27/07/2025
तुमच्या मुलांमध्ये खालील वर्तन दिसून येतंय.
पायऱ्या चढायला उतरायला मुल घाबरतंय, पायात सॉक्स ठेवत नाही, डोक्याला टोपी/ रुमाल ठेवत नाही, मुल गळ्यात किंवा हातात काही बांधू देत नाही, मुल सगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ खात नाही, सगळ्या प्रकारचे कपडे घालत नाही ?
तुमच्या मुलामध्ये सेन्सरी इशू असू शकतात.
मग काय करावं मुलासाठी ?
असा प्रश्न पालक म्हणून तुम्हाला पडणं साहजिकच आहे. तर घाबरू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे.
आमच्याकडील तज्ञ व अनुभवी टीम आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल.
उपलब्ध सुविधा:-
स्पीच थेरपी , ऑक्युपेशनल थेरपी,सेंसरी थेरपी ,कम्युनिकेशन थेरपी, बिहेवियर मोडिफिकेशन, रीडिंग रायटिंग आणि सर्व काही.
तर आजच आमच्याशी संपर्क करा
संपर्क क्रमांक ९९७०५९८४२९
10/07/2025
विद्येची देवता देवी सरस्वती हिच्या पूजनाने आज पवित्र अशा गुरुपौर्णिमेच्या पूजनाला सुरुवात.
आईला वंदन, गुरूंना वंदन.🙏🙏
हीच खरी गुरुपौर्णिमा.....🙏😊
आमच्या लाडक्या मुलांनो,
आज आपल्यासाठी एक खूपच खास दिवस आहे –
**गुरूपौर्णिमा**.
हा दिवस आपल्या शिक्षकांचे, मार्गदर्शकांचे आणि आपल्याला शिकवणारे सर्वांचे आभार मानण्याचा दिवस आहे.
पण आज आम्ही एक गोष्ट मनापासून सांगू इच्छितो...
**तुम्ही सुद्धा आमचे गुरू आहात.**
हो, खरंच सांगतोय.
आम्ही तुम्हाला शिकवतो, पण रोज काहीतरी नवीन तुमच्याकडूनच शिकत असतो.
तुमचं हसणं, निस्वार्थ प्रेम, मनापासूनचा प्रयत्न, संयम आणि हार मानू नये ही शिकवण — खरतर हीच खरी आमच्यासाठी गुरुदक्षिणा आहे.
कधी कधी थोडा कठीण काळ असतो, पण तुम्ही आम्हाला दाखवता की धैर्य, संयम , जिद्द आणि आनंद हे जीवनाचे खरे रंग आहेत.
तुमचं निरागस मन, प्रेमळ स्वभाव, कसलाही मोह नाही , कुणाविषयीही राग - द्वेष नाही, कुणाशीही स्पर्धा नाही आणि सतत शिकत राहण्याची जिद्द पाहून आमचं मन भरून येतं.
तुम्ही आम्हाला शिकवलं की, **शिकणं म्हणजे फक्त पुस्तकं नव्हे – तर एकमेकांना समजून घेणं, मदत सहकार्य करणं, काळजी घेणं आणि प्रेम करणं** हेही शिकणं असतं !
आज गुरूपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी, आम्ही तुमचे मन:पूर्वक आभार मानतो.😊🙏
तुम्ही आमचे विद्यार्थी आहात याचा अभिमान आहे आणि आनंद सुद्धा.
**गुरूपौर्णिमेच्या तुमच्याप्रती मनःपूर्वक शुभेच्छा!** 🙏🙏😊
28/06/2025
साधारण एक वर्ष भरापूर्वीची गोष्ट आहे आम्ही सर्व आवरून निघण्याच्या तयारीत असताना एक आजी ऍडमिशन इन्क्वायरी साठी आल्या.
आजीशी पाच दहा मिनिटे बोलून घ्यावं म्हणून मी परत आत गेले.आजींना बोलावलं आणि आमच्या दोघींमध्ये संवाद आणि चर्चा सुरू झाली.
मी आजीला काही प्रश्न विचारू लागले की मुल कोणत्या प्रकारातलं आहे?मुलाला काय झालेलं आहे? डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे? तर त्याविषयी आजीला फारसं सांगता आले नाही .फक्त आजी म्हणत होत्या की मुल चालत नाही मुल, स्वतःच्या हाताने जेवत नाही, मुल आपण जे बोलू ते फारसं समजू शकत नाही, एवढेच काय ते आजी सांगू शकल्या नातवा विषयी.
