Nurturing - SELF

Call Directions Website Contact the school

Nurturing - SELF Finding Inner Self. Earth has music for those who listen. Earth is the only planet known to support human and animal life. Why am I here? Where am I going?

First step is to stop a bit, smell the flowers, and appreciate the beautiful bounty that earth has given us. We came into this world with a blank slate. Our mind was clear, yet open to the most subtle impressions. As time passed, we unknowingly let these impressions shape our perceptions of who we think we are today. We let others - a parent, spouse, boss, teacher, define who we are....

Then it happens. Aware that life will not last forever, we ask ourselves, who am I? Am I living my life on my terms? Or am I living my life as I believe others expect me to? You will never resolve your problems or life issues if you do not Know Your Self. If you would ask me what is the one thing most people in our society need, I would say fulfillment. One of the most complex human emotions and in my perspective, one of the noblest things to aim for in life. It is also something many people are far from reaching, and even far from understanding. There are lots of things to say on this topic. But let us keep it simple, in 4 steps guide finding fulfillment. Step 1: Understand what fulfillment is. As an emotion, fulfillment is something very different from pleasure or other positive emotions. Pleasure is the basic positive emotion you can feel while you are doing a certain activity, and it’s the sign you are passionate about that activity. Seeking pleasure is all good, but it is not fulfillment. Fulfillment is a more evolved psychological state, which reflects the fact that a certain activity is meaningful for you. It doesn’t mean you like it, it means that activity is aligned with your values and as a result, your mind interprets it as meaningful. It is only then that you feel fulfilled. Step 2: Know your values. If the feeling of fulfillment is a reflection of doing things which are aligned with your values, it makes sense that knowing your values well is a must in order to be truly able to find fulfillment. This is something I find that most people have a problem with, which is why they struggle with finding fulfillment. As yourself this essential question: “What is important to me?” Maybe it’s balance, learning, variation, helping others, creating, being popular or any other thing. This question is one of the best ways I know to discover your values. The key is to stick to it and to focus on the most important things. Step 3: Create your strategy. Unfortunately, once you figure out what is important to you, it’s not likely that you will be able to get it at the stroke of a finger. Things like fame, success, money or independence don’t come just like that. Oddly enough, even helping others in a meaningful way usually can’t happen just like that. You need a strategy. You need a sequence of well organized actions to go through, in order to end up aligning your life and your career with your highest values, and to keep them that way. So, gather information, think things through and develop a strategy to create the right conditions for your fulfillment. Step 4: Fill in the gaps. Sometimes, you will find it hard, almost impossible to align your life with a certain value. You may want to have balance in your life, but you keep finding demanding bosses, which constantly require of you to work overtime, leaving you little time for anything else. A situation like this is just a sign that you need to get to a new way of being, to be able to deal with this. In other words, you need to develop certain skills or attitudes. In this example, you may need to learn how to set boundaries and how to say no, then you will be able to create balance in your life. Most failure in living by your values is just a sign you need to fill in the gaps in terms of your skills and your attitudes. This guide is so far nothing but words with a form. In the end, what matters the most is putting it into practice. The fundamental lessons I’ve learned about finding fulfillment is that action and an open mind are the most important ingredients. Put this guide into action, and you will see some very cool things happen.

26/09/2026

*पितृ अष्टक*
(पितृपक्षात रोज सकाळी हे म्हणावे)

जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला
अशा नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||
इथे मान सन्मान सारा मिळाला
पुढे मार्ग तो सदा दाखविला
कृपा हीच सारी केली तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||
मिळो सद् गती मज पितरांना
विनती हीच माझी त्रिदेवतांना
कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||
जोडून कर हे विनती तयांना
अग्नि वरूण वायु आदी देवतांना
सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||
वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना
सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना
मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||
करूनी सिध्दता भोजनाची तयांना
पक्वान्ने आवडीनें बनवून नाना
सदा तृप्ती होवो जोडी करांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||
मनोभावे पुजूनी तिला, यवाने
विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने
आशिष द्याहो आम्हा सकलांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||
सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा
न्यून काही राहाता माफी कराना
गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ |।

