10/03/2024
स्मृतीसंगम (दिवस दुसरा)
सामाजिक कार्य महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय के सामाजिक कार्य महाविद्यालय के छात्राओंके लिये इस पेज का निर्माण किया गया है। इस पेज उद्देश यह है की, पूर विश्व मे जहॉं कही भी इस महाविद्यालय के विद्यार्थी हो वह इस पेज से जूडकर एकदूसरेसे संपर्क तथा वार्तालाप कर सके, अपने अनुभव बता सके.
10/03/2024
स्मृतीसंगम (दिवस दुसरा)
10/03/2024
स्मृतीसंगम (दिवस पहिला)
स्मृतीसंगम 2024 पत्रकार परिषद
प्रा.धनंजय कांबळे सर, आपल्या महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा माजी विद्यार्थी बॅच 1982
स्मृतीसंगम २०२४
*स्मृतीसंगम 2024 थीम सॉंग*
स्मृती संगम. हा हा ..स्मृती संगम||
मित्रगण सारे आनंदूनी
जगू साऱ्या आठवणी
पाहू ओळखीचे भेटते कुणी
दृश्य किती हे विहंगम.
||स्मृती संगम ,स्मृती संगम ||१
आठवू ती दुनियादारी
डब्यामधली ती भागीदारी
अर्ध्या अर्ध्या कपातली यारी
विसरूनी सारा गम..
स्मृती संगम ,स्मृती संगम ||.२||
पाहू आहेत का साजुक चेहरे
तसेच आहेत का नाजूक चेहरे
किती साळसूद अन् किती खरे
कळेल मग कशात बसलाय जम
||स्मृती संगम ,स्मृती संगम. ३||
निसटलेला क्षण वेचून
गतकाळला आणू खेचून
स्मृति पटलावर ठेवू रचून
ना कुणी इथे आम्हासम..
||स्मृती संगम ,स्मृती संगम.४||
विसरले का ते रुसवे फुगवे
बोलण्याचे ते बहाणे नवे
अद्भुत अनुभव सांगू मनोभावे
चला आनंद घेऊ त्या दिवसां सम
||स्मृती संगम ,स्मृती संगम.५||
आयुष्याची धावपळ न्यारी
गेलोत विसरून दुनिया सारी
हृदयामधल्या आठवणी भारी
जगुया पुन्हा क्या हम क्या तुम
||स्मृती संगम ,स्मृती संगम. 6 ||
*कवी- प्राचार्य पी. एम शहापुरकर सर.*
*स्नेहपूर्वक नमस्कार*
*१९८० मध्ये आपले महाविद्यालय स्थापन झाल्या पासून ते आता पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा "स्मृती संगम" एक संस्मरणीय कार्यक्रम ९ आणि १० मार्च २०२४ रोजी होतो आहे. महाविद्यालय रुपी घरट्यातून उडून गेलेले पक्षी आकाशा मध्ये मुक्तपणे सर्वदूर विहार करीत आहेत. त्यांना आमंत्रित करुन पक्षांचा हा महामेळावा निर्विघ्न आणि यशस्वी करण्यासाठी जोरात प्रयत्न सुरु आहेत. यासाठी प्राचार्य डॉ. पी एम शहापूरकर, ग्रंथपालपद सांभाळणारे प्रा. रमेश गावीत आणि उत्साही विद्यार्थी मित्र जोमाने आणि उत्साहाने काम करीत आहेत. विविध समित्या स्थापन करून कामाची विभागणी केली आहे. हि फार मोठी आनंदाची घटना आहे. आपणा सर्वांसाठी हा "आठवणीतील पक्षांचा मेळावा" आनंददायी तर व्हावाच पण त्याच्याही पुढें जावून समाजकार्य शिक्षण अभ्यासक्रमाच्या या महाविद्यालयाच्या पुढील वाटचाली मध्ये हा मेळावा दीपस्तंभ ठरावा अशी महत्वाकांक्षा मना मध्ये ठेऊन आयोजनाचे काम करणारे कार्यकर्ते मित्र मी पाहतो आहे. महाविद्यालयाच्या दृष्टिने हि फार मोठी दिशादर्शक आणि आश्वासक बाब आहे असे मला वाटते.*
