Profe Akshay Nyayadhish

Profe Akshay Nyayadhish

Share

संचालक | ज्ञानेश्वरी गुरुकुल | प्राचार्य ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विद्यान कनिष्ठ महाविद्यालय

03/12/2025

यशवंतराव होळकर बहादूर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र वंदन!

मराठा साम्राज्यातील धैर्य, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रनिष्ठेचा सर्वोच्च उदाहरण म्हणजे श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर.
ब्रिटिश साम्राज्याची ताकद वाढत असताना, इंग्रजांना पराभूत करून दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचा हक्क प्रस्थापित करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे एकमेव मराठा सेनानी म्हणजे यशवंतराव होळकर.

विनम्र अभिवादन

Photos from Profe Akshay Nyayadhish's post 29/11/2025

पाठीवर पडली कौतुकाची थाप

कान्व ब्राम्हण समाज, छत्रपती संभाजीनगर वतीने " कान्व उद्योगरत्न गौरव पुरस्कार " मला जाहीर झाला. याचे विशेष आमंत्रण देण्यासाठी आणि पुरस्कार निवड पत्रक घेऊन स्वतः शिष्टमंडळ ज्ञानेश्वरी गुरुकुल, गणोरी येथे आले.

असं म्हणतात कि समाजाची कौतुकाची थाप आणि शासनाची साथ दोन्ही एक नाण्याच्या दोन बाजू असतात. आज याची अनुभूती मला मिळाली. कान्व ब्राम्हण समाजाच्या वतीने जाहीर झालेला पुरस्कार माज्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
यावेळी निमंत्रण आणि नियुक्तीपत्र देताना अध्यक्ष आदरणीय श्री सी ए लक्ष्मीकांत जयपूरकर, उपाध्यक्ष श्री उदय मानवतकर, सचिव श्री धीरज देशपांडे, संयोजक श्री प्रवीण शिरोडकर व आदरणीय बाबा उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, यावेळची काही क्षणचित्र.

कान्व ब्राम्हण समाज, छत्रपती संभाजीनगर यांचे मनःपूर्वक आभार..

Photos from Profe Akshay Nyayadhish's post 18/11/2025

श्री कैलासजी दातखीळ - विभागीय शिक्षण उप संचालक, छत्रपती संभाजीनगर : सदिच्छा भेट

नव्याने नव्यावे विभागीय शिक्षण उपसंचालक पदी श्री कैलासजी दारखीळ साहेब यांची छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती झाली. यानिमित्ताने मेसा संघटनेच्या प्रदेश कार्यकारणी शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेऊन त्यांना पदभार स्वीकारल्याबद्दल मी ( जिल्हा सचिव, मेसा संघटना छत्रपती संभाजीनगर )वतीने शुभेच्छा दिल्या.

छत्रपती संभाजीनगर जिल्यातील विविध स्तरावरील शैक्षणिक तसेच इंग्लिश स्कुल शाळेच्या विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री प्रवीण आव्हाळे ( प्रदेश अध्यक्ष- मेसा ) श्री नागेश जोशी ( प्रदेश उपाध्यक्ष, मेसा संघटना ) श्री संदीप लगामे पाटील ( प्रदेश सचिव, मेसा संघटना ) श्री सुनील मगर ( जिल्हा अध्यक्ष, मेसा संघटना ) आदी मान्यवर उपस्थित होते.

18/10/2025

शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय, दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥
धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा!

धनत्रयोदशीचा हा पवित्र दिवस आपल्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद्धीची नवी प्रभा घेऊन येवो. माता लक्ष्मी व धन्वंतरीच्या कृपेने आपल्या घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदो !

या शुभ मुहूर्तावर नवीन ऊर्जा, सकारात्मकता आणि यशाची ज्योत आपल्या आयुष्यात कायम तेजोमय राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना !

14/10/2025

संताचिये पायी हा माझा विश्वास । सर्वभावे दास झालो त्यांचा ।।१।।
तेचि माझे हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ।।२।।
भागलिया मज वाहातील कडे । त्यांचियानें जोडे सर्वसुख ।।३।।
तुका म्हणे शेष घेईल आवडी । वचन न मोडी बोलिले ते ।।४।।

ह भ प गुरुवर्य श्री संदीपान महाराज शिंदे हासेगावकर, अध्यक्ष - जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ( देवाची आळंदी )
किनगाव येथील अखंड हरिणाम सप्ताह सातव्या दिवशीची कीर्तन सेवा.
ज्ञानाचा अथांग सागराच्या पायी साष्टांग नमन..

Photos from Profe Akshay Nyayadhish's post 12/10/2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी उत्सव - आळंद ता फुलंब्री

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी उत्सव व पतसंंचालन आज फुलंब्री तालुक्याचे आळंद येथे संपन्न झाले. या पतसंचलनात मला सहभागी होऊन भारत मातेची सेवा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी उत्सवात स्वयंसेवक होऊन सहभागी होण्याचे सौभाग्य लागले..