पायातून बूटसुद्धा निघत नाहीय इतके पाय सुजलेले !! © डॉ. धनंजय देशपांडे (dd)नेहमीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक व...
26/09/2026

पायातून बूटसुद्धा निघत नाहीय
इतके पाय सुजलेले !!
© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

नेहमीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक विविध रस्त्याने जाते तशीच आमच्या टिळकरोडवरून गेली. (म्हणजे अजूनही चालूच आहे. आणि रांगेत अजून मागे इतके गणपती आहेत की कदाचित संध्याकाळ होईल संपायला !

तर दरवर्षीप्रमाणे यंदाही बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांसाठी आमच्या ऑफिसची वॉशरूम खुली केली होती आणि आता पोलिसांनाही ते माहित झालं असल्याने ते स्वतःहून त्यांच्या महिला पोलिसांना आमच्या ऑफिसकडे पाठवतात.
आता ज्यांना माहीतच नाही की हे काय आहे ? त्यांच्यासाठी सांगतो. विसर्जन मिरवणूक सुमारे तीस ते चाळीस तास चालते. आणि यासाठी पोलीस बंदोबस्त बाहेरच्या शहरातून पण मागवला जातो. मात्र त्यांना पुण्यातील तितकी माहिती नसते. विशेषतः महिला पोलिसांची "वॉशरूम" संबंधात मोठी कुचंबणा होते हे लक्षात घेऊन गेली काही वर्ष "मला जमेल तितकं मी करेल" यानुसार टिळक रोडवर अगदी फ्रण्टेजलाच ऑफिस असल्याने महिला पोलिसांसाठी ऑफिसची वॉशरूम तर ओपन करतोच पण शिवाय चहा बिस्किटे पाणी पण व्यवस्था केली जाते.

यंदा तब्येतीच्या काही कारणाने हे सगळं करावं की थांबवावं असं वाटलेलं. मात्र हे पोलिसांना माहित नव्हतं त्यामुळे त्यांनी काल; संध्याकाळी दोन तीन महिला पोलिसांना ऑफिसवर पाठवलं. त्या बिचकत बिचकत आलेल्या कारण पुण्यात नवीनच होत्या. मीही त्यांना आत यायला सांगितलं. आणि मनात म्हटलं की माझी ताकद, इच्छा असो नसो.... हि सेवा बाप्पा करून घेतोय तर ! त्यामुळे तयारीला लागलो. तिघीसाठी मस्त कॉफी तयार केली आणि म्हणालो, बसा हो थोडा वेळ ! काय फरक पडत नाही. मी सांगतो वाटलं तर तुमच्या साहेबांना.... आणि त्यांना बसवून कॉफी बिस्कीट देऊन फ्रेश केलं. त्यातल्या एक म्हणाल्या, "दादा आजकाल कोण करत हो इतकं ? गणेश मंडळाच्या लोकांना त्यांच्या कार्यकर्त्याची फक्त काळजी.... पण त्यांच्यासाठी आम्ही दोन दोन दिवस उभे...... आमच्यासाठी फारसे कुणी काही करत नाही !