*आपले महाविद्यालय सुरुवाती पासूनच अनेक चढ उतार वाद संवाद सामावून घेत वाटचाल करीत आलेले आहे. २००० सली मात्र संस्थेतील वाद विकोपाला गेले आणि हे महाविद्यालय बंद करण्याचा विचित्र निर्णय झाला. या निर्णया विरोधात त्या वेळी प्रा. डॉ. कॉम्रेड राम बाहेती सरांच्या पुढाकाराने एक मोहीमच राबविली गेली. विद्यार्थ्यांनी त्या वेळीही साथ दिली. त्या वेळचे विद्यापीठ स्तरावरचे आणि मंत्रालयातील सहृदय अधिकाऱ्यांच्या मांन्यतेने आपले महाविद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरित झाले. एक पैशाचाही गैरव्यवहार न करता महाविद्यालयाला विद्यापीठात स्थान मिळाले. अर्थात या मध्ये महाराष्ट्राचे सर्व परिचित आदरणीय नेते दिवंगत प्रा. डॉ. एन डी पाटील व शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा मंत्रालय स्तरावर निर्णय करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता. महाविद्यालयाच्या स्थापने पासूनाच्या हस्तांतराच्या या घडामोडीनंतर "स्मृती संगम" हा एक भला मोठा कार्यक्रम होत आहे. एके काळी महाविद्यालयामध्ये प्राचार्य, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल आणि ०८ प्राध्यापक असा पूर्ण कर्मचारी वर्ग होता. मात्र आज आमचे जिवलग सहकारी शहापूरकर सर आणि गावीत सर दोघेजणच जिद्दीने किल्ला लढवित आहेत. अर्थात् ही काहीं आपलीच वेदना, परेशानी आहे असे नव्हें. राज्यात सर्व विद्यापीठातील विविध विभागही ओस पडले आहेत.एकूणच शिक्षणाची दुरावस्था आहे. असो.. तो विषय इथे नको.*
*तथापी प्राचार्य शहापूरकर सर आणि प्रा गावीत सर यांनी (स्मृती संगम) आठवणींच्या गावा सारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे एवढे मोठें शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार केला आहे. माझ्या दृष्टीने हे कौतुकाच्या पलीकडचे अती मौल्यवान आहे. आणि त्यांना त्याच भावनेने प्रेरित होऊन विद्यार्थी मित्र साथ देत आहेत. या मध्ये आपणही सर्वांनी हर्ष उल्हासाने सहभागी होऊ या आणि समाजकार्य शिक्षण अभ्यासक्रमाला अर्थ प्राप्त करुन देऊया. विद्यार्थी मित्रांच्या मना मध्ये महाविद्यालय जीवनातील आंबट गोड आठवणी, ताण तणावाचे अवशेष असू शकतात. कृपया ते सर्व ईतिहास जमा करावे....""झाले गेले विसरुन सारे पुढे पुढें चालावे जीवन गाणे गा त च राहावे"".... माहिती तंत्रज्ञान क्रांतीने आपणा सर्वांना परस्परांशी संपर्क करणे खूप सुलभ केलें आहे.त्यामुळें आपण सहज जोडल्या गेलो आहोत. याचा सदुपयोग करून घेऊया. आपण सुज्ञ आहात. हा कार्यक्रम सुव्यवस्थित व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहोत तरीही कार्यक्रमाच्या आयोजना मध्ये "'जिथे कमी तिथे आम्हीं'" हा भाव मनामध्ये ठेवून यावे. आपल्या सहभागा शिवाय हा कार्यक्रम सुंदर आणि भव्य होणार नाही हे निश्चित आहे. म्हणून आपण अगत्य येण्याचे करावे हे नम्र आवाहन....*🙏🏻
