05/05/2020
सध्या कोरोना विषाणूनं जगभर थैमान घातलं आहे. घरात कैद झालेल्या या काळात मराठी वृत्तपत्र आणि समाजमाध्यमावर "आईमनाचा माणूस घेतोय विद्यार्थांची काळजी", गल्ली ते दिल्लीपर्यंत करत आहेत फोन, आस्थेवाईकपणे करत आहेत चौकशी, असं सारं संवादमय काळजीवाहू वातावरण रंगलय...
अपचुंद्याचं पोर
सध्या कोरोना विषाणूनं जगभर थैमान घातलं आहे. घरात कैद झालेल्या या काळात मराठी वृत्तपत्र आणि समाजमाध्यमावर "आईमनाच...
02/01/2018
पुरी काकू... आणि आम्ही सारे...
विद्यापीठातले 'ते' दिवस आजही आठवतात.आम्हा जर्नालिझमच्या मुलांची दोन डिपार्टमेंट होती,एक विद्यापीठात जिथे क्लास भरायचा तो डिपार्टमेंटमध्ये आणि दुसरा त्याच विद्यापीठात प्रा. सुरेश पुरी सर यांच्या घरचा कौटुंबिक क्लास, पहिल्या क्लासमध्ये पुस्तकातलं शिकवल जायचे आणि दुसऱ्या क्लासमध्ये मनाच्या मोठ्या कक्षा रुंदावण्याचे इतरांवर निस्वार्थीपणे प्रेम करायचे धडे मिळायचे..एक क्लास जर्नालिझमचा आणि दुसरा क्लास पुरीझमचा.. खरे तर या क्लासच्या 'आधारवड' पुरी काकू होत्या आज ही त्याच आहेत. 'ते' दिवस अगदीच 'भारलेले' होते,खरे तर 'ते' दिवस कुणाच्यातरी प्रेमात पडायचे होते पण आम्ही सारे पुरी सर कौटुंबियांच्या प्रेमात पडलो होतो.जेवणे येथेच,मित्रांच्या गप्पाची 'महफिल' येथेच रंगायची येथेच आमची कवी संमेलने भरायची,त्या तीन वर्षात सणवार उत्सव सारे काही सरांच्या घरीच.. दिवसभर पुरी काकू आणि त्यांचे किचन हे समीकरण ठरलेले असायचे.येणाऱ्यांची वर्दळ दिवसभर थांबली तर नवल !
विद्यापीठात पुरीसरांच्या घरात माणसावर प्रेम करण्याची अदभूत कला होती, आज ही ती आहे.राज्याच्याच नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात सरांचा मुलगा बनलेले चेहरे 'मी सुरेश पुरी' म्हणून दिमाखात वावरतांना दिसतात. विद्यापीठातल्या 'त्या' घरी गेले की दोन गोष्टी ठरलेल्या असायच्या एक सर्वाना येणाऱ्या प्रत्येकाचा जबरदस्त परिचय करून दिला जायचा.. आणि दुसरे खाण्यासाठी हातावर केळी ठेवल्या जायची. किती मजा वाटायची बापरे...तीन वर्षानंतर आम्हा सर्वांचे शिक्षण संपले आणि घराचा सबंध संपला असे अजिबात नाही. या घराशी असणारे मुलाचे नाते आजही कायम आहे.माझ्या बायकोच्या मंगळसुत्रापासून ते संसार उभे करून देण्यात काकूंनी आनंदाने आईची भूमिका पार पडली होती. लग्नानंतर तीन वर्ष आम्ही पुरीसर यांच्या त्रिमूर्ती चौकातील घरात राहिलो. हे सर्व घडत असतांना विद्यापीठातील घराची मात्र सारखी आठवण येत असे.मग आम्ही तिकडे 'मुक्काम' हलवायचो.