त्यावर मी म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही,आपण मुलाला एकदा बघून घेऊया आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी ठरवूया.
आजी जाताना म्हणाल्या की थोडा उशीर झालाय मला यायला सगळीकडचे काम आत्ताच आटोपले आता घरी जात होते म्हणून म्हणाले की तुमच्याशी भेटून घ्यावं.
त्यावर मी विचारले की काय काम करता तुम्ही तर त्या म्हणाल्या काही नाही धुनी-भांडी करते. हे ऐकून मी एकदम शांत झाले आणि दोन मिनिटं डोळे मिटले आणि विचार केला आणि म्हणाले देवा किमान यांच्या कुटुंबात तरी असं मुल द्यायला नको रे.
त्या मागचं कारण असं की विशेष मुल ज्या कुटुंबामध्ये आहे त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मुलांवरती प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि खर्च सुद्धा तितकाच आहे.
आजी दुसरे दिवशी नातवाला कडेवर उचलून घेऊन आल्या. बघते तर मूल दहा वर्षांचं होतं , मुल सेरेब्रल पाल्सी होत ( diplegic CP with microcephaly. )
आजी कडून प्राथमिक माहिती मिळाली ती अशी की मुल थोडा वेळच हात धरून चालू शकतं आणि बाकी सर्व कृतींसाठी दैनंदिन कृतींसाठी पूर्णतः आमच्या वरती अवलंबून आहे.
आजीशी माझं पूर्ण बोलून झाल्यानंतर मी आजीला म्हणाले की आजी उद्यापासून नातवाला त्याच्या आई सोबत पाठवून द्या.
उद्यापासून याला दररोज न चुकता पाठवा एवढंच करा फक्त.
मुल दुसरे दिवशी पासून येऊ लागले. विशेष शिक्षणाच्या प्रोटोकॉल नुसार मुलाचे निरीक्षण व असेसमेंट सुरू झाले व शिक्षणासोबतच आईलाही मार्गदर्शन तसेच प्रशिक्षणात्मक काही टिप्स देण्यात आल्या.
- मुलाला झोपून जेऊ घालायचे नाही.
- मुलाला बोटाला धरून जास्तीत जास्त चालवण्याचा प्रयत्न करायचा.
- त्याला घराच्या एका कोपऱ्यात 4-5 मिनिटं मांडी घालून बसून ठेवायचं. की ज्यामुळे त्याला आधार घेऊन बसायची सवय हळूहळू कमी होईल.
- त्याला घराच्या एका कोपऱ्यात चार ते पाच मिनिटं उभं करून ठेवायचं की ज्यामुळे त्याला विनाअधाराचे उभे राहण्याची सवय लागेल.
- त्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक त्या थेरपी देण्यास आम्ही सुद्धा सुरुवात केली.
- मुलाच्या फाईन ,मोटार ग्रॉस मोटर ,सेंसरी इशूज ,बिहेवियरल इशू यावरती काम सुरू झाले.
सांगायला आनंद होतो आहे की वर्षभरानंतर मुलांमध्ये बरेचशे चांगले बदल दिसून आले.
- मुलाचे फाईल मोटर्स बरेच कमी झाले.
- मुलाचे सेन्सरी इशू सुद्धा कमी झाले.
- मूल बोट धरून बरच अंतर चालते.
- मुल विना आधाराचे बराच वेळ बसते.
- मुल अन्न चावून खाते.
- बसून जेवते.
- आणि बरेच काही अपेक्षित बदल मुलामध्ये झाले.
मुलाच्या स्नायूंमध्ये ताठरता असल्यामुळे सुरुवातीला खूप काळजी पूर्वक मुलाचे व्यायाम व थेरपी घ्याव्या लागत असत. आणि काही थेरपी सुद्धा मुलाला देता येत नव्हत्या.
आता स्नायूंमध्ये लवचिकता आली आहे आणि काही थेरपी नव्याने सुरु केल्या आहेत.
त्यापैकीच एक ब्लँकेट थेरपी आणि बॉल प्रेशर व्हिडिओमध्ये दिसत आहे.
22/06/2025
तुमच्या मुलाचं लर्निंग डिसॅबलिटी म्हणून निदान झालयं ?
तर आता काय करावे? कोणत्या शाळेत जावे ?
मुलाला लिखाणात अडचणी येतात, काही अक्षरं उलटी लिहितंय मुल , बऱ्याचदा मुल वाचलेलं , लिहिलेलं विसरून जातंय.
काय करावं मुलासाठी ?