स्वागतोत्सुक
प्रा. धनंजय कांबळे
*सर्वांना सस्नेह नमस्कार,*
*स्मृति संगम 2024 च्या अनुषंगाने आपण साधारण 13 प्रकारच्या विविध समित्या तयार केल्या असून या कार्यक्रमाचे आयोजन सहज आणि सोपं व्हावा हा यामागील प्रामाणिक उद्देश. म्हणून सर्व समित्यांचे प्रमुख, सहप्रमुख आणि समन्वयकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या समितीतील इतर सदस्यांसोबत समन्वय साधून पुढील कार्य करावे.*
*1) प्रत्येक समितीने स्वतःचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यामध्ये समितीतील सर्वांना सहभागी करावे.*
*2) समितीच्या कामाची रोजची अपडेट या ग्रुप वरती शेअर करावी.*
*3) आठवड्यात किमान एक वेळेस ऑनलाइन पद्धतीने व एकावेळी प्रत्यक्ष आढावा बैठक करावी.*
*4) समितीप्रमुखांनी कोणताही निर्णय घेताना समितीतिल सदस्यांशी चर्चा करावी.*
*5) समितीप्रमुख व समन्वयक यांनी आपल्या समितीमधील प्रगती अहवाल मुख्य संयोजन समिती व समन्वय समिती यांना वेळोवेळी देणे आवश्यक आहे.*
*6) आपल्या ग्रुपमध्ये कामाच्या व्यतिरिक्त कोणतीही अनावश्यक चर्चा होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.*
*7) कामा संदर्भात काही अडचणी असल्यास तुम्ही मुख्य संयोजन समिती आणि समन्वय समितीशी संपर्क साधू शकता.*
*8) सर्व समित्यांना दिलेल्या विहित वेळेत काम करणे आवश्यक आहे.*
*म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपली जबाबदारी चोख बजवावी व स्मृति संगम 2024 या कार्यक्रमाला यशोशिखरावर पोहोचवूया.*
*आपल्या सर्वांच्या सूचनांचे स्वागत.*
*धन्यवाद.!*
8-15 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे..माझा वर्गमित्र राजू खिल्लारे याचा अचानक फोन आला की प्रा.शहापूरकर सर जालन्यात आलेले आहे,तुझ्या घरा मागेच कार्यक्रमाचे ठिकाण आहे.मग त्याने सराना फोन दिला,मी म्हटले सर तुम्हाला यावं लागत आमच्या घरी.. सरांनी विनंतीला मान देऊन खिल्लारे सोबत आले..इतकं छान वाटलं ..नंतर हळू हळू गप्पा रंगत गेल्या..मग जे जे जालन्यात नोकरीनिमित्त स्थाईक झालेले आहेत तेही वर्ग मंडली आले..मग मस्त जुन्या आठवणीत सगळे रंगले... सरांना मी म्हटलं देखील सर आपला इथेच स्मृती संगम झाला..आपल्या महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षकाची आणि शहापूरकर सरांची खासियत म्हणजे प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थी बदल नाव गाव,काम सर्व आठवणीत आहे..नंतर पुन्हा भेटू ह्या अश्र्वासनानंतर सर्व निघून गेले.मग पुढे सर सोबत राहिलेल्या मित्रांच्या घरी गेलेत..त्याच वर्णन सरांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर केलेले आहे..