आपल्या व्यवस्थेवर मार्मिक बोट त्या भगिनेने ठेवलेले. मी तरी काय बोलणार? म्हणालो की,,,,. जाऊ द्या..... अडचणीत बाप्पाच उभा असतो तुमच्यासाठी म्हटलं ! आणि मग त्यांना सोडायला खाली फुटपाथवर गेलो तर तिथं एक महिला पायातून बूट काढण्याचा प्रयत्न करत होती पण कदाचित दीड दिवस बंदोबस्तवर असल्याने पाय सुजले होते. आणि त्यामुळे बूट काढताना त्रास होत असावा. खरं सांगतो मंडळी माझ्याच डोळ्यात टचकन पाणी आलं. त्यांना जवळ जाऊन म्हणालो, ताई, वरतीच इथं माझं ऑफिस आहे. पाच मिनिट या. फ्रेश व्हा. पायाला थोडा आराम मिळू द्या ! त्याच्याशेजारी असलेला इन्स्पेक्टर बहुतेक मला ओळखत असावा. (सायबर क्राईम मध्ये काम करण्याचा फायदा) तो तिला म्हणाला, "जा मॅडम.... दहा मिनिट ब्रेक घ्या.... हे (म्हणजे मी) आपलेच आहेत.... " मग त्या मॅडम ऑफिसवर आल्या. एक पाय अनवाणी एका पायात बूट अन एका हातात बूट असं घेतलेल्या !! त्यांना आधी बसायला सांगितलं. आणि माझ्याकडे स्वेलिंग स्प्रे (सूज आली तर त्यावर तो स्प्रे मारला तर सूज थोडी कमी होते) तो स्प्रे त्यांना दिला आणि सांगितलं की दोन मिनिट स्प्रे मारा पायावर ! फरक पडेल ! त्याप्रमाणे त्यांनी केलं ! दुसराही बूट त्यांनी काढला. दोन्ही पायावर स्प्रे मारला !

तोवर माझी कॉफी तयारच होती ! त्यांना दिली. त्यावेळी त्या माऊलीच्या डोळ्यात जे काही भाव उमटले ते सांगायला शब्द नाहीत माझ्याकडे..... मी फक्त नमस्कार केला ! दुसरं काय करू शकतो? पाच मिनिटांनी त्या उठल्या आणि म्हणाल्या, "घरी गेल्यावर मुलाला तुमच्याबद्दल नक्की सांगेल" आणि शांतपणे ऑफिसवरून बाहेर निघाल्या ! त्यांनाही सोडायला खाली फुटपाथवर गेलो तेव्हा ते इन्स्पेक्टर पण तिथं होते ! त्यांच्यासाठी ऑफिसातूनच एक पाण्याची बाटली नेलेली ती दिली ! त्यांनीही थँक्स म्हणत घेतली !

एक गाणं आठवलं
हीच आमुची पार्थना
अन हेच आमुचे मागणे
माणसाने माणसांशी
माणसासम वागणे !

बास इतकं केलं तरी वेगळी पूजा अर्चा अभिषेक करण्याची गरज नसते. बाप्पा सगळं पाहत असतोच. यंदा एक जाणवलं म्हणजे "बापट इफेक्ट" नक्की झालाय. नाहीतर ऑफिसच्या खिडकीच्या काचा सुद्धा डीजे मुळे रात्रभर थरथरत असायच्या. यंदा तितक्या नाही थरथरल्या.... आवाजावर बरेच नियंत्रण दिसले. आणि अजून एक म्हणजे आमचे समाजसेवी मित्र साहिल राणा याचा कालच निरोप आला की "डीडी, ते महिला पोलिसांसाठी तुम्ही करता न ते मी पण यंदा कुमठेकर रस्त्यावर करतोय. वॉशरूमची सोय. तर कुणाला गरज लागली मला कॉल करा. मी करतो व्यवस्था सगळी !" त्याला म्हटलं अरेच्या, तुझ्या लक्षात आहे ते सगळं?
तो म्हणाला, अहो पक्के लक्षात आहे. दरवर्षी तुम्ही गेटवर बोर्ड लावता ते पण माहित आहे आणि गेल्यावर्षी कुणीतरी हुल्लड मुलाने बोर्ड फाडून टाकला होता त्यावर तुम्ही पोस्ट केलेली, ते पण माहित आहे !