असा प्रश्न पालक म्हणून तुम्हाला पडणं साहजिकच आहे. तर घाबरू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे.
आपलं मूल LD आहे त्यामुळे त्याच्या शैक्षणिक गरजा आपल्या सगळ्यांपेक्षा थोड्या वेगळा आहेत हे आपण समजून घेऊया. त्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकवावे लागेल. हे आपण समजून घेऊ या.
जेवढ्या लवकर आपण मुलाला समजून घ्याल आणि त्या दृष्टीने प्रयत्न कराल तेवढ्या लवकर मुलामध्ये आपल्याला बदल दिसतील.
मुलाचे संगोपन व सर्वांगीण विकास साधण्यासाठी आमच्याकडील तज्ञ व अनुभवी टीम आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल.
उपलब्ध सुविधा:-
स्पीच थेरपी , ऑक्युपेशनल थेरपी,सेंसरी थेरपी ,कम्युनिकेशन थेरपी, बिहेवियर मोडिफिकेशन, रीडिंग रायटिंग आणि सर्व काही.
तर आजच आमच्याशी संपर्क करा
संपर्क क्रमांक ९९७०५९८४२९
18/06/2025
तुमच्या मुलाचं ADHD म्हणून निदान झालयं ?
तर आता काय करावे? कोणत्या शाळेत जावे ? मुल जास्तच बोलतं , एका जागी बसत नाही ? खेळण्यांशी नीट खेळत नाही
असा प्रश्न पालक म्हणून तुम्हाला पडणं साहजिकच आहे. तर घाबरू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे.
आपलं मूल ADHD आहे त्यामुळे त्याच्या गरजा आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहेत हे आपण समजून घेऊया.
मूल समजून घ्यायला आपल्याला अधिक कालावधी लागतो त्यामुळे मुलाचे निदान जेवढ्या लवकर होईल व त्याचे विशेष शिक्षण व थेरपी जेवढ्या लवकर सुरू होतील तेवढ्या लवकर मूल व त्याच्या गरजा समजण्यास व सोडवण्यास आपल्याला मदत होईल.
मुलाचे संगोपन व सर्वांगीण विकास साधण्यासाठी आमच्याकडील तज्ञ व अनुभवी टीम आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल.
उपलब्ध सुविधा:-
स्पीच थेरपी , ऑक्युपेशनल थेरपी,सेंसरी थेरपी ,कम्युनिकेशन थेरपी ,फिजिओथेरपी बिहेवियर मोडिफिकेशन, रीडिंग रायटिंग आणि सर्व काही.
तर आजच आमच्याशी संपर्क करा
संपर्क क्रमांक ९९७०५९८४२९
13/06/2025
तुमच्या मुलाचं ऑटिझम म्हणून निदान झालयं ?
तर आता काय करावे? कोणत्या शाळेत जावे ? मुल बोलत नाही , ऐका जागी बसत नाही ?
असा प्रश्न पालक म्हणून तुम्हाला पडणं साहजिकच आहे. तर घाबरू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे.
आपलं मूल ऑटिझम आहे त्यामुळे त्याच्या गरजा आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहेत हे आपण समजून घेऊया.त्याच्या वैयक्तिक ,सामाजिक ,शैक्षणिक ,भावनिक व्यावसायिक या सगळ्या गरजा वेगळ्या असल्याकारणाने त्या समजून घ्यायला आपल्याला वेळ लागतो.
मूल समजून घ्यायला आपल्याला अधिक कालावधी लागतो त्यामुळे मुलाचे निदान जेवढ्या लवकर होईल व त्याचे विशेष शिक्षण व थेरपी जेवढ्या लवकर सुरू होतील तेवढ्या लवकर मूल व त्याच्या गरजा समजण्यास व सोडवण्यास आपल्याला मदत होईल.
मुलाचे संगोपन व सर्वांगीण विकास साधण्यासाठी आमच्याकडील तज्ञ व अनुभवी टीम आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल.
उपलब्ध सुविधा:-
स्पीच थेरपी , ऑक्युपेशनल थेरपी,सेंसरी थेरपी ,कम्युनिकेशन थेरपी ,फिजिओथेरपी बिहेवियर मोडिफिकेशन, रीडिंग रायटिंग आणि सर्व काही.
तर आजच आमच्याशी संपर्क करा
संपर्क क्रमांक ९९७०५९८४२९
&_early_intervention_therapy_center_for_special_children_chhatrapati_sambhajinagar
11/06/2025
Admissions open for special needs.
01/04/2025
On the occasion of Autism Awareness Week.