लिहिण्याच कारण इतकाच की सर आणि बाकीचे माझे वर्ग मित्र ,अजून 1 2 जन अनोळखी होते ,मात्र कुणालाच भेटून अस वाटल नाही की आम्ही खूप दिवसांनी भेटतोय,खूप कालावधी गेलाय..माझ्या कामानिमित्त मी 2-3 वेळेस शहापूरकर सर आणि गावित सर यांना भेटले मात्र तेही 8-9 वर्षाच्या कालावधीनंतर..मात्र मला सर आणि मित्राशी बोलताना मुळीच जाणवलं नाही की आपण काळाच्या खूप पुढे निघून आलो..आपण पुन्हा त्याच कॉलेजच्या आठवणीत जातो.आणि आपल्या कॉलेज ची खासियत आहे,आपल्या इथे शिक्षक विद्यार्थ्यांचे नाते प्रोफेशनल जरी असले तरी मैत्री पूर्व आहे, प्रत्येक शिक्षकाची आपापली वैशिष्ट आहेत,त्यांची आपल्यावर छाप आहे त्यामुळे त्यांच्याशी बोलताना
पुन्हा आपण विद्यार्थी च्या भूमिकेत जातो..आणि जे कॉलेजच्या शिक्षक आणि classmates सोबत जे bonding आहे तस कुणासोबत नसतं..कारण विद्यार्थी दशेत. शिक्षक आणि मित्रांनी आपल स्ट्रगल बघितलेले असते,आता इतक्या दिवसांनी आपण आपल्या जीवनात स्थिरावलो हे बघून आपल्या घरच्यांना जितकं छान वाटत तितकाच कौतुक ह्या लोकांनाही असतं..मात्र ही शाबाशीची थाप वेगळी असते
सांग न्याच तात्पर्य हेच की आज इतक्या वर्षानी आपण भेटणार आहोत आपल्या कॉलेजने पुन्हा आपल्याला संधी दिली आहे की पुन्हा ते दिवस जगायचे आणि त्या आठवणी ताज्या करायच्या भलेही काहीच्या आठवणी कटू असतील,खोल जखमी असतील,,मात्र काळानुरूप सर्व आठवणी भरतात...तसेच स्मृती संगम हा त्या जखमेवरचा फुंकर आहे असं समजयच..
आज माणसाचं आयुष्य इतकं धावपळीचं झालंय,प्रत्येकाला कुठेतरी विश्रांती साठी थांबावं लागतंय,पुढे जोमाने काम करण्यासाठी..
त्याचप्रकारे "स्मृती संगम" हा स्फूर्ती संगम आहे जो प्रत्येकाला नवीन ऊर्जा देईल,
स्मृती संगम च्य निमित्ताने विचाराची आदान- प्रदान करू..पुन्हा जुन्या दिवसात रमुया...
टीप:स्वतःच्या अनुभवातून जे सुचलं ते लिहिलं,काही चुकलं असेल तर क्षमस्व🙏
- अस्मिता शिरवाडकर
आदरणीय प्राचार्य श्री शहापूरकर सर यांचं माजी विद्यार्थ्यांना आवाहन
*स्नेहपूर्वक नमस्कार*
*१९८० मध्ये आपले महाविद्यालय स्थापन झाल्या पासून ते आता पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा "स्मृती संगम" एक संस्मरणीय कार्यक्रम ९ आणि १० मार्च २०२४ रोजी होतो आहे. महाविद्यालय रुपी घरट्यातून उडून गेलेले पक्षी आकाशा मध्ये मुक्तपणे सर्वदूर विहार करीत आहेत. त्यांना आमंत्रित करुन पक्षांचा हा महामेळावा निर्विघ्न आणि यशस्वी करण्यासाठी जोरात प्रयत्न सुरु आहेत. यासाठी प्राचार्य डॉ. पी एम शहापूरकर, ग्रंथपालपद सांभाळणारे प्रा. रमेश गावीत आणि उत्साही विद्यार्थी मित्र जोमाने आणि उत्साहाने काम करीत आहेत. विविध समित्या स्थापन करून कामाची विभागणी केली आहे. हि फार मोठी आनंदाची घटना आहे. आपणा सर्वांसाठी हा "आठवणीतील पक्षांचा मेळावा" आनंददायी तर व्हावाच पण त्याच्याही पुढें जावून समाजकार्य शिक्षण अभ्यासक्रमाच्या या महाविद्यालयाच्या पुढील वाटचाली मध्ये हा मेळावा दीपस्तंभ ठरावा अशी महत्वाकांक्षा मना मध्ये ठेऊन आयोजनाचे काम करणारे कार्यकर्ते मित्र मी पाहतो आहे. महाविद्यालयाच्या दृष्टिने हि फार मोठी दिशादर्शक आणि आश्वासक बाब आहे असे मला वाटते.*