मी चकित !! मनात म्हटलं, पेरत राहावं..... कुठं तरी उगवत राहत असे माझे वडील सांगायचे ते खरं आहे तर ! टिळकरोडचा आमचा हा उपक्रम पाहून दोन वर्ष झाली सुभाषनगर (अभिनव कॉलेज चौक) येथील विनायक धारणे यांचे मंडळ तिथेही महिलांसाठी वॉशरूम सोय करत आहे. आणि आता यंदा कुमठेकर रोड पण सहभागी झाला ! बास.... जीने को और चाहिये? माझीच एक जुनी पोस्ट आठवली !! ते उभे आहेत वर्दीत..... म्हणून आपले सण साजरे होतात गर्दीत ! बाप्पा मोरया !! पुढच्या वर्षी नक्की या !
(फोटो सोर्स : जेमिनी एआय)

25/09/2026

इंदौर के एक घरके अंदर गणेशजीकी स्थापना कितनी बढ़िया तरिकेसे करी है देखिये.

नेपाळच्या तथाकथित पुरानंतर सापडलेले अवशेष थक्क करणारे आहेत....
24/09/2026

नेपाळच्या तथाकथित पुरानंतर सापडलेले अवशेष थक्क करणारे आहेत....

Something Was Found in Flooded Nepal That Could Not Have Been There...

23/09/2026
20/09/2026

ती आजारी पडली तर घर कोण सांभाळणार?

काल Facebook वर एका Oncologist ची Reel पाहिली. तो म्हणाला, Cancer Doctor म्हणून त्याला ऐकायला मिळणाऱ्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे—“हिची Treatment सुरू केली तर घरात Cooking आणि Cleaning कोण करणार?” पहिल्यांदा ऐकल्यावर मलाही काही क्षण वाटलं, खरंच कोणी Cancer सारख्या आजाराच्या वेळी असा विचार करू शकतं? पण मुद्दाम Comment Section उघडलं आणि तिथे अनेक स्त्रियांनी लिहिलेले अनुभव वाचले. विषय फक्त Cancer चा नव्हता. स्त्रीच्या आजारपणाला कमी Seriously घेणं, Treatment सुरू असतानाही तिने घरात पूर्वीसारखंच Functional राहावं अशी अपेक्षा करणं—असे अनेक अनुभव होते. एका Orthopedic Doctor ने लिहिलं होतं की एका महिलेला Fracture मुळे Surgery आवश्यक होती. महिनाभर तिला Rest लागेल हे तिच्या नवऱ्याला आणि तरुण मुलाला सांगितल्यावर त्यांचा पहिला प्रश्न होता, “मग घरात Cooking आणि Cleaning कोण करणार?” वैतागून डॉक्टरांनी उत्तर दिलं—“तुम्ही करणार.” ते वाचताना माझ्या मनात सहज विचार आला—बहुतेक त्या मुलाचं अजून लग्न झालेलं नसावं. नाहीतर कदाचित हा प्रश्नच पडला नसता; आईची जागा घेण्यासाठी घरात दुसरी स्त्री उपलब्ध असती!

माझा नवरा जवळपास अठरा वर्षं Oncology Department मध्ये Sales चं काम करतो. अनेक वर्षांपूर्वी त्याने Patients च्या बाबतीत पाहिलेली एक गोष्ट मला सांगितली होती आणि ती तेव्हाही मला खूप अस्वस्थ करून गेली होती. घरातल्या कर्त्या पुरुषाला Cancer झाला तर अनेक कुटुंबं अक्षरशः हादरून जातात. त्याची पत्नी त्याच्या Treatment पासून शेवटच्या कठीण काळापर्यंत त्याच्या सोबत उभी राहिलेली त्याने अनेकदा पाहिली. पण काही कुटुंबांमध्ये हीच वेळ घरातील, विशेषतः आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या स्त्रीवर आली की Treatment च्या खर्चाकडे पाहण्याची पद्धत बदललेली त्याला जाणवली—“शक्यतो कमी खर्चाचा पर्याय सांगा” हा आग्रह अधिक दिसायचा. अर्थात प्रत्येक कुटुंब असंच वागतं असं अजिबात नाही आणि आर्थिक अडचणीसुद्धा खऱ्या असतात. पण प्रश्न असा आहे की घरातील स्त्री आजारी पडली की तिच्या वेदनेबरोबरच लगेच तिच्या जागी घरकाम कोण करणार आणि तिच्यावर किती खर्च होणार, हा हिशोब का सुरू होतो? तिची किंमत नकळत तिच्या Cooking, Cleaning आणि घर चालवण्याच्या क्षमतेशी इतकी जोडली गेली आहे का?

गेली पाच वर्षं Nutritionist म्हणून काम करताना विशेषतः Forty Plus महिलांमध्ये याची दुसरी बाजू मी स्वतः पाहिली आहे. कमावती स्त्री निदान काही प्रमाणात स्वतःच्या Health ला Seriously घेते. स्वतःचे पैसे असल्यामुळे Consultation, Tests, Diet किंवा योग्य Treatment वर खर्च करण्याचा निर्णय ती स्वतः घेऊ शकते. पण आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून असलेल्या अनेक स्त्रियांमध्ये एक वेगळीच भीती दिसते—“डॉक्टरकडे गेले आणि काही निघालं तर माझ्यावर खर्च होईल”, “मला Rest सांगितला तर घरी कोण करेल?”, “माझ्यामुळे सगळ्यांना त्रास नको.” म्हणून काही जणी डॉक्टरकडे जाणं पुढे ढकलतात किंवा आधी फक्त Diet ने प्रश्न सुटतो का हे पाहण्याचा प्रयत्न करतात. Diet अनेक आजारांमध्ये महत्त्वाचा असतो, पण जिथे Medical Treatment आवश्यक आहे तिथे तो Treatment चा पर्याय नाही. मला यात फक्त कुटुंबाची मानसिकता दिसत नाही; वर्षानुवर्षं स्त्रीच्या मनात रुजवलेली एक भावना दिसते—मी कमवत नसेन, तर निदान घर व्यवस्थित चालवणं ही माझी किंमत आहे. माझ्या आजारामुळे घर थांबता कामा नये. आणि हेच सगळ्यात दुःखद आहे.

आपण या मानसिकतेला इतकं Normal केलं होतं की काही वर्षांपूर्वी एखादा पुरुष अगदी सहज म्हणायचा, “आईचं आता वय झालंय, तिला काम जमत नाही म्हणून लग्न करायचं आहे.” आणि त्यात कुणालाच विशेष वावगं वाटायचं नाही. आईसुद्धा म्हणायची, “मी किती वर्षं करणार? आता सून आण.” म्हणजे एका स्त्रीची घरकाम करण्याची Capacity कमी झाली की तिच्या जागी दुसरी स्त्री आणणं ही जणू व्यवस्था होती. सुदैवाने आजच्या अनेक तरुण पुरुषांमध्ये ही मानसिकता बदलताना दिसते. Partner म्हणजे घरात आणलेली कामवाली नाही, ती स्वतंत्र व्यक्ती आहे; घर दोघांचं आहे आणि त्याची जबाबदारीही दोघांची आहे—हा विचार वाढतोय. पण हा बदल फक्त पुरुषांमध्ये होऊन पुरेसा नाही. आपण स्त्रियांनीही स्वतःला हे शिकवायला हवं की Rest घेण्यासाठी, डॉक्टरकडे जाण्यासाठी किंवा स्वतःवर पैसे खर्च करण्यासाठी आपल्याला अपराधी वाटण्याची गरज नाही. घरातली कामं काही दिवस थांबू शकतात, दुसरा कोणी करू शकतो, बाहेरून मदत घेता येऊ शकते. पण दुर्लक्ष केलेलं Health प्रत्येक वेळी नंतर भरून काढता येईलच असं नाही.

म्हणून हा लेख पुरुषांसाठी जितका आहे तितकाच स्त्रियांसाठीही आहे. घरातली स्त्री आजारी पडली तर पहिला प्रश्न “आता स्वयंपाक कोण करणार?” हा नसावा; पहिला प्रश्न “तुला बरं होण्यासाठी आपण काय करू शकतो?” हा असावा. आणि स्त्रियांनीही स्वतःच्या मनातला “माझ्यामुळे घराला त्रास नको” हा अपराधभाव ओळखायला हवा. तुम्ही आई असाल, पत्नी असाल, सून असाल किंवा गृहिणी असाल—तुमची किंमत तुम्ही दिवसातून किती पोळ्या करता, घर किती स्वच्छ ठेवता किंवा आजारी असूनही किती काम करता यावर ठरत नाही. तुम्ही घर चालवणारी एक व्यवस्था नाही, तुम्ही त्या घरातली एक माणूस आहात. आणि घरातल्या प्रत्येक दुसऱ्या माणसाइतकाच चांगल्या Treatment वर, Rest वर, पैशांवर आणि काळजीवर तुमचाही हक्क आहे. कधीतरी घर तुमच्याशिवायही चालायला शिकू द्या—कारण तुम्ही आजारी असताना घर चालू ठेवण्यापेक्षा, तुम्ही बऱ्या होणं जास्त महत्त्वाचं आहे.

Dipti Mestry-kabade
Certified Nutritionist, Clinical Nutritionist, Sports Nutritionist and fitness trainer

For enquiry WhatsApp On
9930577669

Or simply click on the link below
https://wa.me/message/VDTIIQLWRZALB1

For Google reviews please search "Goodwill Health Sciences"

20/09/2026

*मृत्युवर विजय*

कुठल्याही कलेचं सादरीकरण, जे फक्त भाव जागृतीच्या पातळीवरुन पुढे विचार करायला प्रवृत्त करतं ते यशस्वी म्हणावं असं माझं वैयक्तिक मत.

१९२१ मधील ‘The Victory of Death‘ हे Owe Zerge या स्विडीश कलाकाराचं चित्र, पाश्चात्य तत्वज्ञानाच्या दृष्टीने कदाचित योग्य चितारलेले असलं तरी ते मला माझ्यावर झालेल्या संस्कारा नुसार वेगळ्या तऱ्हेने कसं दिसलं ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न. चित्राच्या तांत्रिक अंगावर लिहिणं ही आमची योग्यता नाही. तर...
मृत्यू या अटळ सत्यावर वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून भाष्य केलं गेलं आहे त्यापैकी हे एक. हे चित्र मला आत्म्याच्या वेगवेगळ्या योनीतील प्रवासातला एक क्षण वाटतं. चित्राच्या नावा नुसार 'मृत्यूचा विजय' जरी असला तरी ते अंतिम सत्य नाही.
आपलं तत्वज्ञान ८४ लक्ष योनींचा उल्लेख करतं. त्यामुळे आपल्याकडे RIP नाही. आपण एखाद्याचा खेळ संपल्यावर 'आत्म्यास सद्गती लाभो' अशी भावना व्यक्त करतो. परमात्म्याने त्याचाच अंश रुप आपल्याला त्यानेच लिहिलेल्या नाटकात वेगवेगळ्या भूमिका करायला पाठवलं आहे. भूमिका उत्तम निभावली तर पुढच्या नाटकात श्रेष्ठ भूमिका आणि या नाटकात माती खाल्ली तर पुढे दुय्यम भूमिका. जन्म-मरणाचा हा फेरा मनुष्य जन्मातच सुटू शकतो हे आपल्याला साधूसंतांनी अनुभवाने सांगितले आहे. मनुष्य जन्माच्या पटावर उत्तम कर्मांची खेळी करत आपण आपल्या डावातील प्रगतीचा आलेख उंचावत नेणं हेच आपलं इति कर्तव्य.

Owe Zerge आपल्या कडचा असता आणि त्याच्या या चित्राची जर चित्रमालिका असती तर उजवीकडे दाखवल्याप्रमाणे खेळाचा शेवट व त्याची निसटत जाणारी वेळ हे दोन्ही कायम रहाणार आणि डावीकडील पात्राची नग्न रुपं मात्र बदलणार. अंतिम चित्र मात्र 'मृत्युवर विजय' या आशावादावर, काळावर मात करुन आत्मस्वरूप परमात्म्यात विलीन झाले असे दाखवले असते.

✍️ श्री प्रसाद बाळकृष्ण मालखेडकर
२० सप्टेंबर २०२६

जगदंब जगदंब....नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते ।शङ्ख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥*महालक्षुम्या आल्या ,...
18/09/2026

जगदंब जगदंब....

नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते ।
शङ्ख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥

*महालक्षुम्या आल्या , टेन्शन नका घेऊ !*

*कवी : प्रा.विजय पोहनेरकर*
---------------------------------
महालक्षुम्या आल्या ,
महालक्षुम्या आल्या
घाबरून नका जाऊ
जेवढं होईल तेवढंच करा
टेन्शन नका घेऊ

काळाप्रमाणे काही गोष्टीत
बदल केले पाहिजे
सोळा भाज्या सोळा चटण्या
कमी केले पाहिजे

एवढेच लाडू तेवढ्या करंज्या
तरकटी नको बाई
काही धरायचं काही सोडायचं
काही होत नाही

( पूर्वीच्या काळी ......)

एकत्र कुटुंब माणसं भरपूर
अन्न खाल्ल्या जायचं
थोडं जास्त झालं तरी
वाया नाही जायचं

गडी माणसं पाहुणे रावळे
चढाओढीने खायचे
Acidity , पोटात गुडगुड
काही नाही व्हायचे

आता काळ बदलला आहे
घरोघरी माणसं चार
माऊल्यांनो खरंच जास्त
होऊ नका तुम्ही बेजार

भला मोठा स्वयंपाक करून
फेकून देऊ नका
अन्न पूर्ण ब्रह्म आहे
कधीच विसरू नका

सण करणं श्रद्धा असणं
हा भाग महत्वाचा
लक्षुम्यांनाही नवैद्य चालतो
फक्त भाजी भाकरीचा

जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास
गौरी-गणपती येत नाहीत
थोडं कमीजास्त झालं तरी
कुणावरही कोपत नाहीत

तुमच्यावर राग राग करायला
देव थोडाच माणूस आहे
महालक्ष्मी असो गणपती असो
फक्त भक्तीचा भुकेला आहे

ऐपतीप्रमाणेच सगळं करा
रिन काढून नको सण
नको लायटिंग नको माळा
फक्त हवे शुद्ध मन

सगळ्यांनी सामील होणं
हे महत्वाचं असतं
खरंच ताण घेऊ नका
काही कामाचं नसतं

आमच्याकडे असं असतं
अन त्यांच्याकडे तसं
ताण न घेता काम करावं
जसं जमेल तसं

गाठीभेटी गप्पागोष्टी
सणासुदीला अपेक्षित असतात
प्रेम आपुलकी वाढण्यासाठीच
दसरा दिवाळी लक्षुम्या असतात

मंत्र जोर जोरात म्हणायचे
अन सासुशी करायची कट्टी
असं वागल्यावर कशी होईल
महालक्षुम्याशी गट्टी?

राग अहंकार चांगला नसतो
गोडीगुलाबीने वागलं पाहिजे
फटकळ बोलणं सोडून देऊन
घालीन लोटांगण म्हणलं पाहिजे

Address

40, Sahyadri Hills, Shivajinagar Road
Aurangabad
431009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nurturing - SELF posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Nurturing - SELF:

Shortcuts

Share