्ट्स व योगा यामध्ये सर्वानी आम्हाला खूप मेहनत, सर्व तसेच मदत केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहे.
कु. संस्कृती सतीश शेळके
___________
06/05/2025
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजही दिशादर्शक- समीर मुळे
आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे संस्थेचे विश्वस्त श्री. समीर मुळे आणि सचिव श्री. पद्माकरकाका मुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं.
शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जाती अंताचा लढा यांसह कृषी-सिंचन, औद्योगिक क्षेत्रातील विकासात्मक दृष्टी त्यातून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजही दिशादर्शक आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट प्रथा, रुढी परंपरांना विरोध करून बंदी घातली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात संस्थेचे विश्वस्त श्री. समीर मुळे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, कृषी महाविद्यालय संचालक डॉ. जगदीश जहागीरदार, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. शशिकांत डीकले, मानव संसाधन व्यवस्थापक श्री. अनिल तायडे पाटील, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील, उपप्राचार्य आणि विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
_________
CSMSS Chh. Shahu College of Engineering, Aurangabad. DTE CODE- 2533
CSMS Sansthas College of Polytechnic,
Csmss College of Agriculture, Aurangabad
Ajeet Seeds