*आपले महाविद्यालय सुरुवाती पासूनच अनेक चढ उतार वाद संवाद सामावून घेत वाटचाल करीत आलेले आहे. २००० सली मात्र संस्थेतील वाद विकोपाला गेले आणि हे महाविद्यालय बंद करण्याचा विचित्र निर्णय झाला. या निर्णया विरोधात त्या वेळी प्रा. डॉ. कॉम्रेड राम बाहेती सरांच्या पुढाकाराने एक मोहीमच राबविली गेली. विद्यार्थ्यांनी त्या वेळीही साथ दिली. त्या वेळचे विद्यापीठ स्तरावरचे आणि मंत्रालयातील सहृदय अधिकाऱ्यांच्या मांन्यतेने आपले महाविद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरित झाले. एक पैशाचाही गैरव्यवहार न करता महाविद्यालयाला विद्यापीठात स्थान मिळाले. अर्थात या मध्ये महाराष्ट्राचे सर्व परिचित आदरणीय नेते दिवंगत प्रा. डॉ. एन डी पाटील व शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा मंत्रालय स्तरावर निर्णय करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता. महाविद्यालयाच्या स्थापने पासूनाच्या हस्तांतराच्या या घडामोडीनंतर "स्मृती संगम" हा एक भला मोठा कार्यक्रम होत आहे. एके काळी महाविद्यालयामध्ये प्राचार्य, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल आणि ०८ प्राध्यापक असा पूर्ण कर्मचारी वर्ग होता. मात्र आज आमचे जिवलग सहकारी शहापूरकर सर आणि गावीत सर दोघेजणच जिद्दीने किल्ला लढवित आहेत. अर्थात् ही काहीं आपलीच वेदना, परेशानी आहे असे नव्हें. राज्यात सर्व विद्यापीठातील विविध विभागही ओस पडले आहेत.एकूणच शिक्षणाची दुरावस्था आहे. असो.. तो विषय इथे नको.*
*तथापी प्राचार्य शहापूरकर सर आणि प्रा गावीत सर यांनी (स्मृती संगम) आठवणींच्या गावा सारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे एवढे मोठें शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार केला आहे. माझ्या दृष्टीने हे कौतुकाच्या पलीकडचे अती मौल्यवान आहे. आणि त्यांना त्याच भावनेने प्रेरित होऊन विद्यार्थी मित्र साथ देत आहेत. या मध्ये आपणही सर्वांनी हर्ष उल्हासाने सहभागी होऊ या आणि समाजकार्य शिक्षण अभ्यासक्रमाला अर्थ प्राप्त करुन देऊया. विद्यार्थी मित्रांच्या मना मध्ये महाविद्यालय जीवनातील आंबट गोड आठवणी, ताण तणावाचे अवशेष असू शकतात. कृपया ते सर्व ईतिहास जमा करावे....""झाले गेले विसरुन सारे पुढे पुढें चालावे जीवन गाणे गा त च राहावे"".... माहिती तंत्रज्ञान क्रांतीने आपणा सर्वांना परस्परांशी संपर्क करणे खूप सुलभ केलें आहे.त्यामुळें आपण सहज जोडल्या गेलो आहोत. याचा सदुपयोग करून घेऊया. आपण सुज्ञ आहात. हा कार्यक्रम सुव्यवस्थित व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहोत तरीही कार्यक्रमाच्या आयोजना मध्ये "'जिथे कमी तिथे आम्हीं'" हा भाव मनामध्ये ठेवून यावे. आपल्या सहभागा शिवाय हा कार्यक्रम सुंदर आणि भव्य होणार नाही हे निश्चित आहे. म्हणून आपण अगत्य येण्याचे करावे हे नम्र आवाहन....*🙏🏻
स्वागतोत्सुक
प्रा. धनंजय कांबळे Dhananjay Kamble