जय श्रीराम ||

09/10/2025

आदरणीय श्री डॉ बी बी चव्हाण साहेब ( शिक्षण उप-संचालक ) महाराष्ट्र शासन

आदरणीय साहेब प्रगल्भ बुद्धिमत्ता अचाट मेहनत आणि निसीम शिक्षण क्षेत्राविषयी असलेली निष्टा या आणि अश्या असंख्य अश्या बहुआयामी गुण कौशल्यानी सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व आम्हास कायमच प्रेरित करत असते.
आपल्या हातून अशीच शिक्षण सेवा अविरत घडत राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना ...

आदरणीय साहेब आपणास पुन्हश्य् एकदा अभिष्टचिंतन दिनाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा ...!

Photos from Profe Akshay Nyayadhish's post 08/10/2025

आशियायी क्रीडा स्पर्धेतील खेळाडूचा सन्मान

ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, गणोरी येथील वर्ग ११ वी विद्यार्थी चि . प्रणम्य राजेंद्र जोशी याचा आज आमदार सौ अनुराधाताई चव्हाण व श्री अतुल काका चव्हाण ( मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग , छत्रपती संभाजीनगर ) यांच्या हस्ते करण्यात आला .

नुकत्याच झालेल्या चीन येथील होंग कोंग येथे पार पडलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता म्हणून निवड झाली . या सोबतच निक्त्याच झालेल्या अंतर शालेय क्रीडा प्रकारात राज्य स्तरावर पत्र ठरला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय SAI ( SPORT AUTHORTY OF INDAI ) येथून प्रशिक्षित खेळाडू म्हणून स्वतंत्र्य ओळख.

यावेळी श्री सचिन घुले ( संचालक , संत रामलाल बाबा गेंदाई शिक्षण प्रसारक मंडळ , गणोरी ) सौ सीमाताई उबाळे ( शालेय समिती अध्यक्ष – ज्ञानेश्वरी गुरुकुल , ) पालक श्री राजेंद्र जोशी , श्री राजू भाऊ उबाळे , प्राचार्य प्रा अक्षय न्यायाधिश आदी मान्यवर उपस्थित होते .

17/08/2025

आदरणीय नाना – अभिष्टचिंतन

प्रभू श्री रामाप्रती असलेली विचार – संस्कार आणि श्री राम वाचनाची अनुभूती सदैव आपल्यात आम्हाला कायम दर्शन देत असते. श्री कृष्णाचे चातुर्य आणि भारतीय संविधान आणि प्रशासन यां प्रती असलेली विद्वत्ता याची कायमच प्रचीती आपल्यात अनुभवयास मिळते . शिव-छत्रपती महाराज यांची असलेल्या स्वराज्याची आणि रयतेच्या काल्याणासाठीची स्वंयम प्रेरणा नेहमीच आपल्या सामाजिक आणि धार्मिक कार्यातून आम्हाला दिसत असते.

आपले कार्य इथेच थांबत नाही तर आमच्या सारख्या तरुण वर्गाला उद्याचे भविष्य म्हणून वेळो वेळी आपले मार्गदर्शन आणि आपल्या जीवन वस्तुपाठातून कायमच देश सेवा राष्ट्र भक्ती याचे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद यांसारखी उत्तुंग व्यक्तिमत्व देखील आपल्या मधून आम्हाला दिसत असते आणि म्हणूनच आमच्यासाठी कायमच आपण ऋषितुल्य आहात.

म्हणूनच राष्ट्र्भक्ती, विचारनिष्टा आणि प्रामाणिक देश सेवेची सामाजिक बांधिलकीची असलेल्या या आणि अश्या कित्तेक नीतिमूल्यांचा आज आपल्याठाई असलेला अभिष्टचिंतन सोहळा.

म्हणूनच पुनश्य एकदा आपणास अभिष्टचिंतन दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा...!

आपलाच
प्रा अक्षय विजया विलासराव न्यायाधिश

17/06/2025
Photos from Profe Akshay Nyayadhish's post 14/06/2025

कु. जान्हवी रुपाली अजय देवघरे
विद्यार्थिनी : वर्ग १२ वी ( विज्ञान ) : सन २०२४-२५

मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन ...!

नुकत्याच जाहीर झालेल्या NEET – 2025 ( वैद्यकीय पात्रता परीक्षा : २०२५ ) साठी ७२० गुणापैकी ५११ गुण प्राप्त करून विद्य्कीय सेवेसाठी अर्थात MBBS प्रवेशासाठी पात्र ठरत आहे. आई-वडिलांनी बघितलेले स्वप्न त्या सोबतच त्यांचे असलेले शुभ-आशीर्वाद आणि तुझी प्रामाणिक कष्ट करण्याची जिद्द यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे .

तुझ्या मुळेच आज आपल्या ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ट महाविद्यालयाची पहिली MBBS विद्यार्थिनी होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. या साठी तुझे पुनश्य एकदा हार्दिक अभिनंदन ....!

पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...!

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


At Post Ganori Tq Phulambri Aurangabad
Aurangabad
431108