10/12/2025
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री.स.भु.बिडकीनची कल्याणी नरवडे तृतीय
बिडकीन ( प्रतिनिधी) कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे दिनांक ८ व ९ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पन्नास किलो वजन गटात श्री.सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन येथील विद्यार्थीनी कल्याणी नरवडे हिने अतिशय चमकदार व नेत्रदीपक कामगिरी करीत तृतीय क्रमांक पटकावून कांस्यपदक विजेती ठरली आहे. कल्याणी रमेश नरवडे हिला प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख मोहम्मद आसिफ शेख, अनिल कांबळे, राहुल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी संघव्यवस्थापिका म्हणून हेमा मिरजकर या तिच्या सोबत होत्या. या घवघवीत व उल्लेखनीय यशाबद्दल कल्याणी नरवडे हिचे व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री .सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य तथा बिडकीन बालानगर समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ मिलिंद कोनार्डे, शालेय समितीचे अध्यक्ष किसनलाल तोतला मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले उपमुख्याध्यापिका मनिषा मिश्रा शालेय समितीचे सर्व सन्माननीय सदस्य प्रभारी पर्यवेक्षक महेश बहाळकर, राजू शिंदे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर सहकारी यांनी अभिनंदन केले आहे
24/11/2025
*श्री स.भु. शिक्षण संस्थेतर्फे श्री संजय दौंडे यांचा सत्कार व मायेची सावली उपक्रमांतर्गत सायकल वाटप*
*बिडकीन, दि. २२ नोव्हेंबर २०२५.*
श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिनेश वकील, सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, सहचिटणीस उल्हास शिऊरकर, सदस्य ॲड. रामेश्वर तोतला शाखा समन्वयक डॉ. मिलिंद कोनार्डे व सरपंच अशोक धर्मे आदी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक व शैक्षणिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे, गोरगरिबांना विविध माध्यमातून मदत करणारे तसेच श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिडकीनच्या शैक्षणिक व भौतिक विकासाच्या ध्यासाने झपाटलेले दानशूर उद्योजक, समाजसेवक श्री संजय दौंडे यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला, त्यासोबतच श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे संस्थेत शिक्षण घेणाऱ्या गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या "मायेची सावली" उपक्रमांतर्गत बिडकीन शाखेतील बाहेर गावाहून येणाऱ्या ३० विद्यार्थीनींना यंदा सायकल वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष ॲड दिनेश वकील व सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे यांनी बिडकीन येथे झपाट्याने विकसित होणाऱ्या डी.एम.आय.सी. मुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या अनेक संधींचे सोनं विद्यार्थ्यांना करता यावे या दृष्टीने आपल्याकडे सी.बी.एस.ई. पॅटर्न आधुनिक इंग्रजी माध्यमाची शाळा, पॉलिटेक्निक कॉलेज तसेच कृषी आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच सर्व सोयी सुविधांनी युक्त नवीन शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी नियोजन व प्रयत्न सुरू करण्याचे आवाहन बिडकीनची शालेय समिती, सरपंच अशोक धर्मे, प्रतिष्ठित नागरिक व उपस्थित पालकांना केले तसेच तुमच्या भविष्यकालीन विकासात्मक योजनांना संस्था सदैव पाठबळ देईल असे आश्वासन देखील दिले.
याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष किसनशेठ तोतला, सदस्य नंदकुमार वैद्य, डॉ अंताराम धरपळे, मच्छिंद्र हाडे, बबनराव ठाणगे, किशोर कुलकर्णी, जगन्नाथ आर्वीकर, मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले, प्रभारी पर्यवेक्षक महेश बहाळकर व राजू शिंदे तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले यांनी तर सूत्रसंचालन सुनील लोंढे यांनी केले. सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर सहकार्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
20/08/2025
श्री स.भु. प्रशाला बिडकीन एन सी सी विद्यार्थ्यांचे फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह अभियान
बिडकीन ( प्रतिनिधी ) पैठण तालुक्यातील श्री.सरस्वती भुवन प्रशाला, बिडकीन एनसीसी विभागामार्फत फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह अभियानाचे डी एम आय सी बिडकीन येथे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात प्रशालेतील 92 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तिरंगा दौड चे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत मुलांमधून सर्वप्रथम सय्यद इमरान मुनीर. सर्वद्वितीय गिऱ्हे अभिजीत संतोष. सर्व तृतीय टक्केकर हर्षद मंगेश. मुलीमधून सर्वप्रथम जाधव खुशी गणेश. सर्व द्वितीय कोथिंबीर धनश्री सुरेश. सर्व तृतीय धर्मे पुष्पा कडूबाळ.विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जागृती व्हावी व व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सायकलींग चा व्यायाम हा सर्वोत्तम मानला जातो. सायकलींगमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमितपणे सायकलिंग व रनिंग करावी असे एनसीसी ऑफिसर बाबासाहेब सोकटकर यांनी सांगितले . याप्रसंगी श्री धीरज पराय हे
उपस्थित होते.
या अभिनव उपक्रमाचे आयोजन केल्यबद्दल एन सी सी विभाग व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या नियामक सदस्य तथा समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कोनार्डे , शालेय समितीचे अध्यक्ष श्री किसनलाल तोतला, जेष्ठ सदस्य श्री नंदकुमार वैद्य, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री धर्मेंद्र येवले, उप मुख्याध्यापक श्री पाडळे युवराज, पर्यवेक्षिका श्रीमती मनीषा मिश्रा, प्रभारी पर्यवेक्षक श्री राजू शिंदे यांनी अभिनंदन केले.