पुरीसर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचे घर बीड बायपासला 'शिफ्ट' झाले आणि विद्यापीठातल्या घराचा तो 'चिवचिव'पणा बीडबायपासला गेला. सर सेवानिवृत्त होवून काहीही बदल झाला नाही ती घरी' श्रद्धेने' येणारी गर्दी आद्यापही कमी झालेली नाही. परवा मीही त्या गर्दीत रमण्यासाठी गेलो होतो. माझ्या अंगाखांद्यावर खेळणारी माऊ( पुरी सरांची नात) आता सुसाटपणे सायकल चालवत आहे. घरी गेल्यावर काकू आणि वाहिनीने जोरदार स्वागत केले. मग पुढे काय ? गरमागरम स्वयपाक,आयस्क्रीम,आणि जबरदस्त पाहुणचार एकदम मजा आली त्या मायेतला स्वादिष्टपणा आज ही कायम होता. माझ्या सोबत किशोर गुंजाळ आला होता. १० मिनिटे भेटून येवू या बेताने.. आम्ही आलो,रमलो .. पूर्ण वेळ कुठे गेला कळाले नाही. आता कधीही विद्यापीठात जातांना त्या 'पुरीझम' घराकडे नजर जातेच जाते. रांगोळ काढणाऱ्या काकू, पाण्याचा ग्लास हातात घेऊन जेवता का 'अन्ना' म्हणणाऱ्या काकू,एका हाताने झाडाला पाणी घालत दुसऱ्या हाताने फळे तोडणाऱ्या काकू मागचा तो रोजचा 'जीवनपट' डोळ्यासमोर येतो. मागच्या आठवणीत आपण कसे हरवतो, मन कसे हरवून जाते ते कळत नाही..काकू तुमच्या खूप आठवणीसह थांबतो.. ( फोटो श्रेय संपादक किशोर गुंजाळ )
02/01/2018
प्रा.सुरेश पुरी सर आणि माझे मामा यांच्यात कमालीचं साम्य आहे. औरंगाबादला विद्यापीठात शिकायला गेलो तेव्हा पुरी सरांची भेट झाली नि आजोळ भेटल्याचं समाधान मिळालं.मग हा संवाद चिरंतन सोबत राहिला.गुरू -शिष्य नात्याची वीण एवढी घट्ट की त्यातून केवळ मायेचा झराच वाहत राहिला.
मिलिंद व्यवहारे डॉ.दिलीप शिंदे,डॉ.चन्द्रदेव कवडे सर, प्रा.शिंदे सर यांच्यासोबत आजची नांदेड येथील ही भेट स्मरणीय.
'जनसंपर्क: संकल्पना एवं सिद्धांत ' हा त्यांचा ग्रंथही सरांनी मला भेट देऊन मला पीएच.डी.अवॉर्ड झाल्याचं कौतुक केलं.
02/01/2018
पुरी सरांचा नांदेड दौरा....
शनिवारी सर फक्त मुक्कामाला आले आणि जुन्या आठवणी जागवून गेले.
घरी आले मुलांना जवळ घेतलं..विचारपूस केली..भाकरी ठेचा चवीनं खाल्ला ...तेच हास्य,तीच उर्मी..तोच उत्साह. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आठवणी अगदी संगणकात सेव्ह केल्यासारख्या. तपशीलासह प्रसंग सांगताना खरोखरच पूरी सरांची कमाल वाटते. तब्बल १८ वर्षानंतरही सरांनी आठवणी कायम ठेवाव्यात यातच त्यांचे विद्यार्थी प्रेम दिसते.
सर म्हातारे होताहेत याचं एकही लक्षण दिसलं नाही.
*आई मनाचा माणूस*
26/12/2016
सुरेश पुरी सरांची मॅडमसह मुक्तरंगला सदिच्छा भेट
Maharudra Mangnale
04/11/2016
मैं , पत्नी विजयमाला , बेटियां स्मिता , सोनी , बेटा सचिन और पोती तीर्था, नवासिया साक्षी, राशी !
04/11/2016
मी , पत्नी विजयमाला आणि नाती डॉ.सुचिता व डॉ .प्राजक्ता !
09/08/2016
हिंदी प्रचार सभा हैदराबाद के परीक्षा मंत्री प्रो.सुरेश पुरी के साथ परीक्षा विभाग के आनंदकुमार और कार्यकर्ता