17/05/2026
सत्यशोधक महिला विकास मंडळ संचलित,तिसगाव विद्यालय येथे इयत्ता 5 वी ते 12 वी साठी प्रवेश देणे सुरू आहे.
सेमी इंग्रजी माध्यमासाठी स्वतंत्र वर्ग...
तेव्हा लवकरात लवकर संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा......
11/05/2026
तिसगाव विद्यालयात शिक्षक पदासाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी.......
इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संपर्क साधावा...
11/05/2026
एस.एस.सी. परीक्षा २०२६ -गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा...
आपल्या तिसगाव विद्यालयाने बोर्ड परीक्षेतील उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल आणखी वाढवण्यासाठी,आणि भविष्यात त्यांनी आणखी यशाची शिखरे सर करावीत म्हणून त्यांच्या यशाचा गौरव करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे,त्याकरिता सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.१५ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १०:०० वाजता तिसगाव विद्यालय येथे संपन्न होणार आहे.....
गुणवत्तापूर्ण शिक्षण, कॉम्प्युटर शिक्षण,डिजिटल पद्धतीने शिक्षण,मोफत स्कूल बस सुविधा,अनुभवी शिक्षक वृंद,प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष मेहनत,१० वी बोर्ड परीक्षेसाठी शाळेचे स्वतंत्र परीक्षा केंद्र,तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी तिसगाव विद्यालय आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे....
तेव्हा इयत्ता ५वी ते १२वी च्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश तिसगाव विद्यालयातचं निश्चित करा....
09/05/2026
सत्यशोधक महिला विकास मंडळ संचलित,
तिसगाव विद्यालयात इयत्ता ५ वी ते १२ वी साठी नवीन प्रवेशास सुरुवात.....
तेव्हा आजच आपल्या पाल्यांच्या उज्वल भवितव्यासाठी संपर्क साधा ,आणि त्यांचा प्रवेश निश्चित करा......
08/05/2026
तिसगाव विद्यालयाची यशाची परंपरा सदैव अबाधित!!!
एस. एस. सी.बोर्ड परीक्षेत शाळेचा निकल 94.05 टक्के लागला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्यशोधक महिला विकास मंडळ या सेवाभावी संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा, सन्माननीय सचिव, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच तिसगाव विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....
26/04/2026
सत्यशोधक महिला विकास मंडळ संचलित,तिसगाव विद्यालय येथे शिक्षक भरती सुरू आहे , इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संपर्क साधावा......
11/04/2026
तिसगाव विद्यालय येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. उच्च प्राथमिक शाळा तिसगाव चे मुख्याध्यापक श्री.साळवे सर उपस्थित होते.प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे श्री.साळवे सर तसेच तिसगाव विद्यालय चे प्रभारी मुख्याध्यापक श्री.सी.के.पवार यांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला,त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यप्रती आपण नेहमी आदर बाळगायला हवा आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरीही आपण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा विसर पडू न देता आपले शिक्षण पूर्ण करावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे परखड मत प्रमुख पाहुणे श्री.साळवे सर यांनी व्यक्त केले.
11/04/2026
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....💐💐💐
12/03/2026
"सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात लोकशाहीची मूल्ये रुजवणारे, कृषी आणि औद्योगिक क्रांतीचे प्रणेते यशवंतराव चव्हाण यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम. सर्वांना शुभेच्छा!"
#यशवंंतरावचव्हाण
#यशवंंरावचव्हाणजयंती