20/08/2025
*बिडकिनच्या श्री स. भु. विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
*बिडकीन, १५ ऑगस्ट २०२५*
श्री सरस्वती भुवन विद्यालय बिडकीन येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट रोजी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सदस्य तसेच शाखा समन्वयक डॉ मिलिंद कोनार्डे, १४ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले तसेच आज १५ ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्यदिनी शालेय समितीचे अध्यक्ष किसनशेठ तोतला यांच्या हस्ते एन. सी. सी. प्रमुख बाबासाहेब सोकटकर व कॅसेट्स यांच्या संचलनात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य नंदकुमार वैद्य, किशोर कुलकर्णी, बिडकीनचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक तसेच आजी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख मालती बिरारे व संगीत शिक्षिका संध्या शिंदे यांच्या संगीत पथकाने सुमधुर आवाजात पसायदान तसेच विविध देशभक्तीपर गीते सादर करत वातावरण निर्मिती करुन विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. पावसाचा जोर कायम असतांना देखील विद्यार्थ्यांच्या आग्रहाने भर पावसात क्रीडा शिक्षक आसिफ शेख, अनिल कांबळे व राहूल शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर लयबध्द कवायती तसेच उत्कृष्ट लेझीम नृत्यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचा शेवट गोड करण्यासाठी शालेय पोषण आहार विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त एक पेड स. भु. के नाम उपक्रमांतर्गत विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या प्रांगणात विविध स्थानिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले, उपमुख्याध्यापक युवराज पाडळे, पर्यवेक्षिका मनिषा मिश्रा, प्रभारी पर्यवेक्षक राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनात विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकार्यांनी प्रयत्न केले.
09/03/2025
जागतिक विकासात महिलांचे योगदान मोठे... प्रा.सुदाम चिंचाणे
बिडकीन ( प्रतिनिधी) समाजात सर्व हाल अपेष्टा सोसून आजही पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते.आजही समाजात स्त्री पुरुष समानता ख-या अर्थाने पाळली जात नाही, परंतु जागतिक विकासात महिलांचे योगदान मोठे आहे हे आपण सोयीस्करपणे विसरलो आहोत, तेव्हा घरी दारी आपण स्त्रीचा सन्मान करायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन प्रा.सुदाम चिंचाणे यांनी केले. पैठण तालुक्यातील श्री.सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन येथे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या पर्यवेक्षिका मनिषा मिश्रा, प्रमुख वक्ते प्रा सुदाम चिंचाणे प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी पर्यवेक्षक राजू शिंदे, ज्ञानेश्वर चाटुपळे, सुरेखा जैन व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे राजू शिंदे यांनी स्त्री वरील अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. समाजातील आज मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस घटत आहे.ही बाब निश्चितच भविष्यात धोक्याची घंटा आहे. आज स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, सर्व क्षेत्रात तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे असे सांगितले. सुरेखा जैन यांनीही स्त्री कर्तुत्वावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोपात पर्यवेक्षिका मनिषा मिश्रा यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिला ही कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. समाजात आजही महिलांना सन्मानाने वागवले जात नाही याबद्दल खेद व्यक्त केला. यावेळी प्रशालेचे वतीने प्रशालेतील सर्व महिला यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मसिरा कुरेशी, काव्यांजली जाधव, आराधना सोकटकर, भाग्यश्री शिंदे या विद्यार्थीनींनी महिला दिनाच्या निमित्ताने अभ्यासपूर्ण भाषणे केली.सोनू राठोड मी सावित्री बोलतेय, काव्यांजली जाधव शिक्षिका , राधिका गरड पायलट, माधवी चव्हाण डॉक्टर,भक्ती गायकवाड वैज्ञानिक, समृद्धी गरड इंजिनिअर, समृद्धी हरीहर वकील, आराधना सोकटकर कल्पना चावला, आनंदी धाडगे सिए, प्रेक्षा नेहते पोलिस आयुक्त या विविध भूमिका सादर केल्या यांनंतर " सावित्रीच्या लेकी आम्ही, कोणत्याही क्षेत्रात नाही कमी....तरी का मारतात तुम्ही....ही नाटीका सादर करुन भ्रूणहत्या,बेटी बचाव चा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गितांजली केणेकर व प्रांजल चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन राधिका गरड यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोभा कुलकर्णी, सुजाता तोष्णीवाल, जयश्री महाजन, वैशाली लोंढे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले
15/01/2025
*स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे श्री स भु प्रशालेस तृतीय पुरस्कार*
बिडकीन दिनांक 10 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळावा कै. वसंतराव नाईक मा. व उच्च मा. आश्रम शाळा, तेलवाडी- केंद्र -तालुका कन्नड, जिल्हा- छत्रपती संभाजी नगर या स्थळी झाला
हया मेळावा मध्ये स्काऊटर व गाईड यांच्या सुप्त गुणांना
वाव मिळावा म्हणून विभागामार्फत स्पर्धा राबविण्यात येतात जशी शोभायात्रा ,तंबू सजावट ,लोक नृत्य इत्यादी स्पर्धा घेण्यात येतात. श्री स भु प्रशाला, बिडकीन या शाळेस शोभायात्रा स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले व श्रीमती जैन मॅडम यांना व्यवस्थापन कमिटी मध्ये चांगले काम केल्याबद्दल स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळाले .
यावेळी शाळेचे माननीय श्री मुख्याध्यापक येवले सर व उपमुख्याध्यापक श्री पाडळे सर व पर्यवेक्षिका श्रीमती मिश्रा मॅडम यांनी स्काऊट गाईडरचे व स्काऊट गाईड विभागाच्या प्रमुख श्रीमती जैन मॅडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
14/01/2025
मुख्यमंत्री माझी शाळा... सुंदर शाळा स्पर्धेत श्री.सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन पैठण तालुक्यातून सर्व